नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये how to apply farm pond online : शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा 2024 या विषयी सखोल माहिती बघणार आहोत,
How To Apply Farm Pond Online : शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा 2024
शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासनातर्फे मागील त्याला योजना या अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत ज्यामध्ये मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे, मागील त्याला फळबाग योजना, मागेल त्याला विद्युत ट्रान्सफॉर्मर, इत्यादी योजना चालू आहेत त्या अंतर्गत तुम्ही तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेसाठी अर्ज करू शकता,
आपण इथे शेततळ्याविषयी बघणार आहोत सर्व योजनांची जी प्रक्रिया आहे ती जवळपास सारखीच आहे,
Honey Bee : मधमाशी पालन कसे करतात संपूर्ण माहिती 2024
साधारणपणे,शेततळे बांधण्यासाठी स्थानिक सरकारी संस्था किंवा जलसंसाधन व्यवस्थापन संस्थांकडून मंजुरी आवश्यक असते ,
सरकारी योजना बघा:
सध्या कोणत्या योजना चालू आहेत आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत त्यासाठी तुमच्या स्थानिक कृषी किंवा जलसंपदा विभागाशी संपर्क साधा.
ऑनलाइन पोर्टल:
संबंधित सरकारी एजन्सी किंवा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.अनेक सरकारी संस्थांकडे विविध अर्जांसाठी ऑनलाइन पोर्टल आहेत, जसे की महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची संबंधित माहिती तुम्हाला महाडीबीटी या पोर्टल वरती मिळते,
गुगल क्रोम मध्ये जाऊन महाडीबीटी असे टाईप करा आणि सर्च बटणावर क्लिक करा तुमच्यासमोर महाडीबीटी पोर्टल ओपन होईल त्यानंतर तिथे दिलेल्या पर्यायांचा वापर करून योग्य तो पर्याय तुम्ही निवडा,
खाते तयार करा:
आवश्यक असल्यास,ऑनलाइन पोर्टलवर खाते तयार करा.यामध्ये वैयक्तिक माहिती प्रदान करणे आणि लॉगिन क्रेडेन्शियल तयार करणे समाविष्ट असू शकते.
संबंधित अर्जाचा प्रकार निवडा:
शेत तलाव विहीर योजना ,फळबाग योजना, शेतीशी संबंधित अवजारे, यापैकी योग्य ते पर्याय निवडा,
अर्ज फॉर्म पूर्ण करा:
अचूक आणि तपशीलवार माहितीसह ऑनलाइन अर्ज भरा.यामध्ये स्थानाबद्दल तपशील समाविष्ट असू शकतो,शेततळ्याचा आकार काय आहे,उद्देश काय आहे,आणि शेत तलावाची रचना इत्यादी माहिती अपलोड करा.
सपोर्टिंग दस्तऐवज अपलोड करा:
ही माहिती अपलोड केल्यानंतर आठ ते दहा दिवसांमध्ये तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कळवण्यात येते त्यानंतर तुम्ही शेत जमिनीचा एकूण दाखला गट नंबर बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे अपलोड करावे लागतात ,त्याचबरोबर ना हरकत प्रमाणपत्र व आपण यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र पंचायत समिती मधून घेऊन महाडीबीटी पोर्टल वरती अपलोड करावे लागते ,ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला कृषी विभागाकडून पूर्वसंमती मिळते त्यानंतर तुम्ही शेततळ्याचे काम चालू करू शकता,
शेततळे योजनेची रक्कम: मित्रांनो शेततळे बनवण्यासाठी तुम्हाला स्थान परत्वे वेगवेगळ्या खर्च येऊ शकतो जसे की तुमची जमीन ही नरम असेल तर तुमचे काम लवकर होऊ शकते आणि तुम्हाला तलाव करण्यासाठी कमी खर्च येऊ शकतो तसेच तुमची जमीन जर खडक असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो आणि खर्चही जास्त येऊ शकतो परंतु सरकारी योजनेतर्फे सध्या 75 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे, ही रक्कम प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते काही वेळेला 50 टक्के अनुदान दिले जाते तर काही वेळेला 100 टक्के अनुदान देण्यात येते,
अर्ज शुल्क भरा:
काही अर्जांना शुल्क भरावे लागेल.पोर्टलवर स्वीकारलेल्या पेमेंट पद्धती तपासा आणि तुम्ही आवश्यक पेमेंट करत असल्याची खात्री करा.
अर्ज सबमिट करा:
एकदा तुम्ही अर्ज भरल्यानंतर आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर,ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज सबमिट करा.
अर्जाची स्थिती तपासा:
सबमिशन केल्यानंतर,तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करू शकता.काही पोर्टल्स तुमच्या अर्जाच्या प्रगतीबाबत अपडेट देतात.
फॉलो अप:
काही अतिरिक्त आवश्यकता असल्यास किंवा तुमचा अर्ज पुनरावलोकनाधीन असल्यास,विनंती केलेली कोणतीही अतिरिक्त माहिती देण्यासाठी तयार रहा.आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे मागितलेल्या कागदपत्रांचा पाठपुरावा करा.
लक्षात ठेवा, काही शंका असल्यास,अर्ज प्रक्रियेवर मदतीसाठी किंवा स्पष्टीकरणासाठी तुम्ही संबंधित विभागाशी संपर्क साधू शकता.
शेतकरी मित्रांनो ही सर्व प्रक्रिया तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल वरती सुद्धा करू शकता परंतु तुम्हाला ते मोबाईल वरती जमत नसेल तर तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्रावर जाऊन संबंधित योजनांचा लाभ घेऊ शकता,