एकरी 5 लाखाची शेती MANGO FARMING आंबा लागवड

      नमस्कार शेतकरी मित्रांनो या लेखांमध्ये आज आपण बघणार आहोत एकरी 5 लाखाची शेती MANGO FARMING आंबा लागवडीविषयी मित्रांनो आपण बघत आहात की शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही, आणि वरून निसर्गाची सुद्धा साथ मिळत नाही ,कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी परेशान असतो. एवढ्या मेहनती नंतर शेती पिकवून उत्पन्नाला योग्य तो भाव मिळत नाही त्यामुळे आता गरज आहे नगदी आर्थिक पिकांकडे  वळण्याची किंवा फळबाग लागवड करण्याची .याच्यातून योग्य तो मोबदला मिळेल तर या भागामध्ये आपण बघणार आहोत आंबा लागवड विषयी संपूर्ण माहिती.

एकरी 5 लाखाची शेती MANGO FARMING आंबा लागवड

 एकरी 5 लाखाची शेती MANGO FARMING आंबा लागवड

जमीन

मित्रांनो आंबा लागवड करण्यासाठी आपण हलक्या किंवा मध्यम स्वरूपाची किंवा जी तुमच्याकडे उपलब्ध असेल ती जमीन निवडू शकता, परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असायला हवी त्यामध्ये पाणी साचून राहता कामा नये. पाण्याचा योग्य निचरा होणारे जमीन अगर नसेल तर फळबाग खराब होण्याची शक्यता असते झाडे मरतात .

खड्डे खोदून घेणे

मित्रांनो फळबाग लागवडीपूर्वी जे काही आपलं अंतर ठरलेलं आहे त्यानुसार खड्डे खोदून घेणे आवश्यक आहेत, उदाहरणार्थ फळबाग लागवड करण्यासाठी लोक अलग अलग अंतराचा वापर करतात कोणी चार बाय आठ तर कोणी आठ बाय बारा तर कोणी 33 बाय 33 या अंतराचा वापर करतात परंतु झाडांची संख्या जास्त बसवण्यासाठी आपल्याला अंतर हे कमी घेणे आवश्यक आहे आपण झाडांची संख्या जास्त बसावी यासाठी चार बाय बारा हे अंतर घेणार आहोत, तेव्हा आपण चार बाय बारा या अंतरावरती जेसीबीच्या सहाय्याने किंवा मजुरांच्या मदतीने चार बाय 12 अंतरावरती खड्डे खोदून घेणार आहोत .

 रोपांची निवड

 मित्रांनो आंबा लागवड करताना रोपांची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे ,तेव्हा योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे .रोपांची निवड करताना नर्सरी वाल्यांकडून फसगत होण्याची शक्यता असते, तेव्हा सरकार मान्य किंवा विश्वासू नर्सरी वाल्यांकडूनच रोपे घेणे आवश्यक आहे .

 

तयार कलमे किंवा बियांची लागवड

मित्रांनो काही शेतकरी हे तयार कलमे घेतात आणि लागवड करतात, तर काही शेतकरी आंब्याच्या कोया स्वतः शेतामध्ये लागवड करतात आणि ते उगवल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर त्याचे कलमे बांधतात, हे माझ्या मते योग्य प्रक्रिया आहे कारण तयार कलमे  घेतल्यानंतर त्या कलमांमध्ये फसगत होण्याची शक्यता असू शकते परंतु आपण स्वतः कलमे तयार केल्याच्या नंतर ती कलमे खात्रीशीर असतात आता तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही करू शकता.

खड्डे भरून घेणे

मित्रांनो खड्डे खोदल्यानंतर त्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे कुजलेले शेणखत निंबोळी पेंड वगैरे किंवा काही सेंद्रिय खते वगैरे असतील ते मिळवून घ्यायचे आहे, आणि गाळ उपलब्ध झाल्यास गाळ टाकून आणि शेणखताने खड्डे भरून घेणे.

सिंचन व्यवस्था

मित्रांनो कोणतीही फळबाग लागवड करण्यापूर्वी आपल्याकडे सिंचनाची योग्य ती व्यवस्था असायला हवी. सिंचन व्यवस्था अगर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपली फळबाग उन्हाळ्यामध्ये तग धरू शकणार नाही, त्यामुळे सिंचनाची व्यवस्था फळबाग लागवडीपूर्वी करून घेणे आवश्यक आहे.

फळबाग लागवडी मधील अंतर

मित्रांनो आंबा लागवड करत असताना अंतर हे खूप महत्त्वाचे असते तर आपण आपल्या फळ बागेमध्ये  लागवड करणार आहोत ती चार बाय   12 या अंतरावरती करणार आहोत या अंतरानुसार आपल्या शेतामध्ये आंब्याच्या झाडांची संख्या जवळपास नऊशे झाड लागणार आहे आणि हे अंतर योग्य अंतर आहे त्यानुसार झाडांची संख्या वाढते.

