नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये गाय पालन या विषयी माहिती बघणार आहोत ज्यामध्ये आपण बघणार आहोत दूध व्यवसायासाठी गाईंच्या कोणत्या जाती आहेत ज्या चांगल्या प्रकारे दूध देतात,
Cow Rearing गाय पालन महिना नफा 90 हजार
गाईंच्या जाती :मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गाईच्या भरपूर जाती पाहायला मिळतात त्यामध्ये संकरित गाय ,देसी गाय ,जिला आपण गावरान गाय सुद्धा म्हणतो गिर गाय, जर्सी गाय इत्यादी गाईंच्या जाती आहेत,
गीर गाय : मित्रांनो गिर गायीच्या दुधाला खूप मागणी असते आणि स्वास्थ्यासाठी गाईचे दूध हे अमृता समान आहे ,गीर गायीच्या दुधाला तसेच तुपाला खूप मागणी आहे आरोग्य शास्त्रामध्ये गिर गायीचे दूध हे खूप महत्त्वाचे मानले गेले ,
गिर गायीचे दूध हे चवीला खूप चांगले असते आणि घट्ट सुद्धा असते,
परंतु गिरगाय जर्सी गायीच्या तुलनेत दूध कमी देते त्यामुळे काही शेतकरी गीर गाईच्या ऐवजी जर्सी गाई पाळणे पसंत करतात,
जर्सी गाय : इतर सर्व गाईंच्या तुलनेत जर्सी गाय ही तुलनेने खूप जास्त दूध देते तुम्ही बघितले असेल की दूध काढायला जर वेळ झाला तर जर्सी गाईच्या कासेतूनआपोआप दूध गळायला सुरुवात होते,
जर्सी गायीचे दूध हे तुलनेने खूप पातळ असते आणि चवीला सुद्धा गिर गायीच्या तुलनेत किंवा देशी गाईच्या तुलनेत वेगळे लागते म्हणजेच चवदार लागत नाही,
कोणती गाय निवडावी: मित्रांना मी वरती दोन्ही गाईंचा उल्लेख केला आहे की जर्सी गाय पाळाल तर दूध जास्त मिळेल परंतु दुधाला चव कमी असल्यामुळे किंवा दूध पातळ असल्यामुळे त्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही,
आणि गिर गाय पाळाल तर दूध कमी देते परंतु तेच चवीला खूप चांगले असते आणि त्याला मागणी सुद्धा खूप आहे,
त्यामुळे दोन्हींची तुलना जर करायची झाली तर एक प्रमाणात जास्त निघते तर भाव नाही आणि एक प्रमाणात कमी निघते पण भाव जास्त आहे म्हणजे एकंदरीत दोन्ही सारखेच पडतात,
मित्रांनो गोपालन करायचे झाले तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना राहण्यासाठी निवारा तुम्ही सुरुवातीला तुमच्या ऐपतीप्रमाणे गोठा बनवू शकता सुरुवातीला जास्त खर्च करायची गरज नाही खूप सारे शेतकरी सुरुवातीला खूप सारा खर्च गोठ्यावरती करतात आणि मग त्यांचे खर्चाचे नियोजन करणे अवघड होऊन जाते ,म्हणून सुरुवातीला गोठ्यावरती जास्त खर्च न करता गायींकडे व्यवस्थित लक्ष द्यावे जेव्हा तुमचे उत्पन्न वाढेल तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे गोठा करू शकता,
गोठ्याचे प्रकार :
बंदिस्त गोठा: यामध्ये पूर्ण गोठा हा बंदिस्त असतो गायींना बिलकुल बाहेर जाण्याची गरज नसते सर्व काही त्यांना त्या गोठ्याच्या आत मध्ये मिळत असते पाणी वगैरे चारा वगैरे सर्व काही त्यांना त्या बंदिस्त गोठ्यामध्ये मिळते ज्या लोकांकडे जमीन कमी आहे किंवा आसपास मोकळी जागा नाही ते लोक बंदिस्त गोठा बांधतात ,
- अर्धबंदिस्त गोठा : या प्रकारामध्ये शेतकऱ्यांकडे काही जमीन असते त्यामध्ये ते अर्ध्या जमिनीमध्ये गोठा करतात आणि अर्धी जमीन खाली ठेवतात या प्रकारामध्ये शेतकरी काही काळ गाईंना गोठ्यात बांधून ठेवतात आणि काही काळ मोकळ्याजागेमध्ये सोडतात आणि आसपास जंगल किंवा डोंगराळ भाग असेल तर त्यामध्ये फिरायला घेऊन जातात जेणेकरून गाईंना सर्व प्रकारचे वनस्पती खायला मिळतात,
3. मुक्त संचार गोठा : यामध्ये चारही बाजूंनी तार किंवा जाळीचे कंपाऊंड केलेले असते आणि मध्ये गाई मोकळ्या सोडलेल्या असतात रात्रभर मध्ये ठेवतात आणि सकाळी बाहेर डोंगर किंवा जंगलामध्ये चरण्यासाठी घेऊन जातात,
दिवसभर बाहेर चरल्यानंतर परत संध्याकाळी गोठ्यामध्ये आणून सोडतात,
जागोजागी पाण्यासाठी हौद केलेले असतात,
जनावरे गरजेनुसार जाऊन स्वतः पाणी पितात त्यांना वेगळे असे पाणी द्यायची गरज पडत नाही,
काही शेतकरी शेताच्या मध्यभागी गोठा बनवतात काही शेतकरी शेताला चारही बाजूने कंपाउंड करतात आणि बाहेरच्या बाजूला शेड वगैरे बनवतात,
आणि मध्यभागी मोकळी जागा ठेवतात जनावरे रात्रभर शेडमध्ये बांधतात आणि दिवसा मधल्या मोकळ्या जागेमध्ये सोडून देतात,
सावलीची व्यवस्था : कोणत्याही गोठ्यामध्ये सावलीची व्यवस्था असणे खूप गरजेचे आहे गोठ्याचा प्रकार कोणताही असो मात्र सावलीसाठी झाडांची व्यवस्था असणे गरजेचे आहे ,
त्यासाठी तुम्ही सावलीसाठी सदाहरित झाडे लावू शकता जे 12 ही महिने हिरवे राहतील जसे की नारळ वगैरे नारळापासून तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल एकतर ते उंच वाढतील त्यामुळे खाली अडचण होणार नाही आणि सावली भरपूर प्रमाणात राहील एक निसर्गरम्य वातावरण सुद्धा मिळेल आणि झाडांपासून नारळ सुद्धा तुम्हाला मिळतील.
