Drip Irrigation | दिवसेंदिवस पाऊस कमी होत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे.या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना कमी पाणी लागणारी पिके घेण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. त्याचप्रमाणे यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनवर अनुदान (Drip Irrigation Subsidy) देखील दिले जात आहे.
Drip Irrigation | ठिबक आणि तुषार सिंचनवर सरकार देतंय 90% अनुदान ; असा करा अर्ज
ठिबक सिंचन तंत्र म्हणजे काय? | Drip Irrigation
आजकाल भूजल पातळी म्हणजे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे.त्यामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई देखील निर्माण होत आहे.आणि या सगळ्याचा परिणाम शेती व्यवसायावर दिसून येत आहे.पाण्याचा टंचाईमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे सरकारने देखील शेतकऱ्यांना कमी पाणी लागणारी पिके घेण्याचे आव्हान केले आहे. ठिबक सिंचन ही एक अशी सिंचन प्रणाली आहे यामध्ये पाणी व्यर्थ न जाता छोट्या छोट्या पाईप द्वारे अगदी झाडाच्या खोडाजवळ पाणी दिले जाते यामुळे पाण्याची 60 टक्के बचत होते.
हे पण वाचा : SBI LOAN: आता घरावर सोलर बसवण्यासाठी SBI BANK देणार कर्ज, पीएम सूर्य घर योजनेचा असा घ्या फायदा. 2024
तुषार सिंचन : तुषार सिंचन ही एक अशी सिंचन प्रणाली आहे ज्याद्वारे लोखंडी पाईप उभे केले जातात आणि त्यावरती नोजल लावलेले असतात ज्याद्वारे पावसाच्या पाण्याप्रमाणे हवेत फवारे सोडले जातात , ज्यामुळे कमी पाण्यामध्ये पिकाला जास्त पाणी दिले जाते.
सरकार प्रोत्साहन देत आहे
पाण्याचा वापर कमी करणाऱ्या सिंचनासाठी अशा साधनांचा वापर करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त जमीन सिंचन करणे हे एकमेव सरकारचे उद्देश आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन हा चांगला पर्याय आहे. यामुळे पाणी वाया जात नाही आणि झाडांना देखील योग्य पाणी मिळते.
शासनाकडून अनुदान मिळते
या ठिबक व तुषार सिंचन योजनेअंतर्गत सरकारकडून सरकारकडून अनुदान दिले जाते. या ठिबक सिंचनाला ठिबक सिंचन नियंत्रण असे देखील म्हटले जाते. हे ठिबक सिंचन शेतात बसवल्यावर पाणी थेट झाडांच्या मुळाशी जाते. त्यामुळे पाणी वाया जात नाही. आणि झाडाची देखील योग्य प्रमाणात वाढ होते. त्याचप्रमाणे जमिनीत ओलावा देखील टिकून राहतो. (Drip Irrigation Subsidy) त्यामुळे झाडाला जास्त पाणी लागत नाही.
या ठिबक सिंचनाचा अवलंब करून शेतकरी आता कमी पाण्यामध्ये जास्त पिके घेऊ शकता. या प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आता आंबा, केळी, अननस, भाजीपाला, कांदा, पेरू, डाळिंब, पपई यांसारखी देखील पिके घेत आहेत.
हे पण वाचा : Solar Subsidy Scheme 2024 : सोलर सिस्टम बसवा आणि सोलर योजनेतून मिळणाऱ्या 78 हजार अनुदानाचा लाभ घ्या .
अनुदानासाठी अटी
सरकार शेतकऱ्यांना ठिबक सिंचनावर अनुदान देत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अडीच एकरपर्यंत कोरडवाहू किंवा दीड एकरपर्यंत बागायती जमीन आहे. त्यांना जवळपास 90% पर्यंत अनुदान मिळते. ही अनुदानाची रक्कम राज्यानुसार बदलते.
ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त कोरडवाहू आणि अडीच एकरपेक्षा जास्त बागायती जमीन आहे. त्यांना इतर शेतकरी म्हणतात. या शेतकऱ्यांना 60 ते 80 टक्के पर्यंत अनुदान मिळते.