शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले आणि त्या संदर्भात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे त्याविषयी आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत,
नोव्हेंबर, २०२3 अवेळी पाऊस व गारपीट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार ?
बळीराजा हा अनेक पिकांची लागवड करत असतो परंतु काही नैसर्गिक आपत्ती असतात जसे की गारपीट अवेळी पाऊस अतिवृष्टी किंवा सुखा दुष्काळ इत्यादी अनेक नैसर्गिक आपत्तींना शेतकऱ्याला तोंड द्यावे लागते , त्यामध्ये त्याचे खूप सारे आर्थिक नुकसान होते या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी आर्थिक हातभार म्हणून नुकसान भरपाई जाहीर करत असते, त्याप्रमाणे 1 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाने नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवेळी पाऊस व गारपीटीची नुकसान भरपाई जाहीर केली आहे,
प्रस्तावना:
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकपरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हांगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रपतसाद पनधीमधून पवपहत दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.सीएलएस-2022/प्र.क्र.349/म-3, पद.27.03.2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. तथापि, संदर्भ क्र.4 येथील दिनांक.01.01.2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर,2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गगक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.
नोव्हेंबर, २०२3 या महिन्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त, नाशिक याांचेकडून दिनांक.09.01.2024 च्या तीन स्वतांत्र पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत.
शासन निर्णय : नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधी मधून 144 कोटी 10 लाख 66 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे,
वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच कामासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा असे सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आले आहे, ही मदत देताना केंद्र व राज्य शासनाने चक्रीवादळ , पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती करता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी असे यामध्ये नमूद केले आहे ,
हे पण वाचा :
Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती 2024
Magel tyala shet tale शेत तळ्यासाठी 80% subcidy
तर मित्रांनो या लेखांमध्ये आपण आज बघितले की नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतकऱ्यांचा नुकसानीसाठी शासनातर्फे देण्यात आलेल्या आर्थिक मदतीविषयी माहिती बघितली,