नमस्कार मंडळी या लेखामध्ये आपण चंदन लागवडीविषयी जाणून घेणार आहोत,आणि एकरी 11 अकरा कोटी कसे कमवू शकता चंदन शेतीतून हे पण जाणून घेणार आहोत,
चंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे. श्वेतचंदन आणि रक्तचंदन हे दोन्ही वृक्ष वेगवेगळ्या प्रजातींचे आहेत. चंदन चिबड जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतो. पाण्याची निचरा होणारी डोंगराळ जमीन, उत्तम गाळाची, काळी माती व नदी – नाल्याच्या काठच्या जमिनीत याची चांगली वाढ होते.
चंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे. श्वेतचंदन आणि रक्तचंदन हे दोन्ही वृक्ष वेगवेगळ्या प्रजातींचे आहेत. चंदन चिबड जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतो. पाण्याची निचरा होणारी डोंगराळ जमीन, उत्तम गाळाची, काळी माती व नदी – नाल्याच्या काठच्या जमिनीत याची चांगली वाढ होते.
chandan sheti एकरी 11 अकरा कोटी कसे कमवू शकता चंदन शेतीतून
- चंदन लागवड करताना
खाजगी जमिनीमध्ये चंदनाची लागवड करण्यसाठी परवानगी लागत नाही. परंतु प्रजाती तोडण्यासाठी विभागीय अधिकाऱ्याकडे परवानगी घेणे गरजेचे असते. चंदन एक संरक्षित वण प्रजाती आहे, त्यामुळे तोडणीस आणि विक्रीस वनरक्ष कायदा 1956 अंतर्गत पुरवठा परवानगी घेणे आवश्यक आहे. लागवड केल्यानंतर जमिनीचा सातबारा नमुन्यामध्ये नोंद करून घ्यावी आणि संबंधित वन अधिकाऱ्याच्या आपल्या प्रक्षेत्रावर चंदन लागवड असल्याचा दाखला प्राप्त करून घ्यावा.
2.चंदनाची मूलभूत माहिती
वनस्पती शास्त्रीय भाषेत भारतीय चंदन प्रजातीला सॅन्टलम अल्बम (Santalum Album) नावाने ओळखले जाते. तशा एकूण जागतिक स्थरावर चंदनाच्या ५६ जाती आहेत त्यापैकी १६ जाती प्रसिद्ध पावल्या आहेत .
व्यावसायिक बाजार पेठेत सॅन्टलम अल्बमला “पूर्व भारतीय चंदन” नावानेही ओळखले जाते.
भारतीय संस्कृतीत चंदनाला प्रत्येक धार्मिक कार्यात अनन्यसाधारण महत्व आहे त्याचे अनेक दाखले पुराणातही सापडतात.
वामन पुराणात शिव पूजेत चंदन लाकडाचा अंतर्भाव करण्यास सांगितले असून ब्रह्म वैवर्त पुराणात लक्ष्मीचे वास्तव्य चंदन वृक्षाजवळ असते असे नमूद केलेले आहे.
सुगंधित द्रव्य व लाकूड निर्यातीत भारताचे स्थान नेहमीच अग्रेसर राहिले असून, परंपरेने ५००० वर्षाहून अधिक हा वारसा पुढे चालत आलेला आहे.
चंदनाची बेसुमार तोड परंतु त्या प्रमाणात लागवडी न झाल्याने जागतिक बाजारपेठेतील मागणी भारत पुरी करण्यास असमर्थ आहे. लागवड न होण्याचे मूळ कारण म्हणजे चंदन लागवड बद्दल असलेले गैरसमज, विशेषतः दक्षिण भारतात असलेल्या सरकारी जाचक अटी.
आपले पूर्वज (महाराष्ट्रातील) लागवडीसाठी उदासीन होते कारण त्यांचा असा समज झाला कि दक्षिण भारतातील चंदन लागवडीच्या सरकारी / राजकीय जाचक अटी लागू त्यांनाही लागू पडतात. सध्या दक्षिण भारतात ह्या अटी बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आलेल्या आहेत.
चंदन वृक्ष हा महाराष्ट्रातील ३३ जिल्हात आढळून आला आहे व त्याच्या बुंद्याचा घेरही बऱ्याच प्रमाणात मोठा आहे. तेव्हा मनात कोणताही किंतु न ठेवता चंदनाची शेती सुवर्ण संधी समजून केल्यास तीच तुमच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरेल.
