नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये पपई लागवड याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत ज्यामध्ये पपईच्या जाती व पपई लागवडतील अंतर जमिनीची निवड याविषयी माहिती बघणार आहोत,
PAPAYA : पपई लागवड एकरी 10 लाख उत्पन्न कमी खर्चात
जमीन: मित्रांनो जमिनीची निवड करताना हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीनही पपई लागवडीसाठी चालते फक्त पाण्याचा निचरा होणारी असावी जास्त भारी जमीन नसावी पपई लागवडीपूर्वी उन्हाळ्यामध्ये जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी आणि रान चांगले तापू द्यावे जेणेकरून जमिनीमध्ये असणारे किडे वगैरे सर्व काही नष्ट होतील,
त्यानंतर शेतामध्ये रोट्या करून घ्यावा आणि नंतर बेड सरी पाडून घ्यावे; आणि नंतर आपण सरीमध्ये लागवड करू सरीमध्ये लागवड केल्याचा हा फायदा आहे की झाडाला ज्यावेळेस आधाराची गरज पडते त्यावेळेस आपण त्या सऱ्या बुजवून घेऊ शकतो आणि जेव्हा थोड्याफार प्रमाणात गवत उगवायला सुरुवात होते तेव्हा आपण त्या सऱ्या बुजवून घेत असतो ज्याने झाडांना सुद्धा आधार मिळतो आणि खुरपण्याचा खर्चही वाचतो,
पपई लागवडीतील अंतर: मित्रांनो अलग अलग शेतकरी अलग अलग अंतर पपई लागवडीसाठी वापरतात परंतु आठ बाय सहा या अंतरावर पपईची लागवड करावी जेणेकरून झाडांमध्ये आणि ओळींमध्ये एक ठराविक अंतर राहील झाडांची एकमेकांत गर्दी होणार नाही झाडांना व्यवस्थित सूर्यप्रकाश वगैरे मिळेल आणि हवा खेळती राहील;
पपई लागवड करत असताना तुम्ही झाडाच्या मुळाशी 10 26 26 आणि इतर बुरशीनाशके तसेच थाय मीट वगैरे टाकू शकता जेणेकरून झाडांना बुरशी वगैरे लागणार नाही,
एकरी झाडांची संख्या :आठ बाय सहा या अंतरावर ती लागवड केल्यास प्रति एकरी जवळपास 1000 झाडे पपईची बसतात, झाडांची संख्या जास्त झाल्यास बागेमध्ये दाटी होते हवा खेळती राहत नाही सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढते, पपया लागवडीसाठी आठ बाय सहा हे अंतर अतिशय योग्य मानले जाते कारण जास्त जवळ लागवड केली तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी झाडांमध्ये स्पर्धा तयार होते आणि झाडांची वाढ ही जास्त उंच होते आणि झाडे जास्त उंच वाढल्यानंतर ती पडण्याची शक्यता असते, आणि जर का या अंतरापेक्षा जास्त अंतर घेतले तर फळांना सण बर्निंगचा धोका असतो त्यामुळे आठ बाय सहा हे अंतर अतिशय योग्य आहे,
PAPAYA : पपई लागवड एकरी 10 लाख उत्पन्न कमी खर्चात:
पपईच्या जाती: मित्रांनो पपईच्या आजच्या घडीला खूप सर्व जाती आहेत परंतु एक नवीन जात आहे जी शेतकऱ्यांनी विकसित केलेली आहे पंधरा नंबर या 15 नंबर पपया जातीचे ही फळे आहेत ती इतर फळांच्या बाबतीत मोठी असतात आणि इतर जातींपेक्षा या 15 नंबर जातीच्या पपयांना योग्य तो ब्रेड मिळतो त्यामुळे 15 नंबर ही जात लावायला हरकत नाही,
पपई रोप : मित्रांनो पपई रोपांची निवड करताना खूप काळजी घेणे महत्त्वाचे आहे कारण पपईच्या जातीमध्ये किंवा रोपांमध्ये नर आणि मादी या दोन्हींचे प्रमाण खूप जास्त असते आपल्याला मादीचे प्रमाण हवे असते परंतु काही वेळेला नर आपल्याला दिला जातो आणि रोपे लहान असताना मादी आणि नर यातले अंतर कळत नाही त्यामुळे फसगत होऊ शकते आणि मग लागवड करून खूप दिवसानंतर जेव्हा फळे यायला लागतात आणि काही झाडांना फळे येत नाही तेव्हा आपल्याला कळून चुकते की आपली फसगत झाली आहे, तेव्हा पैसा आणि वेळ दोन्हीही वाया गेलेली असते त्यामुळे खात्रीशीर अश्या नर्सरी मधूनच रोपांची निवड करावी,
पपई लागवडीचा कालावधी :मित्रांनो पपई लागवडीचा ठराविक असा कालावधी नाही तुम्हाला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही वर्षभरामध्ये केव्हाही लागवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता फक्त उन्हाळ्यामध्ये लागवड करत असताना उन्हाचा थोडाफार त्रास पिकांना होऊ शकतो किंवा रोपांना होऊ शकतो या व्यतिरिक्त तुम्ही वर्षभर केव्हाही लागवड करू शकता आणि पपईच्या मागणी विषयी जर बोलायचे झाले तर उन्हाळ्यामध्ये आंबा हे पीक संपल्यानंतर मार्केटमध्ये दुसरे कोणतेही फळ त्यावेळी उपलब्ध राहत नाही त्यामुळे पपईला जास्त मागणी असते आणि त्यातून तुम्ही चांगला नफाही कमवू शकता
आणि तुम्ही सलग एकापाठोपाठ एक असे तर उत्पन्न घेत गेला तर एखाद्या वेळी पपईला बाजार भाव नाही सापडला किंवा काही नैसर्गिक आपत्ती आली तर दुसऱ्या पिकांमध्ये ती उणीव भरून निघू शकते,
PAPAYA : पपई लागवड एकरी 10 लाख उत्पन्न कमी खर्चात:
आंतरपीक: मित्रांनो तुम्ही सुरुवातीला कलिंगड लागवड करू शकता आंतरपीक म्हणून आणि झोप पहिला तुम्हाला खर्च येणार आहे तो खर्च तुमचा आंतर पिकातून वसूल होईल आणि जे तुमचं पपईचे उत्पन्न राहील ते जशाच्या तसे तुम्हाला फायदा होईल त्यातला रुपया सुद्धा तुमचा खर्च होणार नाही आंतर पिकातून तुमचा सर्व खर्च वसूल होईल त्यामुळे तुम्ही पपई मध्ये सुरुवातीला आंतरपीक घेऊ शकता,
एकरी उत्पन्न: मित्रांनो आपण जर पपई मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पपई मिळते आणि डायरेक्ट बांधावर विक्री करायचं म्हटलं तर वीस रुपये किलो प्रमाणे सहज विक्री होते वीस रुपये दराने सध्या शेतकरी बांधवावर विक्री करत आहेत वीस रुपये किलो प्रमाणे जरी पपई विक्री केली तरी एकरी आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न निघते,
हे पण वाचा :
watermelon : कलिंगड लागवड 2 महिन्यात 4 लाख रुपये उत्पन्न
limbu : कागदी लिंबू लागवड शेतकऱ्या चे ATM एकरी 6 लाख रुपये उत्पन्न
FAQ
1. पपई लागवड कशी करतात
2. पपई एकरी उत्पन्न
3. पपाईच्या जाती कोणत्या आहेत