mhais palan दहा म्हशी पासून कमवा महिना 2,50,000 अडीच लाख रुपये नफा

नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये आपण बघणार आहोत दुग्ध व्यवसाय विषयी सखोल माहिती या लेखामध्ये आपण कशाप्रकारे चांगला नफा कमवू शकतो आणि आपला दुग्ध व्यवसाय यशस्वीरित्या वाढवू शकतो याविषयी माहिती बघणार आहोत,

तर मित्रांनो दुग्ध व्यवसाय करताना कोण कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत , कोण कोणते नियोजन अगोदर करावे लागते त्याविषयी आपण बघणार आहोत.

दहा म्हशी पासून कमवा महिना 2,50,000 अडीच लाख रुपये नफा

दहा म्हशी पासून कमवा महिना 2,50,000 अडीच लाख रुपये नफा:

दुग्ध व्यवसाय करण्या अगोदर आपल्याकडे चाऱ्याचे नियोजन असणे गरजेचे आहे कारण जनावरांना खाण्यासाठी चारा वगैरे मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तरच ते चांगल्या प्रकारे दूध देऊ शकतात जसे मानवासाठी अन्न वस्त्र निवारा गरजेचे आहे तसेच जनावरांसाठी सुद्धा अन्न व निवारा गरजेचा आहे त्याचे नियोजन कसे करावे ते आपण थोडक्यात बघूया.

निवारा : आपण आपल्या परिस्थितीनुसार जनावरांचा गोठा बांधू शकता गोठा तुम्ही जसा बांधाल तसा बांधू शकता जेवढा खर्च तुम्हाला झेपेल तेवढा खर्च तुम्ही त्याला लावू शकता , किती खर्च लावायचा हा आपल्यावर अवलंबून आहे, तुमच्याकडे जर आर्थिक बाजू तुमची मजबूत असेल तर तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे सिमेंटेड गोठा बनवू शकता ,जर तुमची आर्थिक बाजू कमजोर असेल तर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात बांबू वगैरे वापरून तात्पुरता गोठा बनवू शकता आणि मग दूध विक्रीतून पैसे आल्यानंतर चांगल्या प्रकारचा गोठा बनवू शकता,

पाण्याचे नियोजन : मित्रांनो माणूस असो किंवा जनावर असो किंवा कोणताही सजीव असो त्यासाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे , जनावरांना सुद्धा पाणी हे मुबलक प्रमाणात उपलब्ध पाहिजे पाण्याचा हौद वगैरे किंवा बोरवेल जे तुम्हाला शक्य होईल ते करून तुम्ही पाण्याचे नियोजन अगोदर करून घ्यावे जेणेकरून आपल्याला वर्षभर पाणीपुरवठा होईल वर्षभर पाण्याची कमतरता भासणार नाही , खास करून म्हैस पालनामध्ये पाण्याची उपलब्धता जास्त असायला हवी,

चारा नियोजन : दुग्ध व्यवसाय करण्यापूर्वी आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये चारा उपलब्ध पाहिजे जेणेकरून वर्षभर आपल्याला जरा जनावरांना मुबलक चारा उपलब्ध राहील त्यासाठी आपल्याकडे जी काही थोडीफार जमीन आहे तिचा आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो ,त्यामध्ये अलग अलग प्रकारचे गवत वगैरे आपण पेरू शकता . गवतामध्ये गवताचे अनेक प्रकार आहेत दशरथ घास , बाजरी ,मक्का ज्वारी इत्यादी प्रकारचे पिके व गवत आहेत .
काही शेतकरी मका पासून मुरघास सुद्धा बनवतात आणि तो वर्षभर कामात येतो त्याला खूप आवडीने जनावर वर्षभर खातात.

आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी कोणत्या जातीची निवड करावी हे खूप महत्त्वाचे आहे, मित्रांनो जगामध्ये , भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हशींच्या अलग अलग जाती आहेत परंतु काही मोजक्या जाती आहेत ज्यांचे पालन शेतकरी करतात .
मुऱ्हा :मित्रांनो आपण अगोदरच बघितले कीम्हशींच्या खूप सार्‍या जाती आहेत परंतु आपण येथे फक्त एकाच जाती विषयी बघणार आहोत कारण सर्वात जास्त लोक तिचेच पालन करतात आणि ती आहे हरियाणातील खूप प्रसिद्ध अशी मुऱ्हा जातीची म्हैस दूध व्यवसायासाठी खूप नावाजलेली अशी जात आहे आणि ती आपल्याकडे आपल्या वातावरणामध्ये सहज प्रकारे सूट होते.