3.चंदन शेतीतील नफा
चंदनाच्या गाभ्यापासून तेलाची निर्मिती होते. एका झाडात १५ ते ५० किलो इतका गाभा तयार होतो. एकरी यजमान झाडां व्यतिरिक्त २५० चंदनाच्या रोपांची व्यवस्थित लागवड होते, साधारण एका एकरात ४५०० किलो पर्यंत गाभा मिळू शकतॊ. तो गाभा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मुक्त बाजारात साधारण १४०००/- प्रति किलोने विकू शकतात. खात्रीशीर ग्राहक हवा असेल तर शेतकरी कर्नाटक राज्य सरकारला तो ६५००/- प्रति किलोने विकू शकतात. कर्नाटक राज्य सरकार म्हणजेच कर्नाटक सोप अँड डिटर्जेन्ट्स लिमिटेड कंपनी (KSDL) जी चंदन तेल, साबण उत्पादनात आणि एक्स्पोर्ट मध्ये भारतातील अग्रेसर कंपनी आहे.,
जर बऱ्याच प्रमाणात झाडे असतील तर कंपनीतील लोक स्वतः बागेत येऊन झाडे तोडून कंपनीत घेऊन जातात. जागेवर १० % रक्कम देऊन, बाकी रक्कम ६ महिन्याने म्हणजेच झाड पूर्णतः सुकल्यावर, विविध भाग वेगळे करून शेतकऱ्या समोर वजन करून परतावा देण्यात येतो.
हा वृक्षहि नारळाप्रमाणे कल्पवृक्ष आहे कारण ह्या वृक्षाच्या प्रत्येक भागाचे म्हणजेच मुळे, फांद्या, बीज, सालाचे पैसे मिळतात कारण हे सर्व भाग अगरबत्ती, पावडर, समिधा, आयुर्वेदात, सौदर्य प्रसादनात आणि लाकडी भेट वस्तू बनवण्यासाठी उपयोगी येतात.
चंदनाच्या लाकडाचा भाव प्रति किलो 4 ते 5 हजार रुपये असा आहे. 20 वर्षे वाढ झालेल्या चंदन झाडापासून 25 ते 30 किलो लाकूड मिळते. आजचा बाजारभाव पाहता सुमारे 5 ते 6 कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. चंदनाच्या तेलालाही प्रति लिटर 5 लाख रुपये असा दर मिळतो. राज्यात चंदनाच्या झाडामध्ये तेलाचे प्रमाण सरासरी पाच लिटर इतके आहे. प्रति हेक्टरी 100 लिटर तेल सहज मिळून जाते. मात्र तेल मिळवण्यासाठी जितके मजूर वापरावे लागतात. त्या तुलनेत त्यांची मजुरी परवडणारी नाही. चंदनाची बाजारपेठ जगभर आहे. .
4.रोपे तयार करणे
लहान रोपे अति सुर्यप्रकाशात व उष्णतेमुळे किंवा कमी पाण्यामुळे सुकू शकतात. त्यासाठी सावली व पाण्याची व्यवस्था करावी. ताजे बियाणे 2 महिन्यापर्यंत सुप्तावस्थेत असते. त्यामुळे त्यावर पाणी अथवा हवेची प्रक्रिया होऊ शकत नाही. याकरिता जर्मिनेटर 50 मिली, प्रिझम 50 मिली, 1 लि. पाणी या प्रमाणातील द्रावणात बी रात्रभर भिजत ठेवून त्याची सुप्तावस्था नष्ट होऊन 1 ते 1।। महिन्यात अंकूरताना दिसतात. एरवी 3 महिन्यापर्यंत देखील अंकुरलेली दिसत नाहीत. 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या झाडांवरील बियांपासून रोपे तयार करताना उगवणक्षमतेत कोणताही फरक आढळून येत नाही.
5.लागवड
मान्सून पावसाची सुरुवात होताच जून, जुलै, ऑगस्ट मध्ये रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात 16’x12′ अंतरावर 1.5 x 1.5 x 1.5 फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डयामध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून अर्धा खड्डा सेंद्रिय अथवा कंपोस्ट खत, निंबोळी पावडर व कल्पतरू सेंद्रिय खत (250 ग्रॅम) ने भरून घ्यावा. त्यानंतर एक पाऊस झाल्यावर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी व शेजारच्या खड्डयामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोप कालांतराने मरते व चंदन त्याच्या जवळ असल्याने इतर दिर्घायुषी यजमान वृक्षाच्या मुळांमधून आपले आवश्यक ते अन्न शोषण सुरू करते.
चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत ‘शर्विलक’ म्हणतात. शार्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जिवनसत्वे स्वत:च्या मुळाद्वारे शोषून घेत असतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षानी लागवड करावी लागते. चंदनाची वाढ खुरटी राहते व झाड 2-3 वर्षांनी मरते. पिशवीतील रोपे लागवडीपुर्वी 1 लि. जर्मिनेटर चे 100 लि. पाण्यात द्रावण तयार करून पिशवी मध्ये रोपांना 50 ते 100 मिली द्रावणाची आळवणी करावी. नंतर लागवडीच्यावेळी रोपाची प्लॅस्टिक पिशवी अलगद बाजूला काढून रोप लावावे. लागवडीनंतर त्याला पुन्हा जर्मिनेटरचे वरीलप्रमाणे ड्रेंचिंग (आळवणी) करावी.
6.होस्टिंग प्लांट
यजमान दिर्घायुषी झाडे: साग, सादडा, लिंब, सुरू, पळस, करंज, निलगिरी, बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, काशिद, खैद, सिसम, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, कुमकुम वृक्ष इ. ची लागवड करता येते.
यजमान मध्यम आयुषी झाडे: हादगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी, बकुळ, बारतोंडी इ.
यजमान फळझाडे: सिताफळ, रामफळ, डाळिंब आवळा, बोर.
यजमान खुरटी झुडपे: कन्हेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड ही पिके आहेत.
7.आंतरपिक
चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना दोन ओळींमध्ये किमान 10 फूट जागा उपलब्ध होऊ शकेल. या जागेत पहिले 4-5 वर्षापर्यंत हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिके घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी/वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा चंदन वाढीस फायदा होतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतींमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी, शतावरी, कोरफड अशी पिके घेता येतात.
8.जमीन
लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त, उत्तम निचरा होणारी, उत्तम उपजावू चिकण माती व नदी काठच्या निचऱ्याच्या पोयटायुक्त जमिनीत चंदनाची वाढ अगदी जोमाने होते. पाणी दिल्यानंतर विस्तारणारी माती, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशयुक्त जमीन झाडाची उंची व घेर वाढीस फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू हा 6.5 ते 8.2 असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते
9.पाणी
चंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी ठिबकने आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून 2 वेळा पाणी ठिबकने द्यावे. चौथ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून 2 वेळा तरी पाणी द्यावे.
10.रोगाचा प्रादुर्भाव
चंदनावर शक्यतो नुकसानकारक जैविक अथवा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आढळत नाही. परंतु जंगलातील जुनाट झाडांवर स्पाईक रोग मायक्रोप्लाझमा सदृश्य जिवाणूपासून झाल्याचा आढळून आला आहे. किडीमध्ये भुंगे हे रात्री पानांच्या कडा कुरतडत मधल्या शिरेकडे खात जातात. हे किडे पानांच्या खालच्या बाजूस अथवा पानाच्या गुंडाळीत अथवा जाळे बनवलेल्या पानात दिवसा आढळतात. त्याचबरोबर रस शोषणारी अळी, खोड पोखरणारी अळी, वाळवी या किडींचा प्रादुर्भाव चंदनावर आढळून येतो. यांचा प्रादुर्भाव होऊ नये. याकरिता कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार सप्तामृताच्या फवारण्या वेळीच कराव्यात. प्रादुर्भाव झाल्यावर नुकसानीची पातळी ओलांडण्यापुर्वी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. मात्र सतत रासायनिक किटकनाशकाचा वापर शक्यतो टाळावा. म्हणजे त्याचा चंदनाच्या गाभा व तेलाच्या दर्जावर परिणाम होणार नाही.
11.आंतरमशागत
लागवडीनंतर प्रत्येक वर्षी ऑक्टोबरमध्ये 1 मीटर व्यासाची वर्तुळाकार माती कुदळीने 15 सेमी. पर्यंत खोदून कल्पतरू सेंद्रिय खत 250 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत आवश्यकतेनुसार झाडाच्या वयाप्रमाणे तसेच सुगंधी गाभ्याची अधिक वाढ होण्यसाठी सप्तामृताच्या फवारण्या दर महिन्याला कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार कराव्यात.
12.उत्पन्न
चंदन हि हळूहळू वाढणारी प्रजाती आहे. चंदनाचा खोड/गाभा 10 व्या वर्षापासून परिपक्व होतो.
चंदनाच्या लाकडाचा भाव प्रति किलो 4 ते 5 हजार रुपये असा आहे. 20 वर्षे वाढ झालेल्या चंदन झाडापासून 25 ते 30 किलो लाकूड मिळते. आजचा बाजारभाव पाहता सुमारे 5 ते 6 कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.
आणखी वाचा:
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय 2024