नमस्कार मित्रांनो गायरान( Gayran jamin)जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना राज्य सरकार नोटीस बदलणार आहे दिवसात उत्तर न आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत.
पुढील 60 दिवसांत महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार ही कारवाई केली जाईल, अशी माहिती माहिती राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात दिली.
Gayran jamin 2023 गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना राज्य सरकार नोटीस बजावणार:
Gayran Land : सरकारी मालकीच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण (Gayran Land Encroachments) करणाऱ्यांना नव्याने नोटिसा बजावणार असल्याची माहिती सोमवारी (27 फेब्रुवारी) राज्य सरकारने हायकोर्टात (Bombay High Court) दिली. ज्यातून त्यांना ‘त्या’ जमिनीवरील ताबा सिद्ध करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाईल. मात्र यात अपयशी ठरल्यास अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पुढील 60 दिवसांत महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार ही कारवाई केली जाईल, अशी माहिती माहिती राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात दिली.
गायरान जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याबाबत राज्य सरकारचं काही धोरण आहे का? आणि यापुढे काय कारवाई करण्यात येणार याचा कृती आराखडाही सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. मात्र याबाबत अद्याप कोणतंही उत्तर दिलं गेलेलं नाही, तरीही कायद्यानुसार योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. त्यावर हे अतिक्रमण करणाऱ्यांना ते कोणत्या सरकारी योजनेसाठी पात्र आहेत हे दाखवून देण्याचे निर्देश देत या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली.
गायरान जमिनींवर अंदाजे 2 लाख 22 हजार 153 बेकायदेशीर बांधकामे
गेल्या सुनावणीत हायकोर्टाने सरकारला जुलै 2011 पर्यंतच्या नियमित करण्यात आलेल्या बांधकामांचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने हायकोर्टात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गायरान जमिनींवर सध्या अंदाजे 2 लाख 22 हजार 153 बेकायदेशीर बांधकामे आहेत. त्यातील 4.52 हेक्टर जमिनीपैकी अंदाजे अतिक्रमित क्षेत्र हे 10 हजार 89 हेक्टर इतकं आहे. हे प्रमाण सरकारी मालकीच्या जमिनीच्या निव्वळ 2.23 टक्के आहे अशि माहिती दिली.
समाजात अनेक आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक आहेत त्यांच्याकडे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही तेव्हा ते सरकारी असलेल्या गायरान जमिनीवर वस्ती करून राहतात , जवळपास प्रतेक गावात गायरान जमिनी आहेत , आणि बऱ्याच अंशी या गायरान जमिनीवर लोकांनी कब्जा केलेला आहे , आणि पक्की घरे सुद्धा बांधलेली आहेत , आता सरकार साठी हे मोठे आव्हान आहे की यांना इथून कशे काढायचे , बऱ्याच ठिकाणी लोकांनी पक्की घरे बांधली आहेत आणि काही ठिकाणी काही लोक शेती सुद्धा करत आहेत , अशाप्रकारे गायरान जमिनीवर खूप ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे ,
आता लोकांचे लक्ष्य लागून आहे की सरकार तर्फे गायरान जमिनींवरच्या अतिक्रमणांवर काय निर्णय पाहायला मिळतो ,
गायरान जमिनींवरच्या अतिक्रमणांवर कारवाईवर ठाम : राज्य सरकार
जून 2022 मध्ये यासंबंधित एक जनहित याचिका फेटाळताना गायरान जमिनींवरील अतिक्रमणांची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. तसेच याप्रकरणी सुमोटो अंतर्गत जनहित याचिका दाखल करुन घेतली होती. हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. ज्यात राज्यभरातील गायरान जमिनींवरच्या अतिक्रमणांवर कारवाईवर राज्य सरकारने आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.
गायरान जमीन म्हणजे काय ?
उत्तर: स्वातंत्रपूर्व काळापासून प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक वापरासाठी गावातील एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी काही जमीन राखीव ठेवण्यात येते.
अशा जमिनी संबंधित ग्राम पंचायतीच्या ताब्यात असतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २२ अन्वये, ‘गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी किंवा त्यांचे भाग, वनासाठी किंवा राखीव जळणासाठी, गावातील गुरेढोरांकरीता मोफत कुरणासाठी किंवा राखीव गवतासाठी किंवा वैरणीसाठी, दहनभूमीसाठी किंवा दफनभूमीसाठी, गावठाणासाठी, छावणीसाठी, मळणीसाठी, बाजारासाठी, कातडी कमविण्यासाठी, रस्ते, बोळ, उद्याने, गटारे, यांसारख्या किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी, वेगळे ठेवणे हे कायदेशीर असेल आणि अभिहस्तांकित केलेल्या जमिनींचा जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीवाचून अन्यथा उपयोग करण्यात येणार नाही’ अशी तरतुद आहे.
अशा जमिनीपैकी मोफत कुरणासाठी किंवा राखीव गवतासाठी किंवा वैरणीसाठी देण्यात आलेल्या जमिनीला ‘गायरान जमीन’ म्हटले जाते.
हे पण वाचा :
MAHOGANI : शेताच्या बांधावर लावा हे झाड मिळेल पैसाच पैसा
What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय 2024
limbu : कागदी लिंबू लागवड शेतकऱ्या चे ATM एकरी 6 लाख रुपये उत्पन्न
निष्कर्ष
मित्रांनो या लेखामध्ये आपण गायरान जमीन म्हणजे काय? गायरान जमिनी विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघितली,
लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र मंडळींना शेअर करा धन्यवाद.