नमस्कार मित्रांनो आपण आज या लेखांमध्ये आंबा बाग अच्छादण : अशी करा पाण्याची बचत 2024 आंबा बागेचे आच्छादन याविषयी माहिती बघणार आहोत.
आंबा बाग अच्छादण : अशी करा पाण्याची बचत 2024
हे पण वाचा : POULTRY FARMING : कोंबडी पालनासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणार ट्रेनिंग इथे करा अर्ज 2024
भारत हा कृषिप्रधान देश आहे भारतामधील अर्थव्यवस्था ही मुख्यतः शेतीवर अवलंबून आहेत,
पूर्वी शेतकरी हा परंपरागत पद्धतीने शेती करायचा परंतु आता शेतकरी हा सेंद्रिय पद्धतीचा वापर करत आधुनिक पद्धतीने शेती करत आहे, त्यामध्ये नवनवीन पिकांचे उत्पादन तो घेत आहे.
यामध्ये अनेक प्रकारच्या देशी तसेच विदेशी फळांची लागवड देखील शेतकरी आज करताना दिसत आहेत,
देसी फळांमध्ये आंबा ,संत्री, मोसंबी इत्यादी फळांची लागवड केली जात आहे,
परंपरागत शेतीला फाटा देत शेतकरी आज अजून एक शेतीकडे वळत आहेत जेणेकरून आर्थिक विकासाला चालना मिळावी कारण परंपरागत जे पिके आहेत तेच घेत राहिल्याने पिकांना योग्य तो भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांनी खर्च केलेला खर्च सुद्धा निघत नाही त्यामुळे शेतकरी आज आधुनिक शेतीकडे वळत आहेत.
फळबाग लागवड केल्यानंतर त्याला योग्य ते नियोजन करावे लागते खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन हे देखील योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे,
बहुतांश वेळा पाऊस कमी झाला की शेतकऱ्यांना फळबागांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होते तेव्हा या अडचणीवर तशी मात करावी ते आपण बघू.
ठिबक सिंचन: तुमच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तर ठीक अन्यथा तुम्ही ठिबक सिंचन या सिंचन प्रणालीचा वापर करू शकता, ज्यामुळे तुमच्या पाण्यामध्ये जवळपास 60 टक्के बचत होते,
आणि उत्पादनामध्ये देखील वाढ होते.
हे पण वाचा : MUSHROOM SHETI MAHITI MARATHI:मशरूम शेती महिती मराठी 2024
आच्छादन:
तुमच्याकडे जर पाण्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता नसेल तर तुम्ही बागेला आच्छादन करून बाग चांगल्या प्रकारे वाढवू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न देखील मिळवू शकता, हे आच्छादन कोणकोणत्या प्रकारे तुम्ही करू शकता हे आपण इथे बघू.
नारळाच्या झावळ्यांचा पानांचा चुरा: नारळाच्या झाडाच्या ज्या झावळ्या आहेत त्यांच्या पानांचा चुरा करून तुम्ही तो तुमच्या आंबा किंवा इतर बागेच्या खोडाजवळ आच्छादन म्हणून टाकू शकता, ज्यामुळे तुमच्या जमिनीचे धूप कमी होऊन खोडा जवळ ओलावा टिकून राहील आणि पाण्याची बचत होईल.
गवत: पावसाळ्यामध्ये ठीक ठिकाणी गवत उगवते त्यामध्ये असे काही गवत उगवते जे जनावरे खात नाहीत, आता जे गवत जनावरे खात नाही ते तुम्ही कापून ठेवू शकता आणि उन्हाळ्यामध्ये बागेला आच्छादन म्हणून वापरू शकता.
उसाचे पाचट: बऱ्याच ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना पाणी आहे ते शेतकरी उसाचे उत्पादन घेतात, आणि उसाचे जे पाचट आहे ते फेकून दिले जाते किंवा पेटवून दिले जाते . तुम्ही ते पाचट जमा करून ठेवून उन्हाळ्यामध्ये आंबा किंवा इतर बागेंसाठी आच्छादन म्हणून वापरू शकता.
गहू किंवा भाताचा भुसा: गहू किंवा भात काढल्यानंतर त्यापासून जो भुसा निघतो तो देखील तुम्ही आच्छादन म्हणून वापरू शकता त्याचा देखील चांगला वापर होतो त्याचा फायदा देखील चांगला होतो,
लाकडाचा भुसा: तुमच्या आसपास कुठे लाकूड कटाई मशीन असेल तर तिथे लाकडांना कापल्यानंतर जो भुसा निघतो तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आच्छादन म्हणून काम करतो, त्याला सुद्धा तुम्ही वापरू शकता.
इत्यादी गोष्टी तुम्ही आच्छादन म्हणून वापरू शकता किंवा यासारख्या आणखी ही काही गोष्टी वापरू शकता,
आच्छादनाचे फायदे: हे आच्छादन वापरल्यामुळे एक तर जमिनीची धूप कमी होऊन पाण्याची बचत होते आणि त्याचबरोबर हे आच्छादन विघटनशील असल्यामुळे कालांतराने त्याचे विघटन होऊन त्याचे सेंद्रिय खतांमध्ये रूपांतर होते आणि त्यामुळे झाडांना सुद्धा सेंद्रिय खत मिळून चांगला फायदा होतो .
आच्छादन करताना घ्यावयाची काळजी:
फळ बागांना आच्छादन करत असताना विशेष काळजी घ्यावी लागते ,
अच्छादन करत असताना त्या अगोदर थायमीट किंवा त्यासारखे उग्र वासाचे औषध वगैरे खोडा जवळ टाकणे महत्त्वाचे आहे, अन्यथा उंदीर वगैरे त्या ठिकाणी बीळ करून झाडांच्या मुळ्या कुरतडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.