नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत की, बिबट्या हा माणसांवर हल्ला का करतो याविषयी सखोल माहिती,
मित्रांनो आज काल आपण बघत असतो वर्तमानपत्रांमधून रोज रोज बातम्या बघायला मिळतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा रोज आपल्याला ऐकायला मिळते की अमुक अमुक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला किंवा मानवी वस्ती मध्ये घुसून तिथे माणसांवर हल्ला केला याबरोबरच लहान मुले तसेच मोठ्या व्यक्तीवरही हल्ला केल्याच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत, आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे .
बिबट्या हा माणसांवर हल्ला का करतो, बचाव कसा करावा 2024
अलीकडील काळामध्ये बिबट्याने मानवी वस्तीवर हल्लाकरण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे , मित्रांनो बिबट्याची संख्या ही वाढताना दिसून येत आहे आणि त्यांचे हल्ले करण्याची ज्या घटना आहेत त्या सुद्धा खूप वाढल्या आहेत बिबट्यांची संख्या वाढण्यात आणि हल्ल्या होण्यामागील काय कारणे आहेत या सर्वांची माहिती आपण या लेखांमध्ये आज बघणार आहोत घरातील कुटुंब प्रमुखाच्या मृत्यू झाल्याच्याही बऱ्याच घटना घडलेल्या आहेत मित्रांनो ज्या घरातील कुटुंबप्रमुख मृत्यूमुखी पडला तर त्या घरावर काय परिस्थिती ओढवते हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे .
माणसांवर हल्ला :
मित्रांनो बिबट्या हा मांसाहारी प्राणी आहे आणि त्यामुळे तो छोट्या मोठ्या प्राण्यावर हल्ला करतो जसे की शेळ्या ,मेंढ्या ,डुकरे ,कुत्रे ,व तसेच लहान मुले व क्वचित ठिकाणी माणसावरही हल्ला करण्याच्या घटना घडलेल्या आहेत ,शेळ्या मेंढ्या डुकरे कुत्रे यांच्या तुलनेने बैल गाय म्हैस इत्यादी मोठ्या प्राण्यावर हल्ला कमी प्रमाणात करतो सहजासहजी त्यांच्या वाट्याला तो जात नाही .
बिबट्या मानवी वस्तीत का घुसतो : मित्रांनो जे मांसाहारी प्राणी आहेत ते मुळतः जंगली आहेत ते घनदाट जंगलामध्ये राहतात , परंतु आज-काल मानवाने प्रचंड वृक्ष तोड करून जंगलांचे प्रमाण कमी केले आहे आणि त्यामुळे वन्य प्राण्यांना वावर करण्यास जंगल नसल्याकारणाने बिबट्या ,वाघ इत्यादी जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये प्रवेश करताना दिसून येतात व मानवी वस्तीत प्रवेश करून पाळीव जनावरे लहान मुले व माणसांवर हल्ला केल्याच्या बऱ्याच घटना आजकाल घडून येताना दिसतात ,जे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून बघतो तसेच ऐकतो .
जंगलतोड अधिक झाल्यामुळे वाघ बिबट्या इत्यादी नरभक्षक प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये सुद्धा वास्तव्यास असतात जसे की ऊस वगैरे यामध्ये बिबट्या वावर करतो आणि तिथेच आपल्या पिलांना जन्म सुद्धा देतो .
बिबट्या हा माणसांवर हल्ला का करतो, बचाव कसा करावा ?
बिबट्या पासून कसे वाचावे : वाघ बिबट्या इत्यादी प्राणी आल्याचे सर्वात अगोदर कुत्र्यांना कळते आणि ते भुंकायला लागतात , कुत्रे भुंकली तर समजायचे काहीतरी धोका आहे आणि तुम्ही सजा होऊ शकता .
1. बिबट्या आढळला तर : तुमच्या परिसरात बिबट्या आढळला तर तुम्ही याची सूचना संबंधित वन विभागाला द्या जेणेकरून वन विभागाचे अधिकारी येऊन बिबट्या किंवा वाघ इत्यादी प्राण्यांना पकडून नेतील .
2. तुमच्याकडे गाई म्हशी बकऱ्या इत्यादी पाळीव प्राणी असतील तर त्या जनावरांसाठी जाळीचे कुंपण करावे आणि लाईटची व्यवस्था करावी कारण जाळीचे कुंपण असल्याकारणाने बिबट्या त्या जनावरांवर हल्ला करणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे उजेड असल्या कारणाने सुद्धा तो तिथे येणार नाही कारण जे नर भक्षक प्राणी आहेत किंवा मांसाहारी प्राणी आहेत ते शक्यतो अंधारामध्ये शिकार करतात.
3. तुमच्या परिसरामध्ये जर बिबट्या वाघ इत्यादी मांसाहारी प्राणी असतील तर शक्यतो रात्रीच्या वेळेला बाहेर पडू नये आणि काही कारणास्तव बाहेर जाण्याची गरज पडली तर हातामध्ये काहीतरी उजाडाचे साधन ठेवा उजेडाला तो घाबरतो काही ठिकाणी लोक आग लावून मशाल सुद्धा हाती घेतात आगीला सुद्धा हे प्राणी घाबरतात .
4.तुम्हाला जर बिबट्याअसल्याची चाहूल लागली तर तुम्ही आवाज करत जाऊ शकता कारण आवाजाला हे प्राणी घाबरतात.
5. तसेच तुम्हाला शेतामध्ये जाताना किंवा बिबट्या वाघ हे प्राणी असलेल्या ठिकाणाहून जायचे असल्यास हातामध्ये काहीतरी वस्तू नेहमी ठेवावी जसे की एखादी लांब काठी कुऱ्हाड इत्यादी जेणेकरून वेळ प्रसंगी तुम्ही त्याला पळवून लावू शकता आणि काठेजवळ असल्याच्या नंतर तिला एखादा कपडा बांधून आग लावून सुद्धा त्याला पळवू शकता.
6. झाडावर चढण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो तुम्ही बघितले असेल वाघ चिता बिबट्या इत्यादी मांसाहारी प्राणी आहेत ते सहजरीत्या झाडांवर चढून शिकार करतात त्यामुळे तुम्ही झाडावर चढण्याचा प्रयत्न करू नका जमिनीवरती उभे राहूनच त्याचा सामना करण्याचा प्रयत्न करा .
7. जोरात आवाज करा बऱ्याच ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्यानंतर शेतकरी असो किंवा महिला असो यांनी जेव्हा मोठ्याने आरडा ओरड केली तेव्हा बिबट्या पळून गेल्याच्या बऱ्याच घटना ऐकण्यात आहेत.
8. हल्ला झाल्यास घाबरून जाऊ नका मित्रांनो मागे एकदा वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली होती की एका लहान मुलावरती बिबट्याने हमला केला तेव्हा त्या मुलाची आईने बिबट्याचा सामना करून त्या मुलाचा जीव वाचवला तेव्हा घाबरून जाण्याची गरज नाही कणखरपणे सामना करावा.
हे सुद्धा वाचा :
What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय 2024
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?
तर मित्रांनो या लेखांमध्ये आज आपण बघितले की बिबट्याने हमला केल्यास कशा प्रकारे आपण स्वतःला वाचवू शकतो.
धन्यवाद