chandan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती

नमस्कार मित्रांनो chanadan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती या लेखांमध्ये आज आपण चंदन शेती विषयी सखोल माहिती बघणार आहोत ,

chandan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती

chandan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती

मित्रांनो मानवाला जेव्हा पासून शेती करायची कला अवगत झाली तेव्हा पासून मनुष्य शेती करू लागला व आपली उपजीविका भागऊ लागला ,

परंपरागत पद्धतीने शेती करून पोट भरू लागला पारंपरिक पीक घेत आला परंतु आता गरज आहे ती यातून बाहेर पडायची  , आता गरज आहे व्यावसायिक पिकांचे उत्पादन घेण्याची कारण पारंपरिक पीक जी आपण घेतो ते जेमतेम सर्व शेतकरी घेतात त्यामुळे जसी मागणी तसा पुरवठा देखील आहे त्यामुळे आपल्याला चांगला पाहिजे तसा बाजार भाव मिळत नाही , आपल्याकडे साठवणुकीचे कोणतेही साधन नसल्याने आपण साठवणूक करू शकत नाही आणि लगेच माल बाजारात घेऊन जातो , तेव्हा पुरवठा अधिक असल्याने भाव मिळत नाही आणि व्यापारी वर्ग माल साठवणूक करून ठेवतात आणि जासतीचा नफा कमवतात ,

तेव्हा काही  शेतकरी आता हळू हळू आर्थिक पिकांकडे वळत आहे  अशाच एक पिकाबद्दल आपण बघू चंदन शेती ,

अगोदर चंदन लागवड करण्यास परवानगी नव्हती परंतु आता चंदन लागवड करण्यास परवानगी आहे , आपण शासनाकडून परवानगी घेऊन चंदन लागवड करू शकता , आणि कोटी मध्ये उत्पन्न घेऊ शकता .

जमीन : चंदन लागवडीसाठी हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन लागते मालराणाची सुद्धा जमीन चालते , फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी ,

मशागत : चंदन लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी व नंतर 12 बाय 8 फूट अंतरावर 2 बाय 2 फुटाचे खड्डे खोदून घ्यावे व त्यांना उन्हाळ्यात चांगले तापू द्यावे , व पावसाळा सुरू झाला एक चांगला पाऊस पडला की मग या मध्ये चंदनाचे कलम लाऊन घ्यावे ,

कलम :  चंदनाची लागवड करत असताना शासन मान्य नर्सरी तुन कलमे आणवित

योजना : आजाकल सरकारी योजने द्वारे कलमे मिळतात किंवा मग बिल जमा करून खात्यावर रक्कम येते , खड्डे खोदायचे सुद्धा पैसे येतात ,अलग अलग योजना आहेत ज्याचा लाभ  तुम्ही घेऊ शकता ,

लागवड : चंदन लागवड करत असताना अंतर हे खूप महत्वाचे आहे की आपण किती अंतरावर लागवड करतो , घेतलेल्या अंतरावर अवलंबून असते की आपल्या एक एकर शेतामद्धे किती झाडे बसतील , बहुतेक शेतकरी 12 बाय 8 फूट अंतरावर लागवड करतात 12 बाय 8 फुटावर लागवड केल्यास एकरी 400 झाडे चंदनाची बसतात ,

चंदन हे परजीवी वनस्पति वर्गातील आहे , ते एकटे वाढत नाही त्यालां सोबत अन्नसाठा देण्यासाठी इतर वनस्पतीची गरज लागते जसे की कडू निंब , मिलिया दुबिया , तूर इत्यादि ,

परीपक्व होण्यास लागणार काळ : चंदन लागवड केल्यापासून 10 ते 12 वर्षात ते पक्व होते व आपण त्याला कापू शकतो आणि विक्री करू शकतो ,

