नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये बुटक्या नारळाची शेती करा आणि एकरी 5 लाख रुपये कमवा या विषयी सखोल माहिती बघणार आहोत .
मित्रांनो नारळाच्या झाडाला माड , नारळ , कल्पतरू अशा अनेक नावांनी ओळखले जाते , नारळाच्या झाडाचे प्रतेक अवयव कामात येतात , कोणताही पार्ट अनुपयोगी नाही असा हा कल्पतरू बहुपयोगी आहे ,
बुटक्या नारळाची शेती करा आणि एकरी 5 लाख रुपये कमवा
चला तर जाणून घेऊया सखोल माहिती ,
लागवडीसाठी जमीन : जमिनी विषयी बोलायचे झाले तर नारळ लागवडीसाठी कोणत्याही जमिनीची निवड आपण करू शकता ,फक्त आपल्याला पाण्याची उपलब्धता असावी , कारण जमीन हलकी असली तरी चालेल परंतु पानी भरपूर असावे .
नारळ लागवडिपूर्वी जमिनीची ट्रॅक्टर च्या साह्याने चांगली खोल पूर्व मशागत करून घ्यावी ,व एक एकर जमिनीमध्ये 12 बाय 15 असे अंतर ठेऊन खड्डे खोदून घ्यावे व आपल्याकडे शेण खत वैगेरे जे असेल ते शेतात किंवा खड्ड्यात टाकून घ्यावे , आणि लागवड करण्यापूर्वी निंबोळी पेंड आणि बुरशीनाशक टाकून खड्डे व्यवस्थित भरून घ्यावे .
लागवडीसाठी कलम : कलम आपण घरी सुद्धा तयार करू शकता परंतु नर्सरी मधून कलम घेतयास खात्रीशीर कलम आपणास मिळू शकते , आणि कलम खात्रीशीर असल्यास उत्पन्न देखील चांगले मिळते . कलम खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी जेणेकरून फसवणूक होणार नाही , कारण आजकाल नर्सरी वाल्यांनी सुद्धा कलम विक्री करण्याचा धंदा चालू केला आहे .
नारळाच्या जाती : नारळाच्या सुधारित जातीमध्ये उंच वाढणाऱ्या जाती व ठेंगू जाती असे दोन प्रकार पडतात. त्यापैकी उंच वाढणाऱ्या जातीमध्ये प्रताप, वेस्ट कोस्ट टोल किंवा बानवली, लक्षदीप ऑर्डिनरी (चंद्र कल्प), लक्षदीप मायको, फिलिपिन्स ऑर्डिनरी व केरा बस्तर या 6 जाती महत्त्वाच्या आहेत.
नारळाच्या ठेंगु जातीमध्ये चौघाट ग्रीन डॉर्फ, चौघाट ऑरेंज डॉर्फ, मलायन ग्रीन डॉर्फ आणि मलायन येलोडॉर्फ व गंगाबोडम या 4 जाती महत्त्वाच्या आहेत.
चौघाट ग्रीन डॉर्फ : ही जात केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यात चौघाटामध्ये प्रथम आढळली. या जातीस तीन ते चार वर्षानंतर फळधारणा होते. प्रति झाडापासून प्रति वर्ष 30 ते 160 नारळ मिळतात. यामध्ये खोबर्याचे प्रमाण 38 ते 100 ग्रॅम आहे. एका नारळापासून सरासरी 60 ग्रॅम खोबरे मिळते. यामध्ये तेलाचे प्रमाण 72 टक्के असते.
एक एकर मध्ये झाडांची संख्या : मित्रांनो 12 बाय 15 फुटावर लागवड केल्यास एक एकर जमिनीमध्ये नारळाची 250 झाडे बसतात .प्रतेक शेतकरी आपल्या अनुसार वेगवेगळे अंतर ठेवतात परंतु मध्ये योग्य आंतर असणे आवश्यक आहे , अंतर कमी असेल तर झाडे एकमेकांत घुसू शकतात , त्यामुळे ठराविक अंतर ठेवावे आणि 12 बाय 15 अंतर हे योग्य अंतर आहे ,
खत व्यवस्थापन : नारळाच्या झाडांना रासायनिक खत देण्याची आवश्यकता भासत नाही , परंतु शेण खत तसेच सेंद्रिय खत दिल्यास उत्पन्नात अवश्य भर पाहायला मिळेल .
पानी व्यवस्थापन : मित्रांनो पानी हा कोणत्याही पिकासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे , आणि विशेष करून नारळ या पिकासाठी पाण्याची गरज इतर पिकांपेक्षा जरा जास्तच असावी लागते , त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करू शकता जसे की कॅनल , शेततळे , विहीर इत्यादि . चा वापर करू शकता नारळ झाडाच्या बाजूला सरी तयार करून सरी पद्धतीने पानी देऊ शकता , पानी कमी असल्यास ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करू शकता . पाण्याचा योग्य आणि काटेकोर वापर केल्यास आज शेतकरी कमी पाण्यात सुद्धा नारळ शेती यशस्वी पने करत आहेत .
नारळापासून एकरी उत्पन्न : मित्रांनो 12 बाय 15 फुटावर लागवड केल्यास एक एकर जमिनीमध्ये नारळाची 250 झाडे बसतात . एक झाडाला सरासरी एक वर्षात 300 ते 500 नारळ लागतात परंतु आपण कमीत कमी वर्षाला एक झाडाला 100 नारळ पकडले आणि आणि एका नरळला 50 ते 60 रुपये भाव मिळतो परंतु आपण फक्त 20 रुपये प्रती नारळ प्रमाणे भाव पकडला तरी
100×250 = 25000 नारळ
25000× 20 = 500000 पाच लाख रुपये
म्हणजे कमीत कमी मेहनतीमध्ये एकरी 5 लाख रुपये उत्पन्न आपण नारळ लागवडीमधून घेऊ शकतो .
आंतर पीक :
1. भाजीपाला : आपण नारळ बागेमध्ये भाजीपाला वर्गीय पिके घेऊ शकता ,
2. मधमाशी पालन : शेतकरी मित्रांनो आपण नारळ बागेमध्ये मध माशांचे बॉक्स ठेऊ शकता आणि मधमाशी पालन करू शकता ,
3. गांवराण कोंबडी पालन : मधमाशी पालन सोबत आपण गांवराण कोंबडी पालन सुद्धा करू शकता ज्यामधून तुम्हाला अंडी आणि मास तसेच पिल्ले सुद्धा मिळतील यामधून तुम्हाला दुहेरी आर्थिक फायदा मिळेल.
हे पण वाचा :