नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये चिकू शेती विषयी जाणून घेणार आहोत ज्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण एक एकर शेतीमधून चिकूचे 1 लाख रुपये उत्पन्न कसे घेऊ शकतो .
मित्रांनो चिकू चे उत्पन्न आपण 12 ही महीने घेऊ शकतो पेरू प्रमाणे , परंतु उन्हाळ्यामद्धे इतर वेळेच्या तुलनेत जास्त बाजार भाव मिळतो त्यामुळे शेतकरी शक्यतो उन्हाळ्यात उत्पन्न घेणे पसंत करतात ,
चिकू लागवड एकरी 2 लाखाची शेती , कमीत कमी खर्चात:
तर मित्रांनो आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की चिकू च्या कोणत्या जाती आहेत आणि कशा प्रकारे लागवड करतात जमीन कशी असावी या विषयी अगोदर माहिती बघू .
चिकू च्या जाती : चिकूच्या तशा भरपूर जाती आहेत परंतु आपल्याकडे महत्वाच्या दोन जाती आहेत ज्यांची लागवड शेतकरी जास्त प्रमाणात करतात
१. क्रिकेट ब्वाल आणि २. काली पत्ती
उत्पन्नाला सुरुवात : चिकू लागवडीपासून 2 ते 3 वर्षानंतर चांगल्या प्रकारे उत्पन्नाला सुरवात होते . आणि झाडांच्या वयानुसार दर वर्षी उत्पन्न वाढत जाते .
चिकू लागवडीसाठी जमीन : काळी कसदार , पाण्याचा निचरा होणारी जमीन चिकू लागवडीसाठी अतिशय उपयुक्त आहे , परंतु काळी जमीन नसेल तर मुरमाड जमीन सुद्धा चालेल , चिकू लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल मशागत करून घ्यावी आणि आपल्या मनाप्रमाणे ठराविक अंतरावर खड्डे खोदून घ्यावे व त्यांना उन्हा मध्ये चांगले तापू द्यावे व नंतर शेणखत , निंबोळी पेंड व बुरशीनाशक टाकून खड्डे पूर्ण भरून घ्यावे , आणि पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये चिकू च्या कलमा लाऊन घ्याव्यात .
माती परीक्षण : मित्रांनो अगोदर शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करायचे त्यावेळी माती परीक्षण काय असते या विषयी लोकांना माहिती नसायचे स्वत: ला मनात येईल ते पीक ते लावायचे आणि मग कोणत्या पिकाला कोणती जमीन लागते हे त्यांना माहीत नसायचे परंतु आता माती परीक्षण करून आपण माहीत करू शकतो की आपल्या जमिनीत कोणते घटक आहेत , कोणते खत द्यावे लागेल , तेव्हा फळ बाग लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण जरूर करावे .
चिकू लागवडीतील अंतर : लागवड करत असताना शेतकरी अलग अलग अंतर ठेवतात कोणी 15×15 तर कोणी 20×20 अंतर ठेवतात तुम्ही तुमच्या मनानुसार अंतर ठेऊ शकता परंतु झाडे जास्त एकात एक गुरफटता कामा नये .
चिकू च्या कलमा 2 प्रकारे तयार करतात
1. बियापासून : पोलीथीन मध्ये बी लाऊन त्याचे रोप लागवडियोग्य झाल्यानंतर त्याची लागवड करतात
2. कलम पद्धत : झाडाची सशक्त फांदी घेऊन त्याची कलम तयार करतात आणि ती लागवडियोग्य झाल्यास तिची लागवड करतात , बियापासून तयार केलेल्या रोपा पेक्षा कलम केलेल्या झाडाला लवकर फळ धारणा होते .
प्रती झाड उत्पन्न : जमीन चांगली असेल , पाण्याची व्यवस्था चांगली असेल , खत औषधी वेळेत असेल तर प्रती झाड 130 ते 150 किलो चिकू मिळतात , जे कि खूप चांगल्या पैकी उत्पन्न आहे चिकू या पिकाला इतर पिकांच्या तुलनेत मेहनत व खर्च सुद्धा कमी आहे .
सिंचन व्यवस्थापन : मित्रांनो पीक कोणते ही असो त्याला पानी हे मुबलक प्रमाणात पाहिजे , पाण्याशिवाय कोणतेच पीक शक्य नाही , तुमच्याकडे पानी जास्त प्रमाणात असेल तर ठीक जर पाण्याची उपलब्धता कमी असेल तर तुम्ही ठिबक सिंचन या सिंचन प्रणालीचा वापर करू शकता व कमी पाण्यात सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता ,
अंतर पीक :
1. मधमाशी पालन: मित्रांनो चिकू हे पीक उंच वाढणारे पीक आहे त्यामध्ये आपण अंतर पीक घेऊ शकत नाही परंतु आपण चिकू बागेमध्ये मदमाशांच्या पेट्या ठेऊ शकता ज्याने आपल्याला दुहेरी फायदा होईल एकतर मदमाशानमुळे परागीभंवण चांगले होऊन उत्पन्न वाढ होईल आणि तुम्हाला मध सुद्धा मिळेल , हे अतिरिक्त उत्पन्न असेल ,
2. कोंबडी पालन : मित्रांनो आपण चिकू बागेमध्ये मधमाशी पालन करत असताना कोंबडी पालन सुद्धा करू शकता आणि कोंबडी पालणातून खूप चांगला नफा तुम्ही कामाऊ शकता , त्यापासून तुम्हाला अंडी तसेच मटन मिळू शकते , आणि कोंबडयंपासून खत सुद्धा मिळेल हा दुहेरी फायदा आहे .
चिकू लागवड एकरी 2 लाखाची शेती , कमीत कमी खर्चात:
आणि चिकू च्या उत्पन्ना व्यतिरिक्त हे अतिरिक्त उत्पन्न आहे ,
जशी मेहनत कराल जसा बुद्धीचा वापर कराल तसा नफा कमाऊ शकता , लोक कमी जागेत अधिक उत्पन्न कसे घेता येईल याचा विचार करतात आणि डोकं लाऊन पैसा कमावतात .
इतर पिकांच्या तुलनेत चिकू मध्ये चांगल्या प्रकारचा आर्थिक नफा मिळतो .
चिकू हे वर्ष भर फळ देणारे पीक आहे .
तर मित्रांनो आज आपण या लेखामध्ये चिकू लागवड , सोबत मधमाशी पालन , व कोंबडी पालन या विषयी माहिती बघितली .
हे पण वाचा
What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय 2024
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?
FAQ
1. चिकू लागवड कशी करतात
2. चिकू लागवडीसाठी जमीन कशी असावी
3. चिकू लागवडीतील अंतर
4. चिकू च्या जाती कोणत्या आहेत