Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या लेखामध्ये आपण  Honey Bee मधमाशी पालन कसे कसे करतात , त्यामधुन आर्थिक नफा किती होतो या विषयी संपूर्ण बघणार आहोत , 

पूर्वी फक्त पारंपरिक पद्धतीने मधाचे उत्पन्न घेतले जायचे , म्हणजे आदिवाशी लोक आणि काही भटक्या समुदायातील लोक डोंगर आणि जंगलातून मध गोळा करून आणायचे आणि , त्याच्या विक्रीतुन आपला प्रपंच चालवायचे , परंतु आता मधमाशी पालणाचे महत्व शेतकऱ्यांना पटल्यामुळे शेतकरी आता आर्थिक शेतीकडे वळून व्यापारी दृष्टिकोनातून मधमाशी पालन करत आहेत व त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवत आहेत , 

 Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती
Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती
 Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती 2024

 मध प्रति किलो दर:  मित्रांनो मध हा आयुर्वेदिक दृष्ट्या खूप मौल्यवान आहे आणि तो खराब होत नाही जेवढा जुना मत तेवढाच आरोग्यासाठी चांगला मानला जातो आणि बऱ्याच शेतकरी हे ऑरगॅनिक पद्धतीने म्हणजेच सेंद्रिय पद्धतीने मधमाशी पालन करतात त्यानुसार मधाचे रेट हे अलग अलग आहेत जवळपास सर्वसाधारण मधला ३००  रुपये ते ७००  रुपये किलो पर्यंत दर मिळतो तर ऑरगॅनिक पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या मधाला १००० ते १२००  रुपये किलो पर्यंत दर मिळतो, काही शेतकरी मध निर्मिती करून इतर ठिकाणी निर्यात करतात तर काही शेतकरी स्वतः  मध उत्पादित करून स्वतः ब्रँडिंग करून स्वतःच्या नावाने बाजारामध्ये विकतात त्यामधून त्यांना चांगला आर्थिक नफा मिळतो.

मधमाशी  पेटी किंमत : मधमाशी पेट्यांची किंमत स्थान परत्वे वेगवेगळी आहे ,  काही ठिकाणी ३५०० तर काही ठिकाणी ५००० रूपये प्रती पेटी आहे , 

एका पेटीमध्ये १० फ्रेम असतात आणि एका फ्रेम मध्ये २५० ते ३०० मधमाशा असतात ,म्हणजेच एका पेटीत २५०० ते ३०० मधमाशा असतात असतात ,

 आपण बाजारातून मध विकत घेतो पण तो  शुद्ध आहेकि नाही  याची खात्री देता येत नाही. अनेकजण त्यात गूळ किंवा साखरेचा पाक टाकतात.  

बाजारात मधाला मोठी मागणी आहे पण त्याचे उत्पादन खूप  कमी आहे.   मधमाशीपालनातून आणखी एक सह -उत्पादन मिळते, ज्याला बाजारात खूप मागणी आहे   ते म्हणजे मेण, मेणापासून  मेणबत्त्या बनवल्या जातात.म्हणजे एका व्यवसायातून अनेक फायदे  आहेत. कमी गुंतवणुकीत आणि कमी कालावधीतजास्त उत्पन्न मिळवता येणारा व्यवसाय म्हणून मधमाशीपालन  कडे पहिले जाते ,मधमाशी  पोलन:  मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते तेव्हा मधमाशी मधाबरोबर पोलन सुद्धा घेऊन येते,  पेट्यांच्या बाहेर  लावलेल्या पोलण  ट्रॅप असतात यामध्ये पोलन जमा होते. आणि हे  पोलन  जवळपास तीनशे रुपये किलो या दराने विकले जाते, यामधून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो, 

वेगवेगळ्या पिकांच्या पोलण नुसार त्यांचे दर ठरलेले असते, मोहरी, सोयाबीन, तूर, अंबा, बाभूळ, नारळ इत्यादी पिकांपासून पोलन प्राप्त होते .

नारळ या पिकाचे पोलन सहाशे रुपये किलो पर्यंत विकले जाते, मधाची क्वालिटी/ गुणवत्ता ही  पोलनवर  अवलंबून असते,

 बीपोलनला सुपर फूड म्हटले जाते,  त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक असतात, जसे की  विटामिन ए ,बी ,सी विटामिन बी 1,बी 2 , बी 6, बी 12 , विटामिन डी,  अमिनो ऍसिड, इत्यादी बघायला मिळतात,

 Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती
Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती

मधाचे फायदे :

मित्रांनो मध हा शरीरसाठी खूप उपयुक्त आहे ,खूप लोकांना गोड खायला आवडते परंतु गोड खाल्ल्याने वजन वाढेल किंवा मधुमेहाचा धोका असतो त्यामुळे साखरेला पर्याय म्हणून मधाचा वापर केला जातो, पदार्थांचे गोडी वाढवण्याबरोबरच मधाचे इतरही काही फायदे आहेत, मध खाल्ल्याने भूक वाढते अनेक लोकांना भूक न लागण्याची समस्या असते अशा लोकांनी मध खावा ,त्याचबरोबर  मध खाल्ल्याने पचनशक्ती सुद्धा सुधारते, त्याच बरोबर मधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते,

 त्वचेसंबंधी आजारावर मध अत्यंत गुणकारी आहे,रोज सकाळी एक ग्लास  गरम पाण्यामध्ये  एक चमचा मध टाकून एक महिना प्यायल्याने त्वचे संबंधित आजारांमध्ये आराम मिळतो,

डोळ्या संबंधित तक्रारी असल्यास गाजराचा रस व त्यामध्ये एक चमचा मध टाकून प्यायल्याने डोळ्यासमंधी तक्रारी दूर होतात,

 मधाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो, मधामुळे रक्त शुद्ध होते,

 हिवाळ्यामध्ये सर्दी ,खोकला इत्यादींचा त्रास जाणवतो तेव्हा एक ग्लास गरम पाण्यामध्ये दोन चमचे टाकून प्यायल्याने बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो

काही लोकांचे असे मत आहे की शरीराला काही इजा झाल्यास घाव झाल्यास किंवा एखादा अवयव भाजल्यास त्या ठिकाणी मध लावल्याने तो घाव लवकर भरून निघतो, आणि कर्करोग झालेल्या रुग्णांना सुद्धा मध खाल्याने खूप आराम मिळतो, 

 त्याचे फायदे लक्षात घेऊन आज-काल शेतकरी मोठ्या संख्येने मधमाशी पालन करत आहेत,

 मधमाशी पालन अनुदान : शेतकरी मित्रांना  मधमाशी पालन करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनातर्फे  शेतकऱ्यांना  वेळोवेळी अनुदान दिले जाते, सध्या केंद्र शासनातर्फे शेतकऱ्यांना मधमाशी पालन करण्यासाठी जवळपास 80 टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे,

मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र : भारत सरकार तसेच राज्य सरकार यांच्यातर्फे शेतकऱ्यांना मधुमक्षिपालन कसे करावे या संदर्भात  प्रशिक्षण दिले जाते  ज्यामुळे शेतकऱ्यांना मधमासी पालन करताना त्यामध्ये असणारे बारकावे काय आहेत काय खबरदारी घ्यावी याविषयी माहिती दिली जाते, भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र आहे , तर महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर पुणे येथे मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र आहे.

मधमाशी पालनाचे फायदे:  शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आपल्या पिकाचे परागीभवन होण्यासाठी जे काही कीटक असतील किंवा मधमाशी असतील हे महत्त्वाचे घटक आहेत ते एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसतात आणि त्याद्वारे त्यांच्या पायाला पावडर लागते ते एका फुलावरून दुसऱ्या फुलाला लागते त्यामुळे नैसर्गिक रित्या  परागीभवन होते, प्रत्येक पिकाला परागीभवन होणे महत्त्वाचे असते  परागीभवन झाल्यामुळे  उत्पन्नामध्ये अधिक वाढ होते त्यामुळे मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा आहे एक तर आपल्याला  मधमाशी पासून मध मिळतो आणि  मधमाशांमुळे परागीभवन झाल्यामुळे उत्पन्नात देखील वाढ होते,

 आंतरपीक: मधमाशी पालन करण्यासाठी फुलांची आवश्यकता असते जसे की सूर्यफूल, आंबा,  तुर,मोहरी, इत्यादी.

मधमाशांना फुलवर्गीय पिके किंवा मध गोळा करण्यासाठी लागणारी पिके जवळ मिळाली तर ते मोठ्या प्रमाणात मत जमा करू शकतात या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही व नमूद केलेल्या पिकांची लागवड करू शकता जेणेकरून तुम्हाला अधिक उत्पन्न मिळू शकते,

याचबरोबर इतरही पिके तुम्ही आंतरपीक म्हणून घेऊ शकता जसे की पपई उत्पादन, आंबा लागवड, महोगणी लागवड, डाळिंब लागवड, साग इत्यादी पिकांची लागवड करून तुम्ही त्यामध्ये मधाच्या पेट्या ठेवू शकता, यामधून तुम्हाला दुहेरी उत्पन्न मिळेल.

 Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती
Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती

गुंतवणूक आणि उत्पन्न:  एका पेटीची किंमत ३५०० तर काही ठिकाणी ५००० रूपये प्रती पेटी आहे , 

एका पेटीमध्ये १० फ्रेम असतात आणि एका फ्रेम मध्ये २५० ते ३०० मधमाशा असतात ,म्हणजेच एका पेटीत २५०० ते ३००० मधमाशा असतात  ,

 एका चौकटीतून सुमारे 200 ग्रॅम मध मिळतो,आणि अशा १०  चौकटी असतात त्यामुळे एका पेटीतून 2 किलो मध मिळतो. एकाच पेटीमधून आपण प्रत्येक महिन्याला ४ किलो मध देखील काढू शकतो . 

म्हणजे पेटी खरेदी करण्यासाठी आपल्याला जवळपास ५०००  हजार रुपये लागले आणि एका पेटीतून आपल्याला एका महिन्याला ४  किलो मध मिळाला तर त्या मधाचे पैसे होतात ४०००  हजार रुपये म्हणजेच एका पेटी पासून आपल्याला महिन्याला४०००  हजार रुपये उत्पन्न मिळते तर आता तुम्ही जेवढ्या पेट्या ठेवाल त्यानुसार तुम्हाला उत्पन्न मिळेल जेवढ्या पेट्या जास्त तेवढे उत्पन्न जास्त,

 हा जो दर आपण सांगितलेला आहे हा तुम्हाला त्याच वेळेस मिळेल ज्या वेळेस तुम्ही स्वतः मधाची विक्री कराल तुम्ही जर व्यापाऱ्यांना मत दिला तर तुम्हाला पाहिजे तसा रेट मिळणार नाही,

 हे पण वाचा: 

Magel tyala shet tale शेत तळ्यासाठी 80% subcidy

Agri Drone: सरकार ड्रोन खरेदीवर 80 टक्के अनुदान देत आहे

 तर मित्रांनो आपण आज या लेखांमध्ये मधमाशी पालन आणि त्यासाठी लागणारे खर्च आणि त्यातून निघणारे उत्पन्न याविषयी माहिती बघितली लेक आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना अवश्य शेअर करा धन्यवाद,

Leave a Reply