एकरी 5 लाखाची शेती MANGO FARMING आंबा लागवड

झाडांची कटाई

मित्रांनो आपण जर झाडातली लांबी रुंदी कमी घेतली किंवा दोन झाडांमधील अंतर कमी ठेवल्यास झाडे मोठे होऊन एकमेकांमध्ये दाटू शकतात ,त्यामुळे झाडांची संख्या  दाट असल्याकारणाने झाडांची कटाई करावी लागते. योग्य प्रकारे कटाई केल्यास झाडांना एक योग्य तो आकार प्राप्त होतो आणि झाडे एकमेकांमध्ये दाटणार नाही आणि त्यांना योग्य तो सूर्यप्रकाश मिळू शकतो.

 

खत व्यवस्थापन

मित्रांनो आंबा फळबाग लागवडीसाठी जास्त खर्च करावा लागत नाही, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये झाडांची योग्य ती काळजी घेतल्यास फळबाग लवकर उत्पन्नास तयार होते तेव्हा खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

 

फळांची योग्य ती काळजी

एकरी 5 लाखाची शेती MANGO FARMING आंबा लागवड

 

मित्रांनो फळ बागेला फळे लागल्यानंतर त्या फळांमध्ये काही शेतकरी कागदी पिशव्या वापरतात जेणेकरून फळावरती फळ किड्यांचा प्रादुर्भाव होत नाही, फळांची योग्य ती काळजी न घेतल्यास किडे,फळ माशा फळावरती बसतात आणि फळे खराब करतात ,तेव्हा फळांवरती पिशव्या वापरणे आवश्यक आहे आणि असे केल्यास फळांना योग्य ते बाजार भाव प्राप्त होतो आणि आपला आर्थिक फायदा अधिक होतो .

 

विक्री व्यवस्थापन

विक्री व्यवस्थापन करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जसे की आपण शेतामध्ये वर्षभर मेहनत करून उत्पन्न तयार झाल्यानंतर व्यापाऱ्यांना देऊन टाकतो आणि व्यापारी आपल्याला योग्य तो मोबदला देत नाही, आणि स्वतः मात्र एका दिवसामध्ये काहीही न करता आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक नफा कमवतात ,त्यामुळे आपल्याला शेती करत असताना फळबाग लागवड करत असताना विक्री व्यवस्था करणे देखील महत्त्वाचे आहे. जसे की तुम्ही स्वतः कुठेतरी स्टॉल मांडून विक्री स्वतः करू शकता ज्याने तुम्हाला अधिक आर्थिक फायदा होईल तसेच तुम्ही सोशल मीडियाचा सुद्धा आधार घेऊ शकता खूप शेतकरी सोशल मीडियाच्या आधारे विक्री व्यवस्थापन करत आहेत आणि अधिक नफा सुद्धा मिळवत आहेत.

 

फळबाग तोडणी

मित्रांनो आंबा पाडाला लागल्यानंतर पूर्ण आंबा एकाच वेळी न तोडता आपल्याला जमेल तसे थोडा थोडा तोडून जवळच्या मार्केटमध्ये नेऊन विक्री करणे ज्याने तुम्हाला योग्य तो भाव मिळू शकतो, पूर्ण फळबाग एकाच वेळी तोडल्यामुळे भावामध्ये चढ-उतार झाल्याचा फटका तुम्हाला लागू शकतो.

 

एकूण उत्पन्न

मित्रांनो आपण शेती करत असताना एकरी एक लाख रुपये पर्यंत उत्पन्न बाकी पिकांमध्ये होऊ शकतं परंतु आंबा लागवडीमध्ये एकरी पाच लाखापर्यंत उत्पन्न आरामशीर होऊ शकतं  एका एकर मध्ये आंब्याची 900 झाडे बसतात  .  900 झाडाला प्रत्येकी पाच किलो आंबा सुद्धा लागला आणि शंभर रुपये किलो जरी भाव मिळाला  तरी जवळपास पाच लाख रुपये उत्पन्न एका एकर मध्ये होते .

 

                                                                      900 × 5= 45,000

 

                                                                 45,000 × 100 = 450000/_

हे पण वाचा : 

सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात 

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

निष्कर्ष

 आंबा फळबाग लागवड योग्य प्रकारे केल्यास त्यामध्ये आर्थिक फायदा खूप चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो .

मित्रांनो या लेखामध्ये आज आपण आंबा फळबाग लागवडीविषयी संपूर्ण माहिती बघितली लेख आवडल्यास  लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा,

धन्यवाद.

Leave a Reply