Anjir : अंजीर लागवड 6 महिन्यात 6 लाख रुपये

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये Anjir अंजीर लागवड विषयी माहिती बघणार आहोत ,

Anjir : अंजीर लागवडीतून 6 महिन्यात 6 लाख रुपये

Anjir : अंजीर लागवड 6 महिन्यात 6 लाख रुपये

व्यापारी दृष्टिकोनातून अंजिराची लागवड फक्त महाराष्ट्रा मध्ये केली जाते,
पुणे जिल्ह्यातील काही भाग म्हणजेच नीरा नदीचे खोरे हे सध्या अंजीर लागवडीसाठी प्रमुख ठिकाण आहे,
अंजीर हे कमी पाण्यावर येणारे काटक फळ आहे त्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही कमी पाण्यात सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न ते देते,

अंजीर हे कमी पाण्यावर येणारे पीक असल्यामुळे अंजिराची लागवड दुष्काळग्रस्त भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जात आहे,

अंजीर हे आरोग्यवर्धक फळ आहे आरोग्यासाठी त्याचे खूप सर्व फायदे आहेत,

Anjir : अंजीर लागवड 6 महिन्यात 6 लाख रुपये

हवामान: उष्ण व कोरडे हवामान अंजीर या पिकासाठी खूप चांगले असते त्यामुळे मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे,

जमीन : अंजीर या पिकासाठी हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन लागते पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असायला हवी,
हलक्या माळरानापासून ते मध्यम काळ्या ते तांबड्या जमिनीत सुद्धा अंजीर पीक चांगले येते,

भरपूर चुनखडी असलेल्या तांबूस काळ्या जमिनीत अंजीर उत्तम वाढते,

Anjir : अंजीर लागवडीतून 6 महिन्यात 6 लाख रुपये

Anjir : अंजीर लागवड 6 महिन्यात 6 लाख रुपये

अंजीर या पिकाला काळी कसदार जमीन चालत नाही हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन चांगली असते,
पाणी धरून ठेवणारी जमीन असेल तर अंजिराचे झाड हे पाहिजे तसे वाढत नाही पाण्याचा निचरा झाला पाहिजे,

अंजिराच्या जाती अंजिराच्या खूप साऱ्या जाती आहेत परंतु पुणे अंजीर ही जात जास्त लागवड केली जाते,

अंजिराची लागवड फाटे कलम पद्धतीने केली जाते त्यासाठी उत्तम फळ देणाऱ्या झाडावरील रोगमुक्त फांद्या निवडल्या जातात आणि त्यांची कलमे तयार केली जातात व ती लावली जातात,
फाटे कलम करून ते गादीवाफ्यावरलावले जातात,

लागवड : पावसाळ्यापूर्वी शेताचे उत्तम मशागत करून घ्यावी आणि त्यानंतर पाच बाय पाच मीटर अंतरावर दीड बाय दीड फूट चे खड्डे खोदून घ्यावे या प्रमाणात जर आपण लागवड केली तर हेक्टरी 400 झाडांची लागवड करता येते एकरी जवळपास 200 झाडे लागतात,

गड्डे खोदून घेतल्यानंतर त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट निंबोळी पेंड रासायनिक खत थायमेट किंवा बुरशीनाशक इत्यादी टाकून गड्डे व्यवस्थित भरून घ्यावे,
आणि त्यानंतर त्यामध्ये फाटे कलमांची लागवड करावी,
ही लागवड जवळपास जून जुलैमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यानंतर करावी,

आणि गरजेनुसार त्यांना पाणी देत राहावे झाडाची वाढ होण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची योग्य ती काळजी घ्यावी, झाड चांगले वाढले झाडाचा आकार चांगला झाला तर उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे येते, म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये झाडाची योग्य वाढ करणे गरजेचे आहे, त्यासाठी योग्य ते रासायनिक खते सर्व काही देणे गरजेचे आहे,
पाणी व्यवस्थापन अंजिराच्या झाडाला जास्त पाण्याची गरज लागत नाही परंतु झाडे फळाला आल्यानंतर ऑक्टोबर ते मे महिन्यात नियमित पाणी द्यावे

आंतरपीक :अंजिरामध्ये तुम्ही आंतरपीक घेऊ शकता परंतु ते जास्त उंच वाढणारे नसावे आणि ज्याने अंजीर हे आपले मुख्य पीक आहे त्याला कसलेही अडचण होणार नाही या प्रकारचे पिक घ्यावे त्याच्या मुळया खोल जाणाऱ्या नसाव्या कमी उंचीची वाढणारी पिक असावे व कमी कालावधीमध्ये येणारे असावे,

बहार :अंजीर या पिकाला वर्षातून दोन वेळेस बाहर येतो,
पहिला बहार पावसाळ्यात येतो पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला खट्टा बहार म्हणतात,
तर उन्हाळ्यात येणाऱ्या बहाराला मिठा बहर म्हणतात खट्टा बहरात येणारी फळे जुलै किंवा ऑगस्टमध्ये तयार होतात खट्टा बहारापेक्षा मिठा भारत येणारी फळे ही अत्यंत चवदार असतात आणि जास्तीत जास्त लोक मिठा बहारच घेतात,

मिठा बहार मध्ये येणारी फळे ही चांगल्या दर्जाचे असतात आणि त्यांना बाजार भाव सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतो,

कीड व्यवस्थापन :अंजली या पिकावर कसलेही रोगराई येत नाही याला जास्त औषधांची मात्र द्यावी लागत नाही फक्त एक खोड किडीचा प्रादुर्भाव होतो त्यामध्ये खोडाला किडे लागतात तेवढा एक खोडकिडीचा बंदोबस्त केला तर त्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही रोग यावर येत नाही,

आणि नैसर्गिक आपत्तीचा कसलाही परिणाम अंजिरा पिकावर होत नाही,

Anjir : अंजीर लागवडीतून 6 महिन्यात 6 लाख रुपये

उत्पन्नाला सुरुवात :सुरुवातीची दोन-तीन वर्ष झाडांची वाढ चांगली होऊ द्यावी त्यावेळेस उत्पन्न घेऊ नये चौथ्या वर्षापासून तुम्ही उत्पन्नाला सुरुवात करू शकता कारण तोपर्यंत झाडाची वाढ ही चांगली झालेली असते झाडाचा आकार चांगला झालेला असतो त्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पन्न तुम्ही घेऊ शकता ,
झाडांची योग्य काळजी घेतली तर चौथ्या वर्षापासून प्रति झाड 25 ते 30 किलो फळ एका झाडापासून मिळते
झाडांची वाढ योग्य प्रकारे झाल्यानंतर सात ते आठ वर्षांमध्ये एकरी 150 ते 160 किलो प्रति झाडाला माल मिळतो,

आणि एकरी पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न सहजरीत्या तुम्हाला अंजीर शेती मधून मिळते,

अंजीर हे पीक डाळिंबाच्या बागेला पर्याय म्हणून समोर येत आहे डाळिंब बागेवरती तेल्या कुजवा यांसारख्या खूप रोगराई येतात आणि खूप आर्थिक नुकसान होते त्यापेक्षा अंजीर हे असे ठीक आहे ज्या वरती खूपच कमी प्रमाणामध्ये किडींचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी डाळिंब पिकाला पर्याय म्हणून अंजीर पिकाकडे बघायला हरकत नाही,

हे पण वाचा :

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

chandan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती

1.अंजीर लागवड कशी करतात

2.अंजीर लागवड कधी करतात

3.अंजीर कुठे लागवड करतात

4.अंजीर एकरी उत्पन्न

Leave a Reply