Ho to Dragon fruit farming: अशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड 2024

नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये आपण Ho to Dragon fruit farming विषयी माहिती बघणार आहोत .
 ड्रॅगन फ्रुट निवडुंग प्रकारातील वनस्पती असून ते एक विदेशी फळ पीक आहे. याची लागवड संपूर्ण जगामध्ये केली जाते. या फळाचे मूळ  हे उष्णकटिबंधीय आणि कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका  हे आहे.जगातील बऱ्याच देशांमध्ये याची लागवड केली जाते. ड्रॅगन फ्रुट भारतात येऊन पोहोचले आहे. भारतामधील महाराष्ट्र,कर्नाटक, तामिळनाडू,केरळ आणि गुजरात राज्यामध्ये काही शेतकरी या फळ पिकाची लागवड करत आहेत. या लेखात आपणHo to Dragon fruit farmingअशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड माहिती घेणार आहोत.

Ho to Dragon fruit farming: अशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड

Ho to Dragon fruit farming: अशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड

Contents
नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये आपण Ho to Dragon fruit farming विषयी माहिती बघणार आहोत . ड्रॅगन फ्रुट निवडुंग प्रकारातील वनस्पती असून ते एक विदेशी फळ पीक आहे. याची लागवड संपूर्ण जगामध्ये केली जाते. या फळाचे मूळ  हे उष्णकटिबंधीय आणि कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका  हे आहे.जगातील बऱ्याच देशांमध्ये याची लागवड केली जाते. ड्रॅगन फ्रुट भारतात येऊन पोहोचले आहे. भारतामधील महाराष्ट्र,कर्नाटक, तामिळनाडू,केरळ आणि गुजरात राज्यामध्ये काही शेतकरी या फळ पिकाची लागवड करत आहेत. या लेखात आपणHo to Dragon fruit farmingअशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड माहिती घेणार आहोत.Ho to Dragon fruit farming: अशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवडHo to Dragon fruit farming: अशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड1.ड्रॅगन फ्रूट अनुदान योजना :–2.ड्रॅगन फ्रुला लागणारे हवामान:3.जमीन:4.ड्रॅगन फ्रुट लागवड पद्धत:5.पाण्याचे नियोजन:6.खत व्यवस्थापन:7.छाटणी करणे-8.रोगवकिडव्यवस्थापन:9.काढणीतंत्र:
Ho to Dragon fruit farming: अशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड

1.ड्रॅगन फ्रूट अनुदान योजना :

जर तुम्हाला तुमच्या शेतात ड्रॅगन फ्रुट लागवड करायची असल्यास महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवड करणे, ड्रॅगन फ्रुट ची लागवड करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे, ठिबक सिंचन तसेच ड्रॅगन फ्रूट साठी लागणारी खते आणि पीक संरक्षण तसेच ड्रॅगन फ्रूट आधार पद्धत साठी अनुदान हे देण्यात येत आहे. ड्रॅगन फ्रूट अनुदान वितरण करताना प्रति हेक्टर चार लाख रुपये इतके प्रकल्पमूल्य ग्राह्य धरण्यात येते आणि 40 टक्क्यांप्रमाणे एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात अनुदान हे देण्यात येत आहे.

2.ड्रॅगन फ्रुला लागणारे हवामान:

आपल्या येथील हवामान उष्ण कटिबंधीय असल्यामुळे या फळपिकासाठी योग्य आहे. वीस ते तीस सेंटीग्रेड तापमान, जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश आणि शंभर ते दीडशे सेंटिमीटर पाऊस  या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल आहे.   सर्वात कमी आणि अधिक तापमान हे पिकाच्या वाढीसाठी हानिकारक आहे. जास्त पावसामुळे या फळपिकाची फुल आणि फळगळ होते.

3.जमीन:

तसे पाहता हे पीक विविध प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते.पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होणारी जमीन अधिक योग्य असते.वालुकामय चिकन माती सोबत अधिक सेंद्रिय कर्ब असलेली जमीनया पिकास अधिक पूरक आहे. जमिनीचा सामू हा साडेपाच ते साडेसात असला पाहिजे.

