Can We Withdraw Money From ppf Account:नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये can we withdraw money from ppf account:आपण ppf खात्यातून पैसे काढू शकतो का याविषयी माहिती बघणार आहोत,
Can We Withdraw Money From ppf Account:आपण ppf खात्यातून पैसे काढू शकतो का 2024
हे पण वाचा :How To Close Paytm Payment Bank Account:पेटीएम पेमेंट बँक खाते कसे बंद करावे 2024
आज-काल बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात,
कोणी शेअर मार्केटमध्ये करतात, कोणी बॉण्ड मध्ये करतात, कोणी म्युच्युअल फंड मध्ये करतात, तर कोणी पीपीएफ मध्ये करतात, प्रत्येक गुंतवणुकीचे काही फायदे आहेत तर काही नुकसानही आहेत,
तेव्हा आपण पीपीएफ विषयी माहिती बघू,
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही भारतातील दीर्घकालीन बचत आणि गुंतवणूक योजना आहे,आणि PPF मधून सहसा वारंवार पैसे काढता येत नसते.PPF चा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो,आणि खाते उघडण्याच्या तारखेपासून 7 वे आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे.
7 वे वर्ष पूर्ण झाल्यानंतर,खातेदार त्यांच्या PPF खात्यातून आंशिक पैसे काढू शकतात.काढता येणारी रक्कम ही काही अटी आणि सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादांच्या अधीन आहे. खातेधारकांना 4थ्या वर्षाच्या अखेरीस 50% पर्यंत रक्कम काढण्याची परवानगी आहे किंवा पैसे काढण्याच्या वर्षाच्या आधी किंवा मागील वर्षाच्या शेवटी शिल्लक आहे,जे कमी असेल ती रक्कम तुम्ही काढू शकता.
पीपीएफ चा कालावधी जरी पंधरा वर्षांचा असला तरी तुम्ही सातव्या वर्षी काही रक्कम काढू शकता आणि त्यापूर्वी तुमच्या पीपीएफ खात्याला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्यावरती लोणची सुविधा सुद्धा घेऊ शकता तुमच्या जमा झालेल्या रकमेनुसार तुम्हाला लोन दिल्या जाते, आणि या लोणचा जो व्याजदर आहे तो बँकेच्या व्याजदरापेक्षा कमी असतो,
PPF चे फायदे: पीपीएफ खात्यावरती तुम्हाला एक निश्चित व्याजदर दिला जातो, आणि PPF खात्यामुळे आयकरा मध्ये सूट मिळते,
PPF खात्यामध्ये तुम्ही वर्षाला 1 लाख 80 हजार रुपयापर्यंत रक्कम जमा करू शकता,
PPF खात्याचे नुकसान: मित्रांनो जे गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात त्यांचा मुख्य हेतू हा आयकारांमध्ये बचत करणे हा असतो आणि चांगला व्याजदर मिळवणे हा देखील असतो, अगोदर PPF खात्यावर चांगला व्याजदर दिला जायचा, परंतु आता जो मिळणारा व्याजदर आहे तो खूप कमी आहे, आणि हा व्याजदर अधून मधून बदलत असतो ,
आणि दुसरा सर्वात मोठे नुकसान म्हणजे PPF खात्याचा लॉक इन कालावधी ,
पंधरा वर्षांचा लॉक इन कालावधी पूर्ण होईपर्यंत तुम्ही पीपीएफ खाते बंद करू शकत नाही (काही अपवाद वगळता)
हे पण वाचा :Which mushroom is best to eat in India?भारतात कोणते मशरूम खाणे चांगले आहे?2024
PPF खाते वेळेपूर्वी बंद कसे होते: मित्रांनो PPF खात्याचा संपूर्ण होण्याचा कालावधी आहे तो पंधरा वर्षांचा आहे परंतु तुम्ही त्यापूर्वीसुद्धा पीपीएफ खाते बंद करू शकता परंतु त्याच्या काही नियम आणि अटी आहेत ते आपण बघूत,
तुम्ही जर देशाबाहेर दुसऱ्या देशामध्ये वास्तव्यास जाणार असाल आणि तुमच्याकडे त्या देशाचे नागरिकत्व प्राप्त झाले तर त्यानंतर तुम्ही पीपीएफ खाते पूर्णतः बंद करू शकता,
तुमच्या घरातील किंवा तुम्हाला स्वतःला उच्च शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता असल्यास देखील तुम्ही पीपीएफ खाते बंद करू शकता,
हे पण वाचा :what is cersai in banking:बँकिंगमध्ये cersai म्हणजे काय 2024
तुमच्या घरातील तुमच्यावर अवलंबून व्यक्तींना काही गंभीर आजार झाल्यास त्यांच्या उपचारासाठी देखील तुम्ही पीपीएफ खाते पूर्णतः बंद करू शकता,
या तीनही परिस्थितीमध्ये तुम्ही पीपीएफ खात्यामधून जी रक्कम काढणार आहात ती तुम्ही पीपीएफ खात्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी काढताय तेव्हा तुम्हाला एकूण मिळणाऱ्या व्याजदराच्या एक टक्का व्याजदर कमी दिला जाईल अथवा कपात केला जाईल,
PPF मधून रक्कम काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे:
PPF खातेधारकाचे पासबुक
PPF खातेधारकाचे आधार कार्ड
PPF खातेधारकाचे पॅन कार्ड
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की PPF दीर्घकालीन बचत साधन म्हणून डिझाइन केले आहे,आणि खात्याचा उद्देश आणि हेतू लक्षात घेऊन पैसे काढले जावेत.याव्यतिरिक्त,आर्थिक साधनांशी संबंधित नियम बदलू शकतात,त्यामुळे नवीनतम माहितीसाठी संबंधित वित्तीय संस्था किंवा प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.