नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये MAHOGANI महोगणी लागवड याविषयी सखोल माहिती बघणार आहोत,
मित्रांनो महोगनीला महागुनी देखील म्हणतात कारण तिच्यामध्ये तसे गुण आहे म्हणजेच तेवढी ती उपयुक्त आहे त्यामुळे तिला महागुनी म्हणतात,
MAHOGANI : शेताच्या बांधावर लावा हे झाड मिळेल पैसाच पैसा:
जमीन: मित्रांनो मोहगणीची लागवड करण्यासाठी पाण्याचा निचरा होणारी हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन असावी , महोगनी लागवड करण्यापूर्वी शेताची चांगल्या प्रकारे पूर्व मशागत करून घ्यावी ट्रॅक्टरने किंवा बैलाने खोल नांगरट करून घ्यावी आणि त्यानंतर आठ बाय आठ या अंतरावरती 45 बाय 45 सेंटिमीटर चे गड्डे खोदून घ्यावे, अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता,
उन्हाळ्यामध्ये खड्डे चांगले तापू द्यावे जेणेकरून त्यामध्ये असणारे उपद्रवी जे कीटक आहे ते नष्ट होतील,
लागवड: महोगनी लागवड करण्यासाठी तुम्ही बियांची निवड करू शकतात किंवा सरकार मान्य खात्रीशीर नर्सरी मधून रोपे आणून लावू शकता, रोपे लावण्यापूर्वी खड्डे थायमेट बुरशीनाशक व शेणखत टाकून योग्य प्रकारे भरून घ्यावे आणि त्यानंतर त्यामध्ये रोपांची लागवड करावी,
आठ बाय आठ या अंतरावर लागवड केल्यास एक एकर मध्ये पाचशेच्या जवळपास महोगणीची झाडे लागतात ,
महोगणीची लागवड करत असताना एका ठराविक अंतरावरती लागवड करावी जेणेकरून झाडे एकमेकांमध्ये घुसणार नाही,आणि हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीपर्यंत येईल,
सरकारी योजना: शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला सरकार सुद्धा वृक्षरोपण करण्यासाठी किंवा निसर्गाचे स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी वृक्षारोपण करण्यास प्राधान्य देत आहे त्या अनुषंगाने सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत त्या अंतर्गत महोगनी लागवड, सागवान लागवड, बांबू लागवड इत्यादी रोपे सरकारी योजनेअंतर्गत मिळतात, खड्डे खोदण्यापासून ते रोपे विकत घेऊन ते लावण्यापर्यंत सर्व खर्च सरकारी योजनेतून आपल्याला मिळतो, या योजनांची माहिती तुम्ही जवळच्या सरकारी कार्यालयातून घेऊ शकता,
MAHOGANI : शेताच्या बांधावर लावा हे झाड मिळेल पैसाच पैसा:
शेताच्या बांधावर लावा हे झाड मिळेल पैसाच पैसा: शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर मुबलक जमीन उपलब्ध असेल तर तुम्ही शेतामध्ये महोगनीची लागवड करू शकता किंवा तुम्ही जर अल्पभूधारक शेतकरी असाल तर शेताच्या बांधावर चहू बाजूने महोगणीची लागवड करू शकता ज्यामुळे तुमच्या पिकांचे संरक्षण देखील होईल आणि तुम्हाला यामधून दहा ते बारा वर्षानंतर लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल,
दुहेरी फायदा तुम्हाला यामधून होईल शेतामधून सुद्धा वेगळ्या पिकांचे उत्पन्न मिळेल आणि बांधावर लावलेल्या महोगणीपासून सुद्धा उत्पन्न मिळेल,
महोगणीची झाड हे खूप मूल्यवान आहे, महोगणीची लाकूड बाजारामध्ये खूप महाग विकते,
महोगणेच्या लाकडाची किंमत दोन हजार रुपये प्रति घनफिट एवढी आहे,
आणि एका झाडाची किंमत जवळपास 40 ते 50 हजार रुपये एवढी आहे,
महोगणीचे लाकूड हे टिकाऊ आणि खूप मजबूत असते,
एक एकर जमिनीमध्ये महोगणीचे झाडे लावून तुम्ही बारा वर्षांमध्ये करोडपती बणू शकता,
महोगणीच्या झाडांपासून पाच वर्षात एकदा बिया मिळतात,
त्या बिया सुद्धा तुम्ही विक्री करून त्यामधून सुद्धा आर्थिक नफा कमवू शकता, महोगणीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्यामुळेच त्याला महागुनी असे सुद्धा म्हणतात, पाने, फुले बिया ,फळे सर्वच्या सर्व उपयोगी आहेत,
महोगणी चा वापर :फर्निचर लाकडी खेळणी जहाज बांधणी तसेच बंदुकीसाठी लागणारे लाकूड याकरिता होतो,
