PETROL DISEL VEHICLE BAN IN INDIA ? भारतात बंद होणार पेट्रोल आणि डिझेल वाहन ? नितीन गडकरींनी दिले हे उत्तर 2024

PETROL DISEL VEHICLE BAN IN INDIA: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये PETROL DISEL VEHICLE BAN IN INDIA याविषयी माहिती बघणार आहोत.

PETROL DISEL VEHICLE BAN IN INDIA

PETROL DISEL VEHICLE BAN IN INDIA ? भारतात बंद होणार पेट्रोल आणि डिझेल वाहन ?

हे पण वाचा :What Is MCWG In Driving Licence:ड्रायव्हिंग लायसन्समध्ये MCWG म्हणजे काय 2024
मित्रांनो चालू असणारा आणि येणारा काळ हा माहिती आणि तंत्रज्ञानाचा आहे आणि इथे रोज नवनवीन शोध लागत असतात, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा रोज नवनवीन संकल्पना घेऊन येत असतात, पेट्रोल आणि डिझेल हे मर्यादित इंधन आहे, ते तयार केले जाऊ शकत नाही त्यामुळे गरज आहे ती त्याला पर्यायी इंधन शोधण्याची त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेल ला पर्यायी इंधन म्हणून अनेक गोष्टींचा अवलंब केल्या जात आहे जसे की, हायड्रोजन कार, ELECTRIC CAR, इथेनॉल वर चालणारी कार इत्यादी पर्याय सुद्धा अमलात आणले आहेत,

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी असे म्हणतात की पेट्रोल आणि डिझेल हे मर्यादित इंधन स्त्रोत असल्यामुळे त्यांच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्यामुळे महागाई वाढत आहे आणि ते आपल्याला इतर देशातून आयात करावी लागते त्यामुळे त्यावरती आयात शुल्क सुद्धा खूप जास्त आहे आणि हे सर्व काही कमी करायचे असेल तर आपल्याला पर्यायी इंधन शोधावे लागेल, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आपोआपच कमी बघायला मिळेल.

गडकरी म्हणाले की ते 2004 पासून पर्यायी इंधनाचा पुरस्कार करत आहेत आणि येत्या पाच-सात वर्षांत परिस्थिती बदलेल असा विश्वास आहे.
आणि परिस्थिती मध्ये काही बदल सध्या बघायला सुद्धा मिळाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे वाहनांमध्ये कमी बघायला मिळेल आणि ELECTRIC CAR तसेच इथेनॉल वर चालणाऱ्या कार यांचा वापर भविष्यात वाढणार आहे.

हे पण वाचा : What Is The Benefit Of Flex Fuel:फ्लेक्स इंधनाचा फायदा काय आहे 2024

गडकरी म्हणाले, “हायब्रीड वाहनांवर जीएसटी 5 टक्के आणि फ्लेक्स इंजिनसाठी 12 टक्के करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.”

मात्र, नितीन गडकरी यांनी हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कोणतीही डेडलाइन दिलेली नाही. जैव-इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देऊन देश इंधनाची आयात कमी करू शकतो, यावर त्यांचा ठाम विश्वास असल्याचे मंत्री म्हणाले.

जनतेने पेट्रोल आणि डिझेलच्या कार खरेदी न करता इलेक्ट्रॉनिक आणि इथेनॉल वर चालणाऱ्या कार खरेदी कराव्या यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे,

ते म्हणाले की, भारत इंधन आयातीवर 16 लाख कोटी रुपये खर्च करतो. हा पैसा शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी वापरला जाईल, गावे समृद्ध होतील आणि तरुणांना रोजगार मिळेल.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, “मला विश्वास आहे की हे अवघड आहे पण अशक्य नाही.”

गडकरी म्हणाले की परिवर्तन व्हायला थोडासा वेळ लागतो परंतु लोक या गोष्टींचा अवलंब जरूर करतील सुरुवातीला थोडे अवघड जाईल परंतु जेव्हा लोकांना या गोष्टीचे महत्त्व कळेल तेव्हा लोक आपोआपच याचा अवलंब करतील.

पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपासून भारताला पूर्णपणे मुक्त करणे शक्य आहे का, असे विचारले असता नितीन गडकरी म्हणाले, “100 टक्के.”
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती केली जात आहे आणि त्यामुळे इथेनॉल हा पेट्रोल आणि डिझेल ला पर्यायी इंधन म्हणून उपलब्ध आहे त्यामुळे आपण भारताला पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपासून पूर्णपणे मुक्त करू शकतो असे श्री गडकरी म्हणतात.

या क्रमाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हायब्रीड वाहनांवरील जीएसटी कमी करायचा आहे. इतकंच नाही तर देशाला ३६ कोटींहून अधिक पेट्रोल आणि डिझेल वाहनांपासून पूर्णपणे मुक्त करायचे आहे.
भारतामध्ये जवळपास आता 36 कोटी एवढे पेट्रोल आणि डिझेल वर चालणारे वाहने आहेत त्यामुळे खूप सारे अडचणींचा सामना देशाला करावा लागत आहे या सर्वांपासून मुक्ती मिळावी यासाठी सरकार पेट्रोल आणि डिझेल वर चालणाऱ्या वाहनांना पर्याय शोधत आहे.

देशातील वाहन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. पारंपारिक इंधनावरील (पेट्रोल-डिझेल) अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांच्या वापरावर सातत्याने भर देत आहे.

Leave a Reply