एकरी 12 लाखाची खजूर शेती

नमस्कार मित्रांनो आज आपण एकरी 12 लाखाची खजूर शेती या लेखामध्ये खजूर शेती विषयी सखोल माहिती जाणून घेणार आहोत , ज्यामध्ये आपण जमीन , पानी व्यवस्थापन , विक्री व्यवस्थापन इत्यादि विषयी बघू .

एकरी 12 लाखाची खजूर शेती

एकरी 12 लाखाची खजूर शेती

मित्रांनो खजूर शेती ही अत्यंत फायद्याची शेती आहे , खजूर ही एक जंगली प्रकारातील  विदेशी वनस्पति आहे ,खजूर या पिकासाठी पाण्याची जास्त गरज लागत नाही .

हे पीक कमी पाण्यात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे येते आजकाल जिथे पाण्याची कमतरता आहे , व वाळवंटी प्रदेशात सुद्धा खजूर या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे .

लागवड पद्धत : 1) कलम 

2) बीज लागवड

मित्रांनो खजूर या पिकाची लागवड आपण दोन प्रकारे करू शकता कलम पद्धत आणि बीज लागवड करून परंतु कलम पद्धत फायदेशीर आहे ,कारण कलम हे मोठे मिळते आणि सूदरूड निरोगी कलम मिळते .

कलम घेताना घ्यावयाची काळजी :

खजूर कलम घेताना टिशू कल्चर कलम घ्यावे ,टिशू कल्चर कलमा मध्ये नर मादा कोणती आहे ते आपल्याला समजते ,कमी जास्त होण्याचे प्रमाण खूप कमी असते ,

इतर कलम घेतल्यावर नर मादा कमी जास्त होतात ,

विक्री व्यवस्थापन :मित्रांनो आपण वर्षभर शेतामध्ये मेहनत करून जे पीक पिकवतो त्याला चांगला बाजार भाव आपल्याला मिळत नाही त्याचा फायदा व्यापारी वर्गाला होतो, व्यापारी आपल्याकडून स्वस्तात घेऊन तिकडे डबल किमतीने विक्री करतात ,तुम्ही बघितले असेल आपण बाजारामध्ये भाजीपाला वगैरे घेऊन जातो आपल्याकडून दहा रुपये  किलो  घेऊन लगेच वीस रुपये किलोने ते  विकतात आणि आपल्यापेक्षा दुप्पट नफा ते एक दिवसांमध्ये कमवतात आणि आपण एवढी मेहनत करून एवढा खर्च करून पाहिजे तसा नफा कमवू शकत नाही , त्यामुळे एखाद्या शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी शक्य असल्यास एखादा स्टॉल लावून स्वतः  खजूर विक्री केल्यास तुम्हाला चांगला  बाजार भाव मिळू शकतो एक चांगल्या प्रकारे तुम्ही नफा कमवू शकता मित्रांनो   पीक  पिकवण्याबरोबरच विकणे सुद्धा महत्त्वाचे आहे विकता  सुद्धा आले पाहिजे,

 प्रत्येक व्यक्तीला ती शक्य होत नाही प्रत्येकाला एवढा वेळ नसतो की ते एक ठिकाणी बसून आपला पिकवलेला माल विकू  शकेल परंतु ज्याला शक्य आहे त्याने तरी किमान असे केले पाहिजे , आपण स्वतः बसून विकल्यास खजूर प्रती  किलो दोनशे रुपये या दराने विकल्या जाते.

आंतरपीक: आपले खजुराची झाडे जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत आपण त्यामध्ये कमी उंचीचे पीक घेऊ शकता जसे की भाजीपाला ,सोयाबीन , अद्रक वगैरे ज्याने आपणास दुहेरी फायदा होईल,

मधमाशी पालन: खजूर पीक है परागीभवनावर अवलंबून आहे जेवढे जास्त परागीभवन तेवढे जास्त उत्पन्न त्यामुळे परागीभवनासाठी मधमाशी शिवाय दुसरा चांगला पर्याय नाही तेव्हा मधमाशीच्या काही पेट्या खजुराच्या बागेमध्ये ठेवल्यास मधमाशांमुळे परागीभवन होऊन उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल त्याचा चांगला फायदा आपल्याला होईल तेव्हा तुम्ही लागवड करत असल्यास मधमाशी पालन आवर्जून करावे जेणेकरून आपल्याला दुहेरी फायदा होईल

एकरी 12 लाखाची खजूर शेती

 कोंबडी पालन : खजुराच्या बागेमध्ये शक्य असल्यास आपण कोंबडी पालन सुद्धा करू शकता ज्याने आपल्याला मास व अंडी मिळतील व आपल्या बागेमध्ये जे काही लहान लहान  गवत उगवेल ते कोंबड्या खाऊन टाकतील त्यामुळे आपल्याला  खुरपणीचा खर्च करावा लागणार नाही आणि कोंबडी पालनातून आर्थिक फायदा सुद्धा होईल

एकरी झाडांची संख्या :एक एकर मध्ये खजुरची 65  झाडे लागतात त्यामध्ये 60 झाडे मादी तर 5 झाडे  नराची लावतात ,

ही लागवड 15 फुटावर करतात .

जमिनीची निवड :  खजूर लागवड करण्यासाठी हलकी व मध्यम स्वरूपाची व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी , त्यामध्ये पावसाचे पानी जमणार नाही याची काळजी घ्यावी .

फळांची घ्यावयाची काळजी :  खजूर फळ  पावसाच्या पाण्याने खराब होते ,ते खराब होऊ नये म्हणून त्याच्या वरुण पोलीथीन लावावी लागते .

आर्थिक फायदा : खजूर झाड 3 वर्षात फळ द्यायला सुरवात करते , सातव्या वर्षी एक झाडाला 100 किलो फळ लागतात आणि खजूर फळाला 200 रुपये किलो भाव मिळतो .

एक एकर मध्ये झाडांची संख्या 60

एक झाडाला लागणारे फळ 100 किलो

60*100 =6000 किलो फळ

6000*200=1200000 एकूण उत्पन्न

 

हे पण वाचा :

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?

तर आपण बघितले मित्रांनो की आपण किती सहज आणि सोप्या प्रकारे खजूर शेती करून आपला आर्थिक फायदा करू शकता .

अशीच नवनवीन माहिती मिळवण्या साठी पेज ला लाईक करा व आमच्या whats app ग्रुप ला जॉइन करा

 

धन्यवाद ..

 

Leave a Reply