SBI LOAN: आता घरावर सोलर बसवण्यासाठी SBI BANK देणार कर्ज, पीएम सूर्य घर योजनेचा असा घ्या फायदा. 2024

SBI LOAN:आज आपण या लेखांमध्ये SBI LOAN: पीएम सूर्य घर योजना याविषयी माहिती बघणार आहोत.

SBI LOAN: आता घरावर सोलर बसवण्यासाठी SBI BANK देणार कर्ज,

SBI LOAN: आता घरावर सोलर बसवण्यासाठी SBI BANK देणार कर्ज,

हे पण वाचा : Solar Subsidy Scheme 2024 : सोलर सिस्टम बसवा आणि सोलर योजनेतून मिळणाऱ्या 78 हजार अनुदानाचा लाभ घ्या .
SBI LOAN: मित्रांनो आपण ज्या पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करतो ते नाशवंत आहेत ते एक दिवस संपून जाणार आहेत, म्हणून त्या पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांना पर्याय म्हणून सौर ऊर्जा ला प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जातात त्याच अनुषंगाने केंद्र सरकार तर्फे प्रधानमंत्री सूर्य घर योजना राबवली जात आहे.

नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम सूर्य घर योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास एक कोटी कुटुंबांच्या घराच्या छतावर सोलर सिस्टम बसविण्यात येणार असून या माध्यमातून 300 युनिट मोफत विजेचा फायदा मिळणार आहे.

तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनत बसवण्यासाठी पुरेशी जागा असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात , व सोलर पॅनल बसवून पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाचा फायदा देखील मिळवता येणार आहे. परंतु जरी या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल किंवा सोलर सिस्टम बसवण्यासाठी अनुदान मिळत असले तरी अगोदर करावा लागणारा खर्च हा खूप जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच या योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही .परंतु या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा हीच बाब लक्षात घेऊन आता याकरिता तुम्हाला स्टेट बैंक ऑफ इंडिया कडून कर्ज मिळणे शक्य होणार आहे. त्याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.

SBI बँके कडून कर्ज घ्या आणि सोलर बसवा:
केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून सोलर सिस्टम बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे व हे अनुदान कमीत कमी 30000 ते जास्तीत जास्त 78 हजार रुपये पर्यंत असणार आहे. परंतु अशाप्रकारे सोलर रूफ टॉप बसविण्याकरता येणारा खर्च हा किलो वॅट नुसार असल्यामुळे लाखों रुपयात येतो.

त्याकरता अगोदर स्वतः पैसे खर्च करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशाप्रकारे सोलर सिस्टम किंवा सोलर रूफ टॉप बसवणे बऱ्याच जणांना अशक्य होऊ शकते. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून याकरिता तुम्हाला स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्ज मिळणे शक्य होणार आहे.

जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या घराच्या छतावर सोलर रूफ टॉप बसवण्याकरिता पैसे नसतील तर एसबीआय बँक तुम्हाला कर्ज देणार आहे. स्टेट बैंक ऑफ इंडियाने या योजने अंतर्गत कर्ज योजना सुरु केली असून याअंतर्गत तुम्हाला सोलर पॅनल बसवण्याकरिता कर्ज मिळणार आहे.

हे पण वाचा : PVC PIPE Subssidy : आता मिळवा पीव्हीसी पाईप व पंप सेट वर अनुदान 2024

कोणाला कर्ज मिळू शकते:

समजा तुम्हाला जर तीन किलोवॅट क्षमतेचे सोलर रूफ टॉप बसवण्याकरिता उत्पत्राचे कोणत्याही प्रकारचे निकष नाहीत परंतु तीन किलोवॅट पेक्षा जास्त आणि दहा किलोवॅट पर्यंतच्या क्षमतेकरिता कर्ज हवे असेल तर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

मिळणारे कर्ज व व्याजदर काय राहील:

तुम्हाला जर तीन किलोवॅट क्षमतेचे सोलर रूफ टॉप बसवण्याकरिता तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणे शक्य आहे. त्याचा वार्षिक व्याजदर हा 07 % इतका आहे , तीन किलोवॅट पेक्षा जास्त आणि दहा किलो वॅट पर्यंतच्या क्षमतेसाठी तुम्हाला सहा लाख रुपये पर्यंत कर्ज या माध्यमातून मिळू शकणार आहे.

या करिता वार्षिक व्यादर 10.15 के असणार आहे. 60 ते 70 वर्ष वयोगटातील व्यक्तींना देखील या माध्यमातून कर्ज मिळणे शक्य आहे विशेष म्हणजे या कर्जासाठी बँकेकडून कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.
याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या एसबीआय बँक शाखेशी संपर्क करू शकता.

Leave a Reply