INDIRA GANDHI VIDHWA PENSION YOJNA:नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये INDIRA GANDHI VIDHWA PENSION YOJNA याविषयी जाणून घेणार आहोत,
INDIRA GANDHI VIDHWA PENSION YOJNA :इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना 2024
Magel tyala shet tale शेत तळ्यासाठी 80% subcidy
महाराष्ट्र सरकारने विधवा स्त्रियांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना दर महिन्याला एक आर्थिक मदत मिळावी म्हणून इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना चालू केली आहे, आपण बघत असतो की समाजामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांचा पती वारल्यानंतर त्यांना खूप साऱ्या अडीअडचणींचा सामना करावा लागतो आणि दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करता शासनातर्फे इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना राबविण्यात येत आहे, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार समाजातील दुबळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यापैकीच ही एक योजना आहे ,
घरातील कर्ता पुरुष गेल्याने आणि पतीच्या आकस्मात निधनाने महिला एकाकी पडतात आणि त्यांना त्यांच्या दैनिक दर्जा भागवणे अवघड होऊन जाते म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना ही योजना सरकारतर्फे राबवण्यात येत आहे ,
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजनेची उद्दिष्टे :
- पतीच्या अकस्मात निधनामुळे महिलांना दैनिक गरजा भागवण्यासाठी इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा फायदा व्हावा .
- विधवा महिलांना कोणत्याही इतर व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये.
3.समाजातील विधवा महिला या आर्थिक रित्या सक्षम आणि आत्मनिर्भर व्हाव्यात.
- समाजातील विधवा महिलांचे राहणीमान आणि जीवनमान सुधारावे.
इत्यादी काही INDIRA GANDHI VIDHWA PENSION YOJNA :इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत,
INDIRA GANDHI VIDHWA PENSION YOJNA :इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना पात्रता:
- अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असावी ,
इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचे फायदे:
- या विधवा महिलांना दैनंदिन आर्थिक गरजा भागवण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही,
- या योजनेमुळे विधवा महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल,
- इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेद्वारे विधवा महिलांना दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जाईल ,
इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेच्या अटी :
- 65 वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या विधवा महिलांना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा फायदा घेता येणार नाही,
- इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे वय 40 वर्षे ते 65 वर्षा दरम्यान असावे,
- इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिला या आर्थिक दृष्ट्या गरीब असाव्यात तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल,
इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कुठे करावा:
जिल्हाधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, व तहसील कार्यालय इत्यादी ठिकाणी तुम्ही इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकता,
How To Apply Farm Pond Online : शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा 2024
इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :
- दारिद्र्यरेषेखालील राशन कार्ड
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- वयाचा दाखला/ जन्म दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- पतीच्या मृत्यूचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
इत्यादी पूर्तता करून तुम्ही इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी तहसीलदार कार्यालय किंवा तुमच्या जवळील सेतू सुविधा केंद्र यांच्याशी संपर्क साधा,
आणि तुमच्याही आसपास कोणी विधवा महिला असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल,