नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये आपण limbu : कागदी लिंबू लागवड शेतकऱ्या चे ATM एकरी 6 लाख रुपये उत्पन्न याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत,
limbu : कागदी लिंबू लागवड: महाराष्ट्रात आता कागदी limbu लागवड वाढत आहे ,

लिंबू लागवडी साठी जमीन:
मित्रांनो लिंबू लागवड करण्यासाठी हलकी ते मध्यम स्वरूपाची पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी
उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल मशागत करून घ्यावी जमीन चांगली तापू द्यावी
त्यानंतर रोट्या करून घ्यावा,
आणि 16 ×12 अंतरावर 45 × 45 सेंटीमीटर चे खड्डे खोदून घ्यावे व खड्डे चांगले उन्हामध्ये तापू द्यावे जेणेकरून त्यामध्ये काही कीटक वगैरे जिवाणू वगैरे असतील ते नष्ट होतील
लागवड: मित्रांनो पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये शेणखत निंबोळी पेंड व बुरशीनाशक टाकून त्यामध्ये रोप लावून खड्डे व्यवस्थित भरून घ्यावे जेणेकरून रोपांच्या मुळांना हवा लागणार नाही,

अंतर: शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी लिंबाची घन लागवड करतात परंतु ते चुकीचे आहे घन लागवड प्रत्येक पिकांमध्ये करून चालत नाही आंब्यामध्ये वगैरे तुम्ही धन लागवड करू शकता, परंतु लिंबू या पिकांमध्ये घन लागवड करून चालत नाही त्यामध्ये ठराविक अंतर असणे गरजेचे असते जेणेकरून सूर्यप्रकाश हवा वगैरे खेळती राहील आणि झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये घुसणार नाही, त्यासाठी 16 × 12 हे अंतर एकदम योग्य आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मनाने दुसरे एखादा अंतर घ्यायचे असेल तर घेऊ शकता परंतु जास्त कमी अंतर घेणे हे हानिकारक होऊ शकते. झाडे मोठाले झाल्यानंतर तुम्हाला त्याचा नाहक त्रास होऊ शकतो,
पूर्वी शेतकरी मोसंबी आणि लिंबू या पिकांमध्ये वीस बाय वीस फुटाचे अंतर ठेवायचे परंतु काही शेतकऱ्यांचे मते हे अंतर खूप जास्त होते त्यामुळे तुम्ही एवढे अंतर न सोडता किमान 16×12 हे अंतर तरी ठेवावे ,
खत व्यवस्थापन: मित्रांनो लिंबू या पिकाला तुम्ही सेंड खत वगैरे देऊ शकता किंवा सेंद्रिय खत देऊ शकता तुमच्याकडे जेवढे शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही शेणखत द्यावे आणि जीवामृत वगैरे सुद्धा द्यावे ज्यामुळे लिंबाचे क्वालिटी चांगली मोठी आणि चमकदार बनते,
त्याचप्रमाणे तुम्ही याला रासायनिक खताचा डोस सुद्धा घरच्यानुसार देऊ शकता,
पाणी व्यवस्थापन : मित्रांनो लिंबू या पिकाला पाण्याची जास्त गरज लागत नाही परंतु जे पाणी तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही ठिबक सिंचन करून त्याला पाण्याची व्यवस्था करू शकता ठिबक सिंचन केल्याने पाण्याची जी बचत आहे ती 50 ते 60 टक्के पाण्याची बचत होते आणि तुम्हाला पाणी देण्यासाठी जास्त परेशान व्हायची गरज लागत नाही,
ठराविक टायमिंग लावून तुम्ही प्रत्येक झाडाला एक समान पाणीपुरवठा ठिबक सिंचना द्वारे करू शकता,

प्रति झाड उत्पन्न: मित्रांनो झाडाची योग्य प्रकारे निगा राखल्यास आणि त्याची वाढ वगैरे व्यवस्थित झाल्यास आठ वर्षानंतर प्रति झाड जवळपास एक क्विंटल उत्पादन एका झाडापासून मिळते,
लिंबाला बाजार मूल्य जवळपास 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे असते काही वेळेला वातावरणा अनुसार हे मूल्य कमी जास्त होते तरी सरासरी मते पकडल्यास एका झाडापासून जवळपास 2000 ते 2500 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते,
शेतकऱ्याचे एटीएम: शेतकरी मित्रांनो लिंबाला शेतकऱ्याचे एटीएम असे म्हटलेले आहे कारण लिंबामुळे कोणत्याही शेतकऱ्याला कोणाकडे हात पसरण्याची वेळ येत नाही , आपल्या फळबागेची चांगली योग्य ती काळजी घ्यायची आणि फळे तोडून मार्केटला घेऊन जायची एटीएम मधून पैसे काढल्याप्रमाणे वर्षभर उत्पन्न देणार आहे पीक आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर अक्षरशः पाच रुपयाला एक याप्रमाणे लिंबू विक्री होते आज पर्यंत वीस ते पंचवीस रुपयांच्या खाली लिंबाचा बाजार भाव आलेला नाही, इतर फळबागांच्या तुलनेत लिंबू हे पीक अतिशय फायदेशीर आहे त्याला पक्षी व तसेच कोणत्याही प्राणी खात नाही कोणत्याही प्राण्यांचा धोका लिंबू या पिकाला नाही,
आंतरपीक:
- गावरान कोंबडी पालन : शेतकरी बांधवांनो लिंबू पिकामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून किंवा जोडधंदा म्हणून गावरान कोंबडी पालन करू शकता ज्याद्वारे तुम्हाला अंडी , पिलं,तसेच मास मिळेल, आणि तुम्हाला आर्थिक हातभार लागेल,
- मधमाशी पालन : गावरान कोंबडी पालन सोबतच तुम्ही मधमाशी पालन सुद्धा करू शकता लिंबू फळबागेमध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवून तुम्ही चांगल्या प्रकारे आर्थिक नफा कमवू शकता,
एखाद्या वेळेस काही नैसर्गिक आपत्ती आली किंवा लिंबाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही तर या आंतर पिकातून किंवा जोडधंद्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल.
फळधारणा: मित्रांनो लिंबू या पिकाला लागवडीपासून तीसऱ्या वर्षापासून फळधारणा व्हायला सुरुवात होते, आणि लिंबाला वर्षभर मागणी असते तसेच लिंबू सुद्धा आपल्याला वर्षभर मिळत राहतात,
रोग आणि घ्यावयाची काळजी: मित्रांनो लिंबू या फळझाडाला डिंक या नावाचा रोग होतो डिंक्या लागल्यानंतर संपूर्ण झाड वाळून जातील त्यामुळे झाडाच्या खोडाला चुना आणि गेरू लावला जातो जेणेकरून झाडाच्या खोडाला कसलीही इजा होणार नाही,
झाडांची छाटणी: झाडे लहान असताना झाडाच्या खोडाजवळ खालच्या बाजूला छाटणी करावी लागते जेणेकरून झाडे मोठाले झाल्यानंतर झाडाच्या खोडाजवळ पडलेला माल काढता यावा आणि खोडाजवळ खत व्यवस्थापन करता यावे त्यासाठी सुरुवातीला झाडांची छाटणी करावी लागते,

एकरी झाडांची संख्या: मित्रांनो 16 ×12 हे अंतर ठेवल्यानंतर एका एकरामध्ये लिंबोणीचे 350 तीनशे पन्नास रोपे लागले जातात.
मित्रांनो डाळिंब आंबा या पिकांना ज्याप्रमाणे फळधारणा झाल्यानंतर बांबू वगैरे चा आधार द्यावा लागतो त्याप्रमाणे लिंबू या पिकाला कसलाही आधार वगैरे द्यायची गरज लागत नाही
किंवा इतर कसलाही खर्च करायची गरज लागत नाही,
प्रक्रिया उद्योग: लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचा एक ग्रुप तयार करून तुम्ही प्रक्रिया उद्योग उभा करू शकता,
ज्या मधून तुम्हाला खूप चांगला आर्थिक नफा मिळेल,
त्यासाठी तुम्हाला बँकेतून खूप कमी किंवा नाममात्र व्याजदरावर कर्ज देखील मिळते,
एकरी उत्पन्न: मित्रांनो एका एकर मध्ये लिंबू या पिकाचे16 ×12 या अंतरावर 350 झाडे लागतात,
लिंबाचा बाजार भाव हा ऋतू अनुसार बदलत असतो उन्हाळ्यामध्ये जवळपास 80 ते 100 रुपयापर्यंत दर जातो ,तर तोच दर पावसाळ्यामध्ये वीस ते पंचवीस रुपये पर्यंत येतो,
25 रुपये किलो याप्रमाणे जरी आपण दर पकडला तरी 350 झाडांचे 50 किलो प्रति झाड फळाप्रमाणे ,
350 × 50 =17500 किलो फळ
17500 × 25 रुपये दर
= 4,37,500 /- रुपये एकरी होतात जे इतर पिकांच्या तुलनेत खूप चांगले उत्पन्न आहे ,
FAQ :
1. कागदी लिंबू लागवड कशी करतात ,
2. लिंबू शेती एकरी आर्थिक नफा ?
3. लिंबू लागवड कधी , कुठे , कशी करावी ,
4. लिंबू लागवड झाडातील अंतर ?
हे पण वाचा :
ही 1 चूक कराल तर FASTAG असताना सुद्धा लागेल दंड