Farm Ploughing : शेत नांगरण्याची योग्य वेळ कोणती 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो या लेखामध्ये आपण बघणार आहोत जमिनीची मशागत केल्याचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

जमीन केव्हा आणि कशी नांगरावी या विषयी जाणून घेणार आहोत ,

Farm Ploughing : शेत नांगरण्याची योग्य वेळ कोणती?

Farm Ploughing : शेत नांगरण्याची योग्य वेळ कोणती?

Farm Ploughing : शेत नांगरण्याची योग्य वेळ कोणती 2024

शेती मग ती बागायती असो किंवा कोरडवाहू चांगल्या चांगल्या उत्पादनासाठी जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीला महत्त्व आहे बियांची अंकुरण पिकांच्या मुळांची वाढ होण्याकरिता जमीन मोकळी व भुसभुशीत असणे आवश्यक असतं

त्यासाठी पिकाच्या पेरणीपुर्वी जमिन चांगली नांगरली (Ploughing)  जाते.

खरीप (Kharif) आणि रब्बी (Rabbi Season) पिके

खरीप (Kharif) आणि रब्बी (Rabbi Season) पिकेघेतल्यानंतर उन्हाळा (Summer Season) सुरु होण्यापूर्वी जमिन नांगरून तापू दिली जाते, या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात.

पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट खोल जमिन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान गेले कि १५ से.मी. खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते.

जमिनीची नांगरणी केल्याने उत्पन्नात वाढ होते त्यामुळे शेतकरी पूर्वी पासून शेतीची नांगरणी करत आले आहेत , अगोदर एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या तरी सुद्धा शेतकरी बैल जोडीने शेताची नांगरणी करायचे ,

अशा वेळी नांगरट केल्यास जमिनीतील बुरशीजन्य रोग, किडींच्या सुप्तावस्था, कोष नष्ट होतात. त्यामुळे उ्हाळ्यातील जमिनीची खोल नांगरट अतीशय महत्वाची आहे.

Farm Ploughing : शेत नांगरण्याची योग्य वेळ कोणती?:

आजकाल शेतीची नांगरट करताना चाप्या निघण्याच प्रमाण वाढल आहे. नांगरट करताना जर चाप्या निघण्याचं प्रमाण जास्त असेल तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललं आहे असं समजाव.

तर चाप्या कमी निघत असतील तर अशा जमिनीचं आरोग्य चांगल आहे असं समजावं. यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाच प्रमाण तपासण आवश्यक आहे.

 पाऊस पडतो तेंव्हा तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते,त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते.

त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो.जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.

त्यामुळे जमिनीची खोल नांगरणी करणे हे खूप फायदेशीर आहे ,

नांगरटीचा उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते.

कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरट खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीस सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा होतो.त्यामुळे शक्य असल्यास लगेच शेत खाली झाले की नांगरून घ्यावे म्हणजे आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा होतो .

पिकांची काढणी झाल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये त्वरित नांगरण्या कराव्यात.

tractor ploughing image

आपल्याकडे 3 ऋतु पाहायला मिळतात उन्हाळा , हिवाळा , पावसाळा उन्हाळा म्हणजे जवळपास मार्च एप्रिल मध्ये आपल्याकडे जाणवतो तेव्हा जवळपास जमिनीतील पिकांची काढणी झालेली असते , तेव्हा आपण शेत रिकामे झाले की लगेच नांगरणी करून घ्यावी ,

हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.

हंगामात घ्यावयाच्या पिकानुसार, नांगरटीची खोली ठरवावी. सर्वसाधारणपणे ऊस, बटाटा, आले, भाजीपाला अशा बागायती पिकांसाठी जमिनीची १५ ते २० से.मी खोल नांगरट करणे आवश्यक आहे तर ज्वारी, बाजरी, गहू, भुईमुग या पिकांसाठी जमिन १० ते १५ से.मी. खोल नांगरावी.

खोल नांगरटीमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.

जमिनीचे खोल नागरट केल्यामुळे काही पिकास अपायकारक जे जिवाणू असतील ते नष्ट होतात.

जमिनीला भरपूर सूर्यप्रकाश मिळून उष्णता जमिनीस पोषक ठरते. तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.

याशिवाय जमिनीचा कडक झालेला पृष्ठभाग भुसभूशीत होऊन जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.

आजकाल शून्य मशागत शेतीचे तंत्र नव्याने विकसित होत आहे , ज्यामध्ये मशागतीवर होणारा जो खर्च आहे तो वाचवला जातो , त्यांच्या मते मशागतीवर होणारा खर्च वाचला तर उत्पन्नात वाढ होईल , शून्य मशागतीमध्ये जे अगोदरच्या पिकांचे अवशेष आहेत ते जसेच्या तसे शेतात ठेवतात आणि दुसरे पीक त्याच्या मध्येच पेरतात , असे केल्याने नवीन पिकाला सेंद्रिय पदार्थ त्यामधून मिळतात असे त्यांचे मत आहे , परंतु शेतात पूर्व पिकांचे अवशेष असल्यास मशागतीला खूप अडचणी येतात , आणि मशागत करणे हे शून्य मशागतीपेक्षा मशागत करणे ही फायद्याची बाब आहे ,

मशागत केल्याने जमिनीला खूप सारे फायदे होतात ,

हे पण वाचा :

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय 2024

limbu : कागदी  लिंबू लागवड शेतकऱ्या चे ATM एकरी 6 लाख रुपये उत्पन्न

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला नक्की कळवा

धन्यवाद.

Leave a Reply