पाणी व्यवस्थापन: शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की जल हे जीवन आहे आणि ते सजीवांसाठी अत्यंत गरजेचे आहे त्याचप्रमाणे गोपालनासाठी पांनी हा महत्त्वाचा घटक आहे,
पाणी हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असायला हवे गोठ्यामध्ये 2 ते 3 ठिकाणी पाण्याचे व्यवस्था करून ठेवली तर जनावरे स्वतः जाऊन पाणी पितील तुम्हाला ते टेन्शन राहणार नाही,
धुण्यासाठी व्यवस्था : जनावरांना हप्त्यामध्ये एक ते दोन वेळेस धुलाई करण्याची व्यवस्था असावी जेणेकरूनजनावरे रोगराईपासून दूर राहील,
खत व्यवस्थापन: खत व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे खूप महत्त्वाचे आहे कारण ज्याप्रमाणे आपण दुधापासून पैसे कमवू शकता त्याचप्रमाणे शेणखत विक्रीतूनही मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकता तुम्ही ऐकले का माहित नाही परंतु माझ्या ऐकण्यात आहे एका शेतकऱ्याने फक्त शेणखत विकून एक कोटी रुपयांचा बंगला बांधलेला आहे मग तुम्ही समजू शकता की शेणखत किती महाग विकू शकते पाच ते सहा हजार रुपयाला एक ट्रॅक्टर ट्राली विक्री केले जाते,
कालवड व्यवस्थापन: ज्याप्रमाणे आपण दूध विक्री शेणखत विक्री यामधून पैसे मिळवतो त्याचप्रमाणे कालवड व्यवस्थापनातून सुद्धा आपणच चांगल्या प्रमाणात नफा कमवू शकता जातिवंत कालवडी निर्माण करून त्या दुध देण्या योग्य झाल्यास विक्री करून यामधूनही आपण चांगला नफा कमवू शकता,
चारा व्यवस्थापन: मित्रांनो जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात असणे खूप महत्त्वाचे आहे त्यांना मुबलक प्रमाणात खायला असेल तरच गाई दूध देऊ शकतात आणि आपल्याला फायदा होऊ शकतो,
त्यासाठी तुमच्याकडे जी थोडीफार जमीन आहे त्यामध्ये तुम्ही चारा घेऊ शकता जसे की बाजरी ,मका, ज्वारी, दशरथ घास, शेवगा ,घास ,हत्ती गवत ,मेथी घास इत्यादी गवताचे प्रकार आहेत ते तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात लावू शकता ज्याने जनावरांना खायला काही अडचण येणार नाही कारण दररोज बदलून बदलून गवत त्यांना भेटले तर जनावर एकच गवत रोज खाऊन कंटाळणार नाही,
हॉटेल वेस्ट तुमच्या आसपास कुठे हॉटेल असेल तर तुम्ही बघितले असेल की हॉटेलमध्ये सुद्धा दिवसाच्या शेवटी खूप सारे वेस्ट वाचलेले असते ते वेस्ट तुम्ही जनावरांसाठी घेऊन जाऊ शकता,
भाजीपाला वेस्टेज: तुमच्या आसपास कुठे आठवडी बाजार भरत असेल तर तुम्ही बघितले असेल बाजारामध्ये दिवसाच्या शेवटी खूप सारा भाजीपाला भरलेला असतो भाजी विक्रेते तो भाजीपाला शेवटी तसाच फेकून जातात तोही भाजीपाला वेस्ट तुम्ही जनावरांना देऊ शकता चे जनावरे आवडीने खातात,
गोपालनातून उत्पन्न: मित्रांनो सध्या दुधाला अलग अलग ठिकाणी अलग अलग रेट आहे काही ठिकाणी दूध 60 रुपये किलोने विक्री होते तर काही ठिकाणी चाळीस रुपये भाव आहे दुधाचे रेट हे कमी जास्त होत असतात परंतु सर्वसाधारणपणे साठ रुपये जर आपण पकडले तर एक गाय दिवसाला सकाळ संध्याकाळ मिळून दहा लिटर दूध देते दहा लिटर याप्रमाणे तीनशे लिटर 300 लिटर गुणीला 60 रुपये म्हणजेच येता गाईपासून महिना 18000 रुपये उत्पन्न मिळते मग तुम्ही गाईंची संख्या वाढवली तर त्या प्रमाणात तुमचे उत्पन्न वाढत जाईल आणि कालवड विक्री शेणखत विक्री हे उत्पन्न तर आपण आणखी यामध्ये जोडले नाही,
सरकारी अनुदान आज काल शेतकऱ्यांना राज्य सरकार तसेच केंद्र सरकारतर्फे गोपालन करण्यासाठी आर्थिक अनुदान सुद्धा दिले जाते त्याचाही फायदा आपण घेऊ शकता,
हे पण वाचा :