शेतकरी मित्रांनो बऱ्याच प्रकारचे लाकूड जंगलामध्ये उपलब्ध असते परंतु प्रत्येक लाकडाचा वापर सर्व कामासाठी केला जाऊ शकत नाही जसे की शोभिवंत वस्तू घरांचे दरवाजे खिडक्या लाकडी खेळणी जहाज बांधणीसाठी बंदुकीसाठी लागणारे लाकूड यासाठी काही ठराविक लाकडांचा वापर केला जातो त्यामध्ये मोहगणे ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे,
मजबूत आणि टिकाऊ: मित्रांनो बरेच असे वनस्पतींचे लाकूड आहे जे कालांतराने काही दिवसानंतर खराब होते त्याला कीड लागते परंतु महोगणीचे लाकूड हे त्याला अपवाद आहे महोगणीच्या लाकडाला कीड लागत नाही आणि खूप दिवस ते जसेच्या तशा अवस्थेत राहते
तुम्ही बघितले असेल की तुमच्या आसपास काही जुने घरे असतील त्यांचे दरवाजे व खिडक्या तसेच त्या घरांमध्ये वापर करण्यात आलेले इतर लाकूड आजही कित्येक वर्षानंतर चांगल्या अवस्थेत आहे,
तसेच आपले जुने किल्ले वगैरे आहेत त्यांच्या बांधकामासाठी वापर करण्यात आलेले लाकूड तुम्ही बघू शकता तेही आज 350 ते 400 वर्षे होऊन सुद्धा चांगल्या स्थितीत आहे,
पाणी व्यवस्थापन: शेतकरी बांधवांनो महोगणी या पिकाला पाण्याची जास्त गरज लागत नाही तुमच्याकडे असणाऱ्या थोड्याफार पाण्यातही तुम्ही महोगणीचे चांगले उत्पन्न घेऊ शकता, ठिबक सिंचनाचा वापर करून थोड्याफार पाण्यातही उत्पन्न घेऊ शकता ठिबक सिंचन केल्याने पाण्याची 50 ते 60 टक्के बचत होते,
बरेच शेतकरी आज महोगणीचे उत्पन्न घेत आहेत आणि परंपरागत शेतीला फाटा देऊन महोगणीची शेती किंवा आर्थिक पिकांची शेती करत आहेत,
करार पद्धतीने मोहगुणीची शेती: शेतकरी मित्रांनो आज शेती व्यवसायामध्ये बऱ्याच कंपन्या उतरल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना करार पद्धतीने मोहोगणीचे प्रशिक्षण देतात रुपये देतात आणि खत औषध जे काही लागते ते सर्व पुरवतात आणि महोगणीचे पीक पक्व झाल्यानंतर ते स्वतःच खरेदी करतात किंवा तुम्ही इतर ठिकाणी विक्री करून करार पद्धतीनुसार करण्यात आलेल्या करारानुसार त्यांचे ठराविक रक्कम तुम्ही त्यांना देऊ शकता आणि उरलेला नफा तुम्हाला मिळेल,
खत व्यवस्थापन: मित्रांनो मोहगणी या पिकाला खत औषधांची गरज पडत नाही त्याला कोणतेही जनावर खात नाही शक्य असल्यास शेणखत दिले तर हरकत नाही, बाकी कसलाही खर्च करण्याची गरज नाही,
जोडधंदा:
- कुक्कुटपालन: मित्रांनो महोगणी मध्ये तुम्ही कुक्कुटपालन सुद्धा करू शकता यामध्ये तुम्ही गावरान कोंबड्या आणून सोडू शकता यामुळे तुमचे शेत सुद्धा स्वच्छ राहील शेतामधील कोवळे तन आणि इतर कीटक वगैरे खाऊन कोंबड्या राहतात व इतर थोडे फार खाद्य देऊन तुम्ही कुकूटपालनातून चांगलं उत्पन्न घेऊ शकता,
- मधमाशी पालन: मित्रांनो महोगणीच्या शेतामध्ये तुम्ही मधमाशी पालनाच्या पेट्या ठेवू शकता यामधून तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल तुमचं जे महोगणीचं पीक आहे ते पक्व होण्यास दहा ते बारा वर्षांचा कालावधी लागणार आहे तोपर्यंत तुम्हाला आर्थिक तंगी भासू नये म्हणून तुम्ही मधमाशी पालन जर केले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे आर्थिक नफा होऊ शकतो,
शासकीय परवाना: झाडांची लागवड करण्यासाठी तुम्हाला शासनाची परवानगीची गरज नाही झाडे लावल्यानंतर तुम्ही सातबारा वरती झाडांची नोंद घेऊ शकता ,
आणि ज्या वेळेस आपली झाडे पक्व होतील तेव्हा वन विभागाची परवानगी घेऊन त्या झाडांची कटाई करू शकता किंवा एखाद्या व्यापाऱ्याला विक्री केल्यास ते व्यापारी स्वतः परवानगी घेऊन झाडे कापून नेतात,
महोगणीतून एकरी उत्पन्न: एका एकर मध्ये महोगणीचे 400 ते 500 झाडे लागतात त्या अनुसार बारा ते पंधरा वर्षानंतर झाडे पक्व झाल्यानंतर यामधून जवळपास एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते असा दावा करार पद्धतीने महोगनीची लागवड करणाऱ्या कंपन्या करतात.
हे पण वाचा :
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?
limbu : कागदी लिंबू लागवड शेतकऱ्या चे ATM एकरी 6 लाख रुपये उत्पन्न
FAQ:
1. महोगणी लागवड कसी करतात,
2. महोगणी एकरी उत्पन्न किती मिळते ,
3. महोगणी रोपे कुठे मिळतात ,
4. महोगणी किती वर्षात तयार होते ,