नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण Chana Crop Management : हरभऱ्याची कमी उगवण होण्याची तीन कारणे या विषयी माहिती बघणार आहोत . त्यावर काय उपाय करावे काय काळजी घ्यावी सविस्तर माहिती बघू ,
Chana Crop Management : हरभऱ्याची कमी उगवण होण्याची 3 कारणे :
कोरडवाहू किंवा बागायती हरभऱ्याची पेरणी झाल्यानंतर उगवण कमी होते. कधी रोपांची कतरण होते याशिवाय उगवणीनंतर रोपे सुकतातही. या सर्व कारणांमुळे रोपांची संख्या योग्य प्रमाणात न राखल्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.
Chana Crop Management : हरभऱ्याची कमी उगवण होण्याची तीन कारणे
कमी उगवण :
पेरणीनंतर हरभरा पिकात कधी -कधी कमी उगवण झालेली दिसते. याच कारण म्हणजे हरभऱ्याची कोरडवाहू क्षेत्रात ट्र्रॅक्टरने पेरणी करताना पेरणीच्यावेळी बियाणे कमी जास्त खोलीवर पेरल जात. बियाणे उथळ पडल्यामुळे वरच्या थरातील कमी ओलीमुळे बियाणे उगवण्यासाठी पुरेशी ओल नसल्यामुळे अर्धवट अंकुरण होऊन कमी उगवण होते. त्यामुळे पेरणीची खोली योग्य म्हणजेच ६ ते ८ सेंटीमीटर राखावी लागते. यावर उपाय करताना पाण्याची सोय असल्यास स्प्रिंकलरने संपूर्ण शेत ओलवून घ्याव. योग्य प्रकारे वाफसा येऊ द्यावा. त्यानंतरच ट्रॅक्टरने किंवा बैलजोडीचलित पेरणीयंत्राने पेरणी करावी.
बहुतांशवेळा शेत तयार करुन शेतकरी कोरड्यात हरभऱ्याची पेरणी करतात. त्यानंतर स्प्रिंक्लरने पाणी दिले जाते . अशावेळी कमी किंवा जास्त पाणी दिल्यास बियाण्याला बुरशी चढते आणि हरभऱ्याची कमी उगवण होते. त्यामुळे योग्य आणि एकसमान उगवणीसाठी पेरणीपुर्वी जमीन ओलीत करावी. योग्य प्रकारे वाफसा येऊ द्यावा आणि त्यानंतरच हरभऱ्याची पेरणी करावी. पिकाची पूर्ण उगवण झाल्यानंतर पीक रोपावस्थेच्या सुरुवातीच्या अवस्थेत असताना हलके ओलीत करावे. म्हणजेच तुषार सिंचनानेपाणी देण्याची वेळ दोन ते तीन तासांपेक्षा जास्त असू नये. त्यामुळे जमिनीतील राहिलेले बियाणेसुद्धा उगवत आणि पिकाला रोप अवस्थेतच्या सुरुवातीला पाण्याचा ताण बसणार नाही.
रोपांची कतरण :
हरभरा पिकातील दुसरी महत्वाची समस्या म्हणजे पीक उगवल्यानंतर काही वेळा रोपांची कतरण झालेली दिसते. कारण हरभरा उगवण अवस्थेत असताना भुईकीडा, उडद्या किंवा काळी म्हैस यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडी कोवळी रोपे कातरतात. यालाच कतरण असं म्हणतात. कतरण झाल्यामुळे कोरडवाहू हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. यावर उपाय करताना पाण्याची सोय असल्यास आधी ओलित करावे. त्यानंतर शेत वाफश्यावर असताना हरभऱ्याची पेरणी करावी.
आधी ओलीत केल्यामुळे जमिनीत मातीच्या ढेकळाखाली लपलेले किडे मातीच्या ओल्या थराखाली गाडले जातात. आणि किडीचा प्रादुर्भाव कमी राखण्यास मदत होते. पेरणी करताना किंवा शेतात रोटाव्हेटर करण्यापुर्वी प्रती एकर ४ ते ५ किलो दाणेदार क्लोरपायरीफॉस चा वापर करावा. हरभऱ्याची पेरणी झाल्यानंतर उगवणीपुर्वी साधारण २ ते ३ दिवस आधी किंवा पीक रोपावस्थेत असताना सुरुवातीच्या अवस्थेत साध्या पंपाने क्लोरपायरीफॉस किंवा क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून नोझलला प्लॅस्टिकचे हुड लावून जमिनीलगत दाट फवारणी करावी. त्यामुळे कोवळ्या कोंबाची कतरण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
मुळसड :
हरभऱ्यातील तिसरी महत्वाची समस्या आहे मुळसड. पेरणीनंतर १७ ते २२ दिवसांनी रोपे अचानक सुकतात. रोपे उपटल्यानंतर मुळे कुजलेली दिसतात, मुळांवर पांढरी बुरशी वाढलेली दिसते. त्यामुळे रोपे वाळतात, यालाच मुळसड म्हणतात. शेत ओलीत करुनही शेतकरी काहीवेळा पेरणीची घाई करतात.
मशागत नीट न झाल्यामुळे किंवा खोल नांगरट न केल्यामुळेही हरभऱ्यात मुळसडीचा प्रादुर्भाव दरवर्षी वाढताना दिसतो. यावर उपाय करताना पेरणीपुर्वी साधारण अर्धा तास आधी ट्रायकोडर्मा ५ ते १० मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणे बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा उपलब्ध नसल्यास रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्याशिवाय हरभऱ्याची पेरणी करु नये. अन्यथा मुळसड वैगेरे समस्या येऊ शकतात ,
अशाप्रकारे हरभरा पेरणीपुर्वी जमीन व्यवस्थापन, बीजप्रक्रिया आणि योग्य ओलीत व्यवस्तापन केल्यास हरभऱ्याचे पुढे होणारे नुकसान टाळता येते.
पीक कोणतेही असो त्याची उगवण जर कमी झाली झाडांची संख्या कमी झाली तर साहजिकच उत्पन्नात देखील घट होते , असे होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते , जेणे करून उत्पन्नात घट होणार नाही , उगवण कमी होण्याची आणखी देखील काही कारणे असू शकतात परंतु आपण महत्वाची कारणे बघितली ,
तर मित्रांनो या लेखामध्ये आपण बघितले Chana Crop Management : हरभऱ्याची कमी उगवण होण्याची तीन कारणे. आहेत ,
हे पण वाचा :
limbu : कागदी लिंबू लागवड शेतकऱ्या चे ATM एकरी 6 लाख रुपये उत्पन्न
What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय 2024
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?
FAQ
- हरभर्याची उगवण कमी होण्याचे कारण,
- हरभरा मूळ सड होण्याचे कारण,
- रोपांचे कतरण,
- हरभरा पिकावर कोणते औषद फवारावे,