नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये how many coconut trees can be planted in an acre एका एकरात नारळाची किती झाडे लावता येतील याविषयी सखोल माहिती बघणार आहोत,
how many coconut trees can be planted in 1 acre :
मित्रांनो आपण अगोदर बघितले असेल की शेतकरी शेताच्या बांधावर नारळाच्या झाडांची लागवड करायचा आणि त्यामधून घरी खाण्यापुरते थोडेफार फळ त्याला लागायचे आणि ही झाडे बांधावर असल्यामुळे त्याला कधीच कोणत्याही प्रकारचे खत वगैरे दिले नाही त्यामुळे त्याला पाहिजे तशी उत्पन्नही कधी आले नाही, परंतु मित्रांनो आता गरज आहे ती नारळाची शेती ही व्यवसायिक दृष्टिकोनातून करण्याची कारण शेतकरी इतर पिकांची लागवड करतो आणि त्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही, बाजार मूल्य मिळत नाही आणि त्यामुळे खर्च केलेला खर्चही वसूल होत नाही त्यामुळे आता पारंपारिक शेती सोडून व्यावसायिक तसेच आर्थिक पिकांची लागवड करणे गरजेचे आहे, तर या भागामध्ये अशाच आपण एका आर्थिक पिकाविषयी जाणून घेणार आहोत,
नारळ लागवडीसाठी जमीन: मित्रांनो तुम्ही बघितले असेल की समुद्रकिनाऱ्यावरती नारळाच्या झाडांची लागवड अधिक दिसते जसे की कोकण किनारपट्टी, केरळा, आंध्र प्रदेश, गुजरात इत्यादी तर सांगायचा उद्देश हाच मित्रांनो की नारळ या पिकाला क्षारयुक्त तसेच पाणथळ जमीन देखील चालते, पाणथळ जमिनीमध्ये किंवा क्षारयुक्त जमिनीमध्ये इतर पिके येत नाहीत परंतु नारळ येथे खूप चांगल्या प्रकारे येते ,त्यामुळे तुमची जमीन क्षारयुक्त असेल किंवा पाणथळ असेल तर बिंदासपणे तुम्ही तिथे नारळ लागवड करू शकता,
नारळाची लागवड : जमिनीची व्यवस्थितपणे मशागत करून घ्यायची आणि त्यानंतर ठराविक अंतरावर ती म्हणजेच उंच जातीची लागवड करणार असाल तर 20×20 फूटावर आणि बुटक्या जातीची लागवड करणारा असाल तर 15×15 फूटावर 2×2 फुट खोल गड्डे खोदून घ्यावे आणि त्यामध्ये निंबोळी पेंड , शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, व बुरशीनाशक टाकून घ्यावे, त्यानंतर त्यामध्ये नारळाचे रोप व्यवस्थितपणे लावून घ्यायचे,
नारळाच्या जाती:
अ) उंच जाती:
बानवली : या जातीच्या झाडाचे जीवनमान 80 ते 100 वर्ष असते आणि या जातीच्या झाडांना सातव्या वर्षापासून फळे लागायला सुरुवात होते,या जातीच्या एका झाडापासून जवळपास 100 फळे मिळतात,
फिलिपाईन्स : या जातीच्या नारळापासून वर्षाला जवळपास100 फळे मिळतात,
प्रताप : या जातीच्या नारळापासून 150 फळे वर्षाला मिळतात,
उंच वाढणाऱ्या नारळाच्या जातींना लागवडीपासून किमान सात वर्षांनी फळधारणा होते,
2) बुटक्या जाती:
कोलंबस, ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ व यलो डार्फ अशा इत्यादी जाती आहेत. ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी प्रसिद्ध आहे, बुटक्या जातीच्या नारळाचे जीवनमान 30 ते 35 वर्ष आहे, बुटक्या जातीच्या नारळांना लागवडीपासून तीन ते चार वर्षांमध्येच फळधारणा होते,
लागवडीतील अंतर: मित्रांनो आपण कोणत्या जातीच्या नारळाची लागवड करणारा आहोत यावरती अंतर अवलंबून असते, आपण जर उंच वाढणाऱ्या जातींची निवड करणारा असेल तर दोन झाडांमधील अंतर हे 20×20 फूट असायला पाहिजे , आणि बुटक्या जातीच्या नारळाची लागवड करणार असाल तर दोन झाडांमधील अंतर हे 15×15 फूट असणे आवश्यक आहे, काही शेतकरी झाडांची संख्या जास्त बसावी यासाठी झाडांमधील अंतर हे कमी ठेवतात परंतु असे केल्याने झाडांची संख्या तर वाढते मात्र बऱ्याच अडीअडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो जसे की फळे न लागणे फळगळ होणे व इतर समस्या असतात,
आंतरपीक : आपण जर उंच वाढणाऱ्या नारळाची लागवड केली तर सुरुवातीचे पाच वर्षे तुम्ही कोणतेही पीक घेऊ शकता, आणि त्यानंतर झाडे उंच झाली की पाच वर्षानंतर मी कमी उंचीचे पिके जसे की भाजीपाला सोयाबीन इत्यादी घेऊ शकता,
आणि त्याचबरोबर तुम्ही मधमाशी पालन तसेच गावरान कोंबडी पालन सुद्धा यामध्ये करू शकता यामधून तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल, एक तर जोपर्यंत तुम्हाला नारळापासून उत्पन्न मिळत नाही तोपर्यंत मधमाशांपासून मध विक्रीतून नफा मिळेल आणि दुसरे म्हणजे गावरान कोंबडी पासून अंडी तसेच मास मिळेल,
एकरी झाडांची संख्या: मित्रांनो झाडांची संख्या आपल्या लागवडीवर अवलंबून आहे आपण जर उंच जातीच्या झाडांची लागवड केली आणि 20×20 फुटावर लागवड केली तर एकरी जवळपास 70 ते 80 झाडे बसतात, आणि आपण बुटक्या नारळाच्या झाडांची लागवड केली आणि 15×15 फूटावर लागवड केली तर एकरी जवळपास 110 ते 120 नारळाची झाडे बसतात ,
एकरी उत्पन्न: बुटक्या झाडांची लागवड केली तर एकरी 110 तर 120 नारळाचे झाडे बसतात, आणि उंच नारळाच्या झाडांची लागवड केली तर एकरी 70 ते 80 झाडे लागतात आपण सरासरी एकरी शंभर झाडे पकडू , एका झाडाला प्रत्येकी वर्षाला शंभर नारळ लागतात, 100× 100 = 1000 नारळ
20 प्रती नारळ दराने 1000 नारळाचे 2 लाख रुपये होतात ,
म्हणजे मित्रांनो इतर पिकांच्या तुलनेत खूप कमी खर्चामध्ये तुम्ही नारळाची लागवड करून चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता,
हे पण वाचा :
Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती 2024
What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय 2024