तुम्ही जर महिला असाल तर मिळतात 5 लाख रुपये. जाणुन घ्या या योजने विषयी

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामधे तुम्ही जर महिला असाल तर मिळतात 5 लाख रुपये. जाणुन घ्या या योजने विषयी या बद्दल माहिती बघणार आहे.

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामधे तुम्ही जर महिला असाल तर मिळतात 5 लाख रुपये. जाणुन घ्या या योजने विषयी या बद्दल माहिती बघणार आहे.

तुम्ही जर महिला असाल तर मिळतात 5 लाख रुपये. जाणुन घ्या या योजने विषयी

सरकार महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना सुरु करत असते. अलीकडे बऱ्यापैकी महिला आर्थिकदृष्ट्या सबल बनल्या आहेत. खेडेगावातही महिला स्वतः काहीबाही काम करून स्वतःचा उदर्निर्वाह करतात.

मात्र महिलांना बचतीची सवय व्हावी अन यातून त्यांना भविष्यात फायदा मिळावा या हेतूने शासनाने काह विशेष योजना सुरु केल्या आहेत. महिला सन्मान बचत पत्र योजना व सुकन्या समृद्धी योजना या याचाच एक भाग आहेत. आज आपण या दोन योजनांबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

सुकन्या समृद्धी योजना :

केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत मुली व महिलांसाठी गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे. मुलींचे आई-वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतील गुंतवणुकीवर ८ टक्के व्याजदर असून चक्रवाढ दराने व्याजाची आकारणी केली जाते.

मुलीच्या जन्मापासून ते १० वर्षापर्यंत मुलीचे खाते उघडता येते. खाते उघडल्यापासून १५ वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी किमान २५० रुपये ते कमाल १ लाख ५० हजाराची गुंतवणूक करता येते. प्रत्येक महिन्याला १००० रुपये भरत गेल्यास मुदतीअंती ५ लाख ३९ हजार ४५३ इतकी रक्कम मिळते. या योजनेतील गुंतवणूकीवर आयकरातून सूट आहे. या योजनांच्या अधिक माहितीसाठी पोस्ट कार्यालयात संपर्क साधावा.

महिला सन्मान बचत पत्र योजना :

महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत महिला पोस्ट ऑफिसात बचत खाते उघडू शकतात. तसेच या बचत खात्यात १ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते. महिलांनी या बचत खात्यात २ लाख रुपये जमा केल्यानंतर संबंधित महिलेला दोन वर्षांनंतर २ लाख ३२ हजार रुपये मिळतील. या योजनेच्या लाभासाठी खाते उघडण्याचा फॉर्म, केवासी दस्तऐवज (आधार व पॅनकार्ड झेरॉक्स) या कागदपत्रांची आवश्यकता आहे. ही योजना पोस्ट ऑफिसमार्फत राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलेच्या नावावर किंवा मुलीच्यावतीने तिच्या नावावर तिचे पालक बचतपत्र घेवू शकतात.

या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून कमाल २ लाखापर्यंत गुंतवणूक करण्याची सोय आहे. महिला व मुलीच्या नावावर कमाल २ लाखापर्यंत किमतीही बचत पत्रे घेता येतील. पण दोन बचत पत्रांमध्ये किमान तीन महिन्यांचे अंतर असले पाहिजे. या योजनेमधील गुंतवणुकीसाठी व्याजदर ७.५ टक्के तिमाही चक्रवाढ पद्धतीने असून एका वर्षानंतर ४० टक्के रक्कम काढण्याची सोय आहे. या योजनेतून घेतलेल्या बचत पत्रांची मुदत दोन वर्षाची आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेत १ हजार रुपये गुंतविल्यास मुदतीअंती १ हजार १६० रुपये ५० हजाराची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती ५८ हजार ११ रुपये, रुपये १ लाखाची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती १ लाख १६ हजार २२ रुपये आणि रुपये २ लाखाची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती २ लाख ३२ हजार ४४ रुपये रक्कम मिळते.

सरकार महिलांसाठी नवनवीन कल्पना/योजना राबवत असते परंतु त्याची माहिती बर्‍याच महिलांना नसते, पूर्वी महिला फक्त चूल आणि मूल यातच व्यस्त असायच्या परंतु आता महिला सुशिक्षित आहेत त्यांना आर्थिक बचतीची सवय झाली आहे , त्यांना बचतीचे महत्व पटलेले आहे , महिला आता बचत करण्याप्रती सजग झाल्या आहेत आणि वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करत आहेत अगोदर महिला अडाणी होत्या  त्यामुळे बर्‍याच महिला सरकारी योजनेपासून वंचित राहायच्या  महिलांनी स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे व सरकार कोणत्या योजना राबवत आहे आपन कोणत्या योजनेत सहभागी होऊ शकतो याची पुरेपूर माहिती घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा.

महिला बचत गट : या योजना व्यतिरिक्त आज काल महिला बचत गटात देखील सहभागी होतात आणि बचत करतात , त्यामुळे महिलांना त्याचा फायदा होतो . आणि महिला त्याआधारे आपल्या दैनिक गरजा भागवतात , आणि त्यांना त्यामुळे बचतीची सवय लागते ,

तर मित्रांनो आज या लेखामधे आपण सरकारी योजना बद्दल माहिती बघितली.

हे पण वाचा :

शेती सोबत करा हे जोडधंदे मिळेल 50 लाखांपर्यंत अनुदान

Goat Rearing Scheme: बँकाकडून 50 लाख रुपयापर्यंत मिळवा कर्ज व सुरू करा शेळीपालन व्यवसाय!

1356 आजारांवर 5 लाखांपर्यंत मिळतील मोफत उपचार, आयुष्यमान कार्ड आता घरी काढा.

Leave a Reply