PVC PIPE Subssidy : आता मिळवा पीव्हीसी पाईप व पंप सेट वर अनुदान 2024

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये PVC PIPE Subssidy योजनेविषयी जाणून घेणार आहोत,

PVC PIPE Subssidy

PVC PIPE Subssidy : आता मिळवा पीव्हीसी पाईप व पंप सेट वर अनुदान 2024


तर मित्रांनो महाडीबीटी पोर्टल सरकारतर्फे चालविले जात आहे, यामध्ये अनेक योजनांचा समावेश आहे या योजनेमध्ये अनेक गोष्टींसाठी तुम्हाला अर्थसाह्य दिले जाते किंवा अनुदान दिले जाते त्या अंतर्गत तुम्ही वेग वेगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकता,
जसे की फळबाग लागवड योजना शेततळे, सोलर फेन्सिंग, शेततलाव कुंपण, शेताला कुंपण, शेडनेट, ग्रीन हाऊस, इत्यादी योजनांचा लाभ तुम्ही या मार्फत घेऊ शकता.
अर्ज कसा करावा:
त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आपल्या मोबाईल द्वारे गुगल वरती जाऊन महाडीबीटी टाईप करावे तुम्हाला तिथे वेगवेगळे ऑप्शन्स बघायला मिळतील तिथे तुम्ही युजर आयडी आणि आधार द्वारे लॉगिन करू शकता,

PVC PIPE Subssidy

हे पण वाचा : INDIRA GANDHI VIDHWA PENSION YOJNA :इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना 2024

आधार नