dalimb sheti डाळिंब लागवड एकरी 2 लाख उत्पन्न

नमस्कार मित्रांनो आज आपण   dalimb sheti डाळिंब लागवड एकरी 2 लाख उत्पन्न  याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत डाळिंब लागवड करण्यासाठी आपण कोणते जातींची निवड केली पाहिजे कोणत्या प्रकारची जमीन निवडली पाहिजे याचे नियोजन कसे करावे याविषयी आपण माहिती बघणार आहोत,

dalimb sheti डाळिंब लागवड एकरी 2 लाख उत्पन्न

dalimb sheti डाळिंब लागवड एकरी 2 लाख उत्पन्न

डाळिंब हे पीक हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यावर येणारे पीक  आहे महाराष्ट्रामध्ये साधारणतः एक लाख हेक्टर क्षेत्र या पिकाच्या लागवडीखाली आहे मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी डाळिंबाची लागवड व्यापारी दृष्टिकोनातून केली जात आहे,

 माती परीक्षण : मित्रांनो अगोदर  शेतकरी माती परीक्षण न करता पारंपारिक पद्धतीने शेती करायची ,परंतु आता माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे आपण कोणत्याही पिकाची लागवड करताना विशेष करून फळबागाची लागवड करताना माती परीक्षण करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला कळते की आपल्या शेतीमध्ये नत्र स्फुरद पालाश यांचे प्रमाण किती आहे व आपल्या पिकाला कोणत्या घटकांची आवश्यकता आहे व ते किती द्यायचे आहे हे आपल्याला त्यामधून कळते,

जमीन : मित्रांनो डाळिंब लागवडीसाठी हलकी व मध्यम स्वरूपाची काळी कसदार जमीन उपयुक्त आहे पाण्याचा निचरा होणारी जमीन असायला हवी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 पर्यंत असावा भारी जमिनीमध्ये शक्यतो लागवड करू नये,

dalimb sheti डाळिंब लागवड एकरी 2 लाख उत्पन्न:

लागवडीसाठी अंतर: मित्रांनो डाळिंब लागवडीसाठी प्रत्येक शेतकऱ्याचे आपले प्रमाण ठरलेले आहे ,कोणी सघन
पद्धतीने लागवड करतो तर कोणी मध्ये जास्त अंतर ठेवते लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल पूर्व मशागत करून घ्यावी त्यानंतर दोन बाय दोन खड्डे खोदून घ्यावे खड्डे उन्हाळ्यामध्ये चांगले तापून घ्यावे  त्यानंतर त्यामध्ये शेणखत बुरशीनाशक सिंगल सुपरफासपेट निंबोळी पेंड आणि वाळवी पासून संरक्षणासाठी थायमिट  टाकून घ्यावे आणि गड्डे पूर्णपणे भरून घ्यावेत,

हवामान : डाळिंबाच्या लागवडीसाठी हवामानाचा विचार केला तर हे पीक कोणत्याही हवामानामध्ये सहज प्रकारे येते परंतु चांगल्या प्रकारचे उत्पन्न हवे असेल तर समशीतोष्ण हवामान  यासाठी उत्तम आहे,

लागवड : डाळिंब पिकाची लागवड करत असताना शासनमान्य नर्सरी मधून खात्रीशीर रोपे आणावीत कलम घेताना विशेष काळजी घ्यावी रोगमुक्त आणि सशक्त रोपांची निवड करावी आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे रोपांची लागवड करावी,

डाळिंबाच्या जाती : डाळिंबाच्या जातींविषयी बोलायचे झाले तर मृदुला फुले , फुले भगवा, गणेश ,G137 ,पुणे भगवा सुपर, डाळिंबामध्ये भगवा ही खूप छान अशी जात आहे जिचा   कलर भगवा असतो फळे मोठी आणि चमकदार असतात,

मित्रांनो फळधारणा घेण्यापूर्वी डाळिंबाच्या झाडांची वाढ पूर्ण होईल होऊ द्यावी पूर्ण वाढ झाल्यानंतर म्हणजेच झाडे तीन ते चार वर्षाची झाल्यानंतरच फळधारणा घ्यावी जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल आणि फळधारणा झाल्याच्या नंतर झाड मजबूत असल्याकारणाने झाडांची मोडतोड होणार नाही झाडाच्या मध्यभागी हवा खेळती राहील व सूर्यप्रकाश पोहोचेल यानुसार व्यवस्था करावी व्यवस्थित कटींग  करून घ्यावी झाडाच्या मध्यभागी हवा पोहचत  असेल आणि सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचत असेल तर झाडे रोगराईला कमी बळी पडतात,

dalimb sheti डाळिंब लागवड एकरी 2 लाख उत्पन्न

सिंचन व्यवस्थापन : मित्रांनो डाळिंब या पिकाला पाण्याची आवश्यकता कमी असते जास्त पाण्याची गरज लागत नाही , परंतु तरीसुद्धा आपण ठिबक सिंचनाची व्यवस्था करून घ्यावी जेणेकरून सर्व झाडांना व्यवस्थित रित्या समप्रमाणात पाणी पुरवठा होईल आणि पाण्याची उपलब्धता कमी असेल आपल्याकडे पाणी कमी असेल तर ठिबक सिंचन केल्यामुळे कमी पाण्यात सुद्धा चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न घेऊ शकता.

सुरुवातीच्या काळामध्ये झाडांची जोपर्यंत पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत शिफारशीनुसार रासायनिक खतांचा योग्य तो वापर करावा गरजेनुसार सेन खत आणि रासायनिक खत यांची मात्रा द्यावी जेणेकरून झाडांची वाढ पूर्णपणे होईल आणि चांगल्या प्रकारे  उत्पन्न होईल,

 

छाटणी : मित्रांनो झाडांची फळ तोडून झाल्यानंतर बागेची व्यवस्थित छाटणी करून घ्यावी छाटणी केलेल्या ठिकाणी बोरडोपेस्ट व्यवस्थित लावून घ्यावे आणि संपूर्ण बागेवर बोरडो  मिश्रण द्रावणाची फवारणी करून घ्यावी,

डाळिंब लागवडीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे
महाराष्ट्रातील जमिनीमध्ये प्रामुख्याने जिंक , लोह, बोरॉन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आलेली आहे त्यासाठी प्रत्येक झाडासाठी मॅग्नेशियम सल्फेट 40 ग्राम  जिंक सल्फेट 30 ग्रॅम फेरस सल्फेट 30 ग्राम बोरिक ऍसिड 20  ग्रॅम प्रति झाड जमिनीतून द्यायचे आहे.

मित्रांनो या प्रकारे उत्तम व्यवस्थापन तुम्ही केले तर खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न तुम्ही घेऊ शकता , फक्त फवारणी वैगेरे वेळेत करता आली पाहिजे कारण डाळिंब या पिकावर फळ किडे  जास्त प्रमाणात अट्याक करतात .

व्यवस्थापन चांगले केले तर इतर पिकांच्या तुलनेत  डाळिंब हे चांगले उत्पन्न देणारे पीक आहे .

हे पान वाचा :

chandan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

FAQ

1. डाळिंब शेती

2. डाळिंब लागवड कशी करावी

3. डाळिंब पिकावर येणारे रोग

Leave a Reply