1356 आजारांवर 5 लाखांपर्यंत मिळतील मोफत उपचार, आयुष्यमान कार्ड आता घरी काढा.

नमस्कार मित्रांनो आज या लेखामधे आपण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व राज्याच्या महात्मा फुले जनआरोग्य या योजनेविषयी जाणुन घेणार आहे.

1356 आजारांवर 5 लाखांपर्यंत मिळतील मोफत उपचार, आयुष्यमान कार्ड आता घरी काढा

1356 आजारांवर 5 लाखांपर्यंत मिळतील मोफत उपचार, आयुष्यमान कार्ड आता घरी काढा.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व राज्याच्या महात्मा फुले जनआरोग्यअंतर्गत आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार (१३५६ आजार) मिळणार आहेत. पण, त्यासाठी प्रत्येक नागरिकांकडे ‘आयुष्यमान’ कार्ड असणे बंधनकारक आहे.

हे कार्ड स्वत:च्या मोबाईलवरून घरबसल्या देखील काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कार्ड काढण्याची प्रक्रिया

 

– पहिल्यांदा मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरमधून आयुष्यमान ॲप डाऊनलोड करा

 

– आयुष्यमान ॲप डाऊनलोड केल्यानंतर ‘आधार फेस आरडी’ हेही ॲप डाऊनलोड करावे.

 

– त्यानंतर आयुष्यमान ॲपमध्ये बेनिफिशरी लॉगिन पर्याय निवडावा.

 

– मोबाईल ओटीपीद्वारे संबंधिताने लॉगिन करावे.

 

– सर्च पर्यायात जाऊन आधार कार्ड क्रमांक व रेशनकार्ड आयडीद्वारे पात्र लाभार्थी शोधता येईल

– पात्र लाभार्थींची यादी ई-केवायसी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी किंवा फेस ऑथच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण होईल.

व तसेच आपण आपल्या जवळील ई – सेवा केंद्रात जाऊन सुद्धा सहज रित्या आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता.

पहिल्यांदा मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरमधून आयुष्यमान ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र, आशा सेविका, ग्रामपंचायतीसह योजनेतील रुग्णालयांमधील आरोग्य मित्रांच्या मदतीने देखील ते कार्ड काढता येणार आहे. त्यानंतर आजारी रुग्णाला योजनेतील रुग्णालयांमध्ये कार्ड दाखविल्यानंतर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

योजनेअंतर्गत जवळपास 1300 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेत खासगी व शासकीय रुग्णालयांचाही समावेश असून राज्यातील मोठमोठ्या रुग्णालयाचा समावेश या योजनेत केला आहे . दरम्यान, आता राज्य सरकारच्या निर्णयानुसार महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले असून काही दिवसांत रुग्णालयांची संख्या वाढणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एक हजार ३५६ आजारांवर या योजनेतून मोफत उपचार होणार आहेत.

भारत सरकार ने केंद्रीय कर्मचारी तसेच राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचारी वर्गासाठी देखील आयुष्यमान भारत योजना लागू केली आहे,

परंतु या दोन्ही मध्ये फरक आहे,  जसे की सरकारी कर्मचारी यांना सरसकट ह्या योजनेचा लाभ घेता येतो, ती व्यक्ति फक्त सरकारी कर्मचारी असावी,

किती लाखांपर्यंत उपचार :

सरकारी कर्मचारी यांच्यासाठी वार्षिक 7 लाखांपर्यंत उपचार मोफत आहेत तर सर्वसामान्य जनतेला 5 लाखांपर्यंत उपचार मोफत उपलब्ध आहे,

आपण रुग्णालयात अ‍ॅडमिट झाल्यानंतर कस लेही शुल्क आकारले जात नाही निशुल्क उपचार आपण घेऊ शकतो.

राज्यातील जे मोठमोठे रुग्णालय आहेत आणि ज्यांचा समावेश या यादीत आहे तिथे जाऊन आपण मोफत उपचार घेऊ शकता, या मध्ये कोणकोणत्या रोगांचे उपचार आपण घेऊ शकतो या चौकशी आपण संबंधित रुग्णालयात जाऊन करू शकता,

आयुष्यमान भारत योजना : महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत योजना या योजनांमुळे अनेक गरीब आणि दिन दुबळ्यांचे कल्याण या योजनांमुळे होत आहे , समाजात असे  काही दिन दुबळे घटक आहेत , जे खूप गरीब आहेत जे संसाराचा गाडा कसा बसा चालवतात आणि अशा परिस्थितीत घरातील कोणी व्यक्ति बीमार झाली तर त्यांच्या साठी त्या व्यक्तीचा उपचार कसा करावा हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो आणि त्यामुळे ते चांगल्या ठिकाणी उपचार घेऊ शकत नाही , अशातच आता भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी  महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत योजना राबवल्यामुळे समाजिल आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या योजनांचा लाभ घेत आहे ,

या योजना गरिबांसाठी कल्याणकारी ठरत आहेत , या योजनांमद्धे तुम्ही मोठ्या – मोठ्या हॉस्पिटल मध्येमोठ्या – मोठ्या आजारांवर मोफत उपचार घेऊ शकता , तुम्ही बघितले असेल पैशा अभावी लोक उपचार घेत नाहीत , आणि घ्यायचे म्हटले तर त्यांना आपली जमा पुंजी यातच खर्च करावी लागते अथवा जमीन वैगेरे विकावी लागते , परंतु महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत योजना या योजना आल्या पासून समाजातील गरीब तसेच मध्यम वर्गीय कुटुंबांचा खूप फायदा होत आहे ,

या योजणांशीवाय इतर देखील काही योजना आहेत , शासना तर्फे नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात ,

हे पण वाचा : 

सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात 

Goat Rearing Scheme: बँकाकडून 50 लाख रुपयापर्यंत मिळवा कर्ज व सुरू करा शेळीपालन व्यवसाय!

तर मित्रांनो आपण या लेखामधे आपण घरी आयुष्यमान भारत कार्ड कसे बनवू शकता आणि त्याचे काय फायदे आहेत हे बघितले.

Leave a Reply