Ho to Dragon fruit farming: अशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड

4.ड्रॅगन फ्रुट लागवड पद्धत:

ड्रॅगनफ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीची मशागत ही करून घ्यावी लागेल. त्यानंतर ड्रॅगन फ्रुटच्या दोन झाडांतील अंतर हे 3 मीटर बाय 3 मीटर, 3 मीटर बाय 2.5 मीटर या अंतरावर खड्डे खोदणे त्यानंतर खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचा किमान 6 फूट उंचीचा खांब हा उभा करावा व त्या खांबावर सिमेंट काँक्रिटची फ्रेम ही बसवावी. आणि आपण जो सिमेंट काँक्रिट चा खांब लावाल त्या खांबाच्या चारही बाजूला ड्रॅगन फ्रुट फळ पिकाचं एक एक झाड म्हणजेच चार रोपे लावली. अश्या पद्धतीने ड्रॅगन फ्रुट लागवड करायची आहे.

5.पाण्याचे नियोजन:

या  पिकाला बाकी फळपिकाच्या तुलनेत खूप कमी पाणी लागते. काही महिन्यापर्यंत हे पाण्याचा ताण सहन करू शकते. पण फळधारणेच्या अवस्थेत एका आठवड्यात दोन वेळेस पाणी द्यावे.परंतू उन्हाळ्यात 1-2 लिटर पाणी दररोजप्रति झाड द्यावे.

6.खत व्यवस्थापन:

अधिक उत्पन्नासाठी या पिकाला जास्त प्रमाणात खते द्यावी लागतात. सुरुवातीच्या काळात चांगल्या वाढीसाठी नत्र हे जास्त प्रमाणात द्यावे लागते. पण नंतरच्या काळात स्फुरद आणि पालाश यांची मात्रा अधिक प्रमाणात द्यावी लागतात.

7.छाटणी करणे-

लागवडीपासून दोन वर्षानंतर हलक्या प्रमाणात  छाटणी करावी.रोगट व वाकड्यातिकड्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करावी.तीन वर्षानंतर झाडाला छत्रीसारखा आकार द्यावा.छाटणी केल्यानंतर छाटलेल्या फांदीला बुरशीनाशक लावा.जेणेकरून त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही.

8.रोगवकिडव्यवस्थापन:

या पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. पिठ्या ढेकूण हा काही प्रमाणात आढळतो. त्यासाठी नुवान दीडमिली प्रति लिटर पाणी  याप्रमाणे फवारणी करावी. याला काही प्रमाणात पक्षापासून नुकसान होऊ शकते.त्याचे यापासून रक्षण करावे.त्यासाठी सापळ्यांचा वापर करू शकता.

9.काढणीतंत्र:

लागवड केल्यानंतर 18 ते 24 महिन्यानंतर फळ येण्यास सुरुवात होते,  तीस ते पन्नास दिवसात फळ परिपक्व होते. फळाचा रंग हा अपरिपक्व अवस्थेत हिरवा असतो. नंतर तो परिपक्व अवस्थेत बदलत जाऊन लाल किंवा गुलाबी होतो. फळे लागण्याच्या कालावधी हा तीन ते चार महिने चालतो.या कालावधीमध्ये फळाची छाटणे तीन ते चार वेळेस केली जाते.

10.ड्रॅगन फ्रुट पासून मिळणारे उत्पन्न:

एका फळाचे वजन साधारणतः 300 ते 800 ग्रॅम असतो आणि एका झाडाला वर्षात साधारणतः 40 ते 100 फळे येतात. एका वर्षाला एका झाडापासून  ( एक पोल चार झाड ) 15 ते 25 किलो इतके उत्पन्न मिळते.ड्रॅगन फ्रुटची किंमत 200 ते 250 रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे.ड्रॅगन फ्रुट मधून एकरी चार ते सहा लाख रुपये दरवर्षी उत्पन्न मिळते.

हे पण वाचा :

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय 2024

निष्कर्ष: तुम्हाला सुद्धा ड्रॅगन फूड ची लागवड करायची असेल तर योग्य ती माहिती घेऊन लागवड करू शकता, याच्यामध्ये हमखास चांगले उत्पन्न मिळते. लेख आवडल्यास आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा

धन्यवाद.

Leave a Reply