2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपिट यामुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो 2015 मध्ये पाऊस व गारपीट झाली होती यामुळे शेतकऱ्यांचे खूप सारे आर्थिक नुकसान झाले होते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांचे व्याज माफ झाले आहे त्यामध्ये कोण कोण शेतकरी पात्र आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत,

2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपिट यामुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी ?
2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपिट यामुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी ?

2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपिट यामुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी ?

बळीराजा हा जीवाचं रान करून रक्ताचे पाणी करून मेहनत करत असतो आणि जमिनीमध्ये पिके घेत असतो परंतु वेळोवेळी काही नैसर्गिक आपत्ती येत असतात आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असते त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून कर्जमाफी किंवा व्याजमाफी याप्रमाणे काही योजना राबवल्या जातात,

प्रस्तावना : रत्नागिरी जिल्ह्यातील अंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्यांबाबत माननीय मंत्री उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9.2.2023 रोजी तसेच माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 05 /09 / 2023 रोजी झालेल्या बैठकीत फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेत जमिनीचे व शेती पिकांचे नुकसान झाले या शेतकऱ्यांना तीन महिन्याचे व्याज माफी तसेच सन 2014/15 या वर्षांतील रूपांतरित कर्जावरील सन 2015/16 या वर्षांचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षांचे 6% टक्के दराने होणारे व्याज शासनामार्फत सरसकट माफ करण्याची मागणी करण्यात आली होती, सदर बैठकीतील निर्णयास अनुसरून जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक 08/11/ 2023 व दिनांक 09/11/ 2023 च्या पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला आहे,

जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक 08/11 / 2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कर्ज पुनर्गठन झालेल्या १४६३ शेतकर्यांना रुपये 4,98,85,615 इतक्या रकमेचा व्याज भरपाई देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे तसेच दिनांक 09/ 11/ 2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील 11, 783 शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या व्याजापोटी रु 2,71,46,850.95 इतक्या रकमेचा सरसकट लाभ देणे बाबतचा प्रस्ताव शासनात सादर केला आहे

2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे व्यक्ती व जनावरे यांची जीवित हानी घरांची व शेती पिकांचे झालेल्या नुकसानेकरिता विभागीय आयुक्त कोकण यांना रुपये 6985.51 लक्ष व रु 9847 लक्ष निधी वितरित करण्यास महसूल व वन विभागाणे वाचा क्रमांक 4 व 6 अन्वय मान्यता दिली आहे

शासन निर्णय: फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेत जमिनीचे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत अशा रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ११७८३ शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या व्याजमाफीची कमाल रक्कम 271 लक्ष गारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी या योजनेअंतर्गत माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे सन 2014/ 15 या वर्षातील पीक कर्जाचे पुनर्गठन झालेले शेतकऱ्यांचे सन २०१५-१६ या वर्षांचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षांचे 6 टक्के दराने होणारे व्याज रूपांतरित कर्जाचा वार्षिक हप्ता विहित मुदत परत करण्याची व हे शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित असण्याची अट शिथिल करून रूपांतरित कर्जावरील व्याजमाफी योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे ,

उपरोक्त दोन्ही योजना अंतर्गत निधी खाली जातींच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे
छत्रपती शिवाजी महाराज योजना शेतकरी सन्मान योजना 2017 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनांचा लाभ घेतलेले शेतकरी सदर शासन निर्णयात नमूद योजनांचा लाभ घेण्यास पात्र असणार नाही,
उपरोक्त दोन्ही योजनांसाठी या शासन निर्णयान्वये एक विशेष बाब म्हणून लाभ देण्यात येणार असल्यामुळे सदर बाब गणली जाणार नाही,
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे प्रस्ताव संबंधित बँकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांचे कार्यालयाकडे दाखल करावेत,

हे पण वाचा : 

नोव्हेंबर, २०२3 अवेळी पाऊस व गारपीट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार ?

Types of agriculture in India | भारतातील शेतीचे प्रकार 2024

Leave a Reply