दहा म्हशी पासून कमवा महिना 2,50,000 अडीच लाख रुपये नफा:

मित्रांनो आपण आपल्या आसपास कुठे म्हैस भेटत असेल तर तिथून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला एकदम खात्रीशीर हवी असेल तर तुम्ही हरियाणा मध्ये जाऊन स्वतः घेऊन येऊ शकता यामध्येफसगत होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते , तुम्हाला मुर्रा म्हणून दुसऱ्या जातीचे म्हैस सुद्धा दिल्या जाऊ शकते तर आपण मुर्रा जातीची म्हैस कशी ओळखावी हे बघू .

मुर्रा जातीची ओळख : मित्रांनो म्हशीची ओळख ही तिच्या शरीराची रचना तिच्या शिंगांची रचना सडातील /कासातील अंतर, रुंद तोंड ,निमुळता माथा इत्यादी गोष्टीवरून होते.

मुर्रा जातीच्या म्हशी बारा लिटर ते अठरा लिटर पर्यंत दूध देतात ,
मित्रांनो दुग्ध व्यवसाय करताना आपण अगोदर कमी जनावरांपासून सुरुवात करावी पाच ते दहा जनावरांपासून आपण सुरुवात करावी आणि हळूहळू जनावरांची संख्या वाढवत जावे जेणेकरून आपल्याला अनुभव सुद्धा येतील आणि काही नुकसान होण्याचे जे प्रमाण आहे ते कमी होईल .चारा वगैरे कसे लागते काय लागते पाणी किती हवे कसे नियोजन करायचे याचा सर्व अभ्यास आपला होईल त्यामुळे सुरुवातीला जनावरे कमी ठेवावीत.

दूध व्यवसायातील काही अडचणी: बरेच शेतकरी दुग्ध व्यवसाय सुरू करतात आणि त्यांचा व्यवसाय कालांतराने काही दिवसानंतर बंद पडतो त्याची बरेच कारणे आहेत त्यामध्ये आपण काही मोजके कारणे बघणार आहोत,

माहितीचा अभाव : बरेच शेतकरी दुसऱ्याचे बघून दुग्ध व्यवसाय सुरू करतात पण त्यांना माहितीचा अभाव असतो किंवा त्या गोष्टीची पुरेपूर माहिती नसते अनुभव नसतो आणि मोठ्या प्रमाणात जनावरही घेऊन हे व्यवसाय सुरू करतात पण त्याचे काटेकोर नियोजन ते करू शकत नाही , दूध विक्री कुठे करायची उरलेला दुधाची विल्हेवाट कशी लावायची चारा पाण्याचे नियोजन कसे करायचे या गोष्टींमध्ये ते अपयशी ठरतात आणि आपला दुग्ध व्यवसाय जो आहे तो बंद करतात.

म्हशी गाभ न राहणे : बरेच शेतकरी दूध व्यवसाय सुरू करतात मात्र जनावरांकडे पुरेसं लक्ष न दिल्यामुळे त्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागते जसे की म्हशी गाभण न राहणे या त्यातील काही महत्त्वाच्या समस्या आहेत, त्यामध्ये आपल्याला ओळखता आले पाहिजे की त्यांचा गाभ राहण्याचा काळ कोणता आहे कधी गांभ राहतात , गाभ रहात नसेल तर काय उपाययोजना करावी या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला माहित पाहिजे.

गावरान म्हशी : बरेच शेतकरी गावरान म्हशी पाळतात आणि मग गावरान म्हशी तुलनेने कमी दूध देतात आणि त्यामुळे केलेला खर्च निघत नाही, दुधाचे रेट सुद्धा जास्त कमी आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून ते आपला दुग्ध व्यवसाय बंद करतात.

विकतचा चारा : ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती आहे स्वतःचा चारा आहे ते तर ठीक आहे परंतु काही शेतकरी विकतचा चारा घेऊन दूध व्यवसाय करतात आणि मग सर्व गोष्टी विकत असल्यामुळे पुरेसा नफा त्यांना मिळत नाही म्हणून काही शेतकरी आपला दूध व्यवसाय बंद करतात ,

दुधाची सायकल व्यवस्थित न बसणे: काही शेतकऱ्यांकडे उदाहरणार्थ दहा म्हशी आहेत आणि त्या दहा च्या दहा सुद्धा एकाच वेळेस दूध देतात जोपर्यंत दूध देतात तोपर्यंत तर ठीक आहे परंतु पाच सहा महिन्याच्या नंतर त्यांनी दूध देणं बंद केल्यानंतर त्यांचा खर्च निघायचा कसा हा सर्वात मोठा प्रश्न शेतकर्यानपुढे असतो त्यामुळे दुधाची एक सायकल तयार करावी लागते पाच सहा महिने झाल्याच्या नंतर काही कालांतराने काही अंतराने निम्म्या म्हशी चे रेतन करावे जेणेकरून काही म्हशी दूध देत आहेत तोपर्यंत काही म्हशी गाभ राहिल्या पाहिजे जेणेकरून नेहमी दूध पुरवठा आपल्याकडे चालू राहावा आणि दूध विक्री चालू असल्याने आपल्याला अडचण येणार नाही.

