या झाडा चे ‘बी’ विमानातून देशभर फेकण्यात आले? जाणून घ्या कारण .

आपल्या देशात अनेक प्रकारच्या वनस्पति पाहायला मिळतात ,
शेतकरी शेती करत असताना, त्यांच्या शेतीमध्ये अनेक प्रकारची झाडे पाहायला मिळतात.
यातील काही झाडे शेतकऱ्यांसाठी फायद्याची तर काही नुकसानदायक असतात ,

या झाडा चे ‘बी’ विमानातून देशभर फेकण्यात आले? जाणून घ्या कारण .

या झाडा चे ‘बी’ विमानातून देशभर फेकण्यात आले?

यातीलच एक झाड म्हणजे काटेरी बाभूळ होय.या बाभळीला वेडी बाभूळ देखील म्हणतात ,

हे पण वाचा : Which mushroom is best to eat in India?भारतात कोणते मशरूम खाणे चांगले आहे?2024

बाभळीचे झाड हे पर्यावरणास तर घातक आहेच? याशिवाय ते पशु-पक्षांसाठी धोकादायक आहे. बाभळीच्या झाडाखाली दुसरे झाड तर काय पण गवत देखील उगवत नाही. ज्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. या झाडाचा काटा खूप अणकुचीदार असतो. विशेष या झाडापासून सर्वाधिक कार्बन डाइऑक्साइड वायू बाहेर सोडला जातो. याशिवाय हे झाड जमिनीतील पाण्यासाठी देखील खूप घातक आहे. ज्या ठिकाणी बाभळीचे झाड असते. त्या ठिकाणी पाण्याची पातळी खाली जाते.

भारतामध्ये विलायती बाभळीच्या झाडाच्या बिया विमानातून जमिनीवर टाकण्यात आल्या होत्या. ज्यामुळे ग्रामीण भागामध्ये या बाभळीची खूप झाडे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे सरकारला ही बाभळीची झाडे लावायला खूप कष्ट घ्यावे लागले होते. यासाठी देशभरात मोठे अभियान चालवण्यात आले होते. त्यासाठी विमानातून या झाडाच्या बिया जमिनीवर टाकण्यात आल्या होत्या. त्याकाळी मातीची धूप थांबवण्यासाठी बाभळीच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र, सध्या बाभळीचे झाड शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे.

बाभळीमुळे पर्यावरणाचे नुकसान :

विलायती बाभळीच्या झाडामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या बाभळीचे काटे खूप अणुकुचीदार असतात. पावसाळ्याच्या दिवसांत डोंगराळ भागात जनावरांना चरण्यासाठी सोडले जाते. मात्र सध्या डोंगराळ भागांमध्ये या बाभळींची संख्या वाढल्याने गवताचे प्रमाण कमी झाले आहे. या झाडाच्या खाली अन्य नैसर्गिक झाडांची वाढ देखील खुंटते. जंगली जनावरांना देखील या झाडांमुळे शरीरास जखमा होऊन, त्यांच्या शरीरावर घाव निर्माण होतात.

पाण्याच्या पातळीसही धोका :

बाभळीचे झाड मोठ्या प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड वायू सोडते. याशिवाय जमिनीतील पाणी पातळीसाठी बाभळीचे झाड खूप घातक असते. या झाडाची मुळे जमिनीमध्ये खूप खोलवर गेलेली असतात. ज्यामुळे दुष्काळी किंवा पाण्याची कमतरता असणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे पाहायला मिळतात. एक बाभळीचे झाड लावल्यास त्यापासून वर्षात शेकडो बाभळीची झाडे तयार होतात. या झाडाच्या सानिध्यात अन्य झाडे टिकाव धरत नाही. इतकेच नाही तर या झाडामुळे अनेक झाडांचे भविष्य धोक्यात येते.

बाभळीचे फायदे : ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जंगली वन्य प्राण्यांपासून पिकास धोका असतो त्या ठिकाणी शेतकरी पिकाला बाभळीचे कुंपण करतात जेणेकरून जंगली वन्य प्राण्यांपासून पिकास धोका कमी होतो .

Leave a Reply