राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता आधार कार्ड, पॅन कार्ड सारख्या महत्वाच्या कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य, ‘या’ तारखेपासून नियम लागू!

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये राज्य सरकारच्या नवीन निर्णयाविषयी माहिती बघू .
भारता मध्ये पुरुषप्रधान संस्कृति आहे , घरामध्ये कर्ता पुरुष असतो आणि घरचा प्रमुख देखील पुरुष असतो आणि आतापर्यंत मुलांच्या नावानंतर फक्त पुरूषांचे म्हणजेच वडिलांचे नाव लावले जायचे परंतु आता महाराष्ट्र सरकारने आता नवीन नियम लागू केला आहे ,

आता आधार कार्ड, पॅन कार्ड सारख्या महत्वाच्या कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य,

आता आधार कार्ड, पॅन कार्ड सारख्या महत्वाच्या कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य,

त्यानुसार आता मुलांच्या नावानंतर अगोदर माता आणि नंतर पित्याचे नाव लावले जाणार आहे ,
महाराष्ट्र साकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महिलांना एक वेगळी ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नुकताच हा निर्णय घेतला आहे, ज्यात जन्म प्रमाणपत्र, शाळेचे दस्तऐवज, मालमत्तेचे दस्तऐवज, आधार कार्ड, पॅन कार्ड अशा सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव अनिवार्य करण्यात आले आहे.

हे पण वाचा :What Is MCWG In Driving Licence:ड्रायव्हिंग लायसन्समध्ये MCWG म्हणजे काय 2024
महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी 1 मेपासून होणार आहे. या नव्या नियमातून अनाथ मुलांना सूट देण्यात आली आहे. 1 मे 2014 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलांना त्यांचे पहिले नाव, त्यानंतर आईचे पहिले नाव आणि नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव नमूद करावे लागणार आहे. विवाहित महिलांच्या बाबतीत, महिलेच्या नावापुढे पतीचे नाव आणि आडनाव लिहिण्याची सध्याची पद्धत सुरू राहील.


महाराष्ट्र सरकारचे मत आहे की, 1 मे किंवा त्यानंतर जन्मलेल्यांनी शाळा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पे स्लिप आणि महसूल कागदपत्रांसाठी या नमुन्यात आईचे नावं नोंदवावे लागेल. याशिवाय जन्म-मृत्यू नोंदणीमध्ये आईचे नावही समाविष्ट करता येईल का, याबाबत आरोग्य विभागाला केंद्राशी बोलण्यास सांगितले आहे.

How To Close Paytm Payment Bank Account:पेटीएम पेमेंट बँक खाते कसे बंद करावे 2024
महिला आणि बाल विकास विभागाने यापूर्वी सांगितले होते की, हा निर्णय मातांच्या महत्त्वाच्या भूमिकेला मान्यता देण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकते कारण सरकारी कागदपत्रांमध्ये वडिलांचे नाव आधीच नमूद केलेले असते आणि ते प्रामुख्याने लिहिलेले जाते.
एक दिवसापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान सांगितले होते की, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि पदवीवर केवळ वडिलांचे नाव नाही तर आईचे नाव देखील असावे. न्यायमूर्ती सी हरी शंकर म्हणाले की, ज्याप्रमाणे मुलगी आणि मुलगा हे पती आणि पत्नी दोघांची संतान आहे त्यामुळे मुला -मुलींच्या नांवासमोर आईचे देखील नाव लावणे बंधनकारक केले आहे ,

Leave a Reply