दहा म्हशी पासून कमवा महिना 2,50,000 अडीच लाख रुपये नफा

शेण आणि मूत्र नियोजन : मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याकडे जनावरांची संख्या जास्त असल्यामुळे आपण दुधाबरोबरच शेणखतापासून सुद्धा चांगल्या प्रकारे नफा कमवू शकतो बऱ्याच ठिकाणी शेणखताचे एक ट्रॅक्टरची ट्रॉली खताची किंमत आहे ती पाच हजार रुपये आहे दुधा इतपत नफा शेणखतापासून सुद्धा शेतकरी मिळवतात माझ्या ऐकण्यात आहे की एका शेतकऱ्याने फक्त शेणखत विकून एक कोटीचा बंगला बांधलेला आहे ,
बऱ्याच शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन केलेले आहे त्यापासून ते गोबर गॅस निर्मिती करतात आणि आपल्या संपूर्ण परिवाराचा स्वयंपाक वगैरे सर्व त्यावरती करतात आणि अशा प्रकारे दुहेरी फायदा ते घेतात ,

दुग्ध व्यवसाय करण्यासाठी भांडवल: आजकाल बऱ्याच सोयी सुविधा उपलब्ध आहेत बऱ्याच बँका सुद्धा आपल्याला कर्ज देतात त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्र मधून सुद्धा आपण कर्ज वगैरे घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करू शकता राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांसाठी रोज नवनवीन योजना राबवत असते त्या योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता ,

 

म्हशी पासून मिळणारे उत्पन्न : तुम्ही जर दहा म्हशी पासून सुरुवात केली तर रोजचे एक सहा हजार रुपयचे दूध आपण विकू शकतो दुधाचा रेट आहे 60 रुपये रोजचे आपण शंभर लिटर दूध पकडले 12 ते 18 लिटरपर्यंत दूध देतात परंतु आपण फक्त दहा लिटर पकडले तर दहा लिटर प्रत्येकी म्हणजे दहा मशीन चे 100 लिटर दूध त्याचे पैसे होतात सहा हजार रुपये 6000 रुपयांमधून खर्च वजा जाता दिवसाला तीन हजार रुपये जरी पकडले तरीसुद्धा महिन्याला 90 हजार रुपये शिल्लक राहतात आणि मग तुम्ही महिन्याला एक- एक ,दोन -दोन म्हैस वाढवत गेले तर तुमचा नफा सुद्धा याच प्रकारे वाढू शकतो .

मित्रांनो दूध ही आपली प्रत्येकाची एक गरज आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक वेळेस आपल्याला दूध पाहिजे ते लहान मुलांना असो ,चहाला असो किंवा इतर काही कारणास्तव परंतु दूध हा आपल्या आयुष्यातील खूप खूप महत्त्वाचा घटक आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की दुधाचा वापर खूपच प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचे उत्पन्न हे खूप कमी आहे त्यामुळे बाजारामध्ये भेसळयुक्त दुधाचे प्रमाण वाढलेले आहे ज्यामुळे खूप सार्‍या रोगांना निमंत्रण मिळते केमिकलयुक्त दूध बाजारामध्ये मिळत आहेत ,ज्याचे खूप सारे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात , तर मित्रांनो या आजारांपासून आपल्याला दूर राहायचे असेल तर किमान आपल्याला स्वतःच्या गरजेपुरते तरी दूध स्वतःच्या घरी मिळायला हवे त्यासाठी किमान एक तरी जनावर आपल्याला स्वतः शक्य असल्यास पाळले पाहिजे.

हे पण वाचा 

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?

limbu : कागदी  लिंबू लागवड शेतकऱ्या चे ATM एकरी 6 लाख रुपये उत्पन्न

FAQ

1.दुग्ध व्यवसायातील समस्या
2.महेशगाभ न राहणे
3.दुग्धपालनासाठी कोणता चारा तेरावा
4.गोठ्याचे नियोजन कसे करावे

Leave a Reply