विक्री : चंदन लागवड करताना जशी परवानगी लागते म्हणजे 7 / 12 वर नोंद करावी लागते तशी विक्री करताना परवानगी घ्यावी लागते आपण चंदन स्वत: कापून स्वत: खुल्या बाजारात विकू शकत नाही , तर शासन स्वत: ते आपल्याकडून खरेदी करते ,

चंदणचे भाव नेहमी बदलत असतात सध्या 12,500 रुपये किलो प्रमाणे चंदणाला भाव आहे ,

चंदनाचा कोणताच भाग फेकला जात नाही सर्व भाग मूल्यवान आहे ,

chandan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती

chandan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती

सुरक्षा :चंदन मूल्यवान असल्या कारणाने त्याची खूप काळजी घ्यावी लागते ,त्यासाठी काय काय उपाय आहेत बघू

1. विदेशी कुत्री : चंदन जोपर्यंत लहान आहे म्हणजे 8 वर्षापर्यंत त्याला भीती नसते जेव्हा चंदन 8 वर्षांचे होते तेव्हा त्यामध्ये सुगंधित गाभा तयार होतो आणि तेव्हापासून त्याला चोरांची भीती असते , तेव्हा चंदन शेतामद्धे शेतकरी विदेशी कुत्री पाळतात जेणेकरून चोर येणार नाही

2. CCTV कॅमेरा : चंदनाचे संरक्षण करण्यासाठी cctv कॅमेरा लावला जातो जेणेकरून आपण शेतावर नजर ठेऊ शकू ,

3. काटेरी बांबू : जेव्हा आपण चंदन लागवड करू त्यासोबतच काटेरी बांबू सुद्धा लावावे जेणेकरून चंदन वाढत असताना बांबू सुद्धा त्याच्या सोबत वाढेल व बांबू हे काटेरी असतात , काटेरी बांबू चे कुंपण असल्याने चोर मध्ये येणार नाही,

4. स्मार्ट चिप : चंदनामध्ये स्मार्ट चिप बसवली जाते जेणेकरून कुणी शेतात आले की आपल्याला कळेल ,

5. सेंसर : आपण शेतामद्धे सेन्सर सुद्धा लाऊ शकता .

6. बंदूक धारी सुरक्षा रक्षक : आजकाल राज्य सरकार तुम्हाला बंदुकीचे परवाना देतात , तुम्हाला चंदन लागवड केल्यानंतर त्याची नोंद तुमच्या 7/12 वर करावी लागेल तेव्हा तुम्हाला बंदुकीचा परवाना मिळेल ,

ज्याप्रमाणे चंदन जोपासणे महत्वाचे आहे त्या प्रमाणे त्याचे रक्षण सुद्धा महत्वाचे आहे , नाहीतर मग आपण वाढवायचे मोठे करायचे आणि चोर येऊन कापून न्यायचे ,

आंतर पीक : चंदन शेतीमध्ये तुम्ही आंतर पीक सुद्धा घेऊ शकता फक्त पीक जास्त उंच वाढणारे नसावे ,

कमी उंचीचे असावे जसे की भाजीपाला , सोयाबीन वैगेरे , उसा सारखे पीक नसावे ,

chanadan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती

चंदन शेतीमध्ये आपण कोंबडी पालन , मधमाशी पालन सुद्धा करू शकता जेणेकरून जोपर्यन्त चंदन उत्पन्न देत नाही तोपर्यंत कोंबडी आणि मधमाशी पालनातून तुम्हाला आर्थिक हातभार लागेल ,

एकरी झाडांची संख्या : बरेच शेतकरी अलग अलग अंतर वापरतात परंतु 12 बाय 8 हे उत्तम अंतर आहे आणि या अंतरावर लागवड केल्यास एक एकर मध्ये 400 झाडे बसतात

व 12 ते 15 वर्षात 1 झाड 4 लाख रुपयांना विकले जाईल

म्हणजे जवळपास एक एकर चंदन आपल्याला 8 कोटी रुपयांचे उत्पन्न देईल .

हे पण वाचा : 

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

Leave a Reply