Drought Fund : केवायसी नसल्याने दुष्काळ निधीपासून शेतकरी दुर

Drought Fund : केंद्र तसेच राज्य सरकार  शेतकर्‍यां साठी रोज नवनवीन योजना घेऊन येत असते,

मागील वर्षी बर्‍याच ठिकाणी दुष्काळ पडला होता, पुरंदर तालुक्यातील ५६ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटी ५६ लाख रुपयांचा दुष्काळी निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही बँक खाते केवायसी केले नसल्याने निधीची रक्कम बँक खात्यात वर्ग होत नाही.


Drought Fund : केवायसी नसल्याने दुष्काळ निधीपासून शेतकरी दुर

त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, संगणक कर्मचारी यांना भेटून आपली नोंद झाली का नाही ते तपासून तातडीने बँक खात्याची केवायसी करून घ्यावी. जेणेकरून  दुष्काळी निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा होण्यास मदत होईल.

हे पण वाचा:Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती 2024

यंदा खरीप, रब्बी हंगाम वाया गेला असून अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावोगावी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अद्याप ५६ हजार शेतकऱ्यांची नोंद असली तरी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांची नोंद घेतली जाईल. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांचा आकडा आणखी वाढेल, सर्वांना लाभ दिला जाईल.

हे पण वाचा: how to close paytm fastag:paytm फास्टॅग कसा बंद करायचा 2024
पुरंदर तालुक्यातील जिरायती क्षेत्र २१ हजार २९६. ४ हेक्टर इतके असून शेतकऱ्यांची संख्या ३१ हजार १२० इतकी आहे. प्रती हेक्टर ८५०० या प्रमाणे १८ कोटी १० लाख १९ हजार ४०० रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. तसेच बागायती क्षेत्र ४ हजार ८०० हेक्टर असून शेतकऱ्यांची संख्या १३ हजार ४८० इतकी आहे.

यासाठी प्रती हेक्टर १७ हजार रुपये याप्रमाणे ८ कोटी १६ लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. बहुवार्षिक क्षेत्र ३६९१.६९ हेक्टर आहे तर ११ हजार ४०० इतकी शेतकऱ्यांची संख्या असून प्रती हेक्टर २२ हजार ५०० रुपये याप्रमाणे ८ कोटी ३० लाख ६३ हजार अनुदान येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

बाकी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी देखील केवायसी करून घ्यावी जेणेकरून त्यांनी अशा अडचणी येणार नाहीत.

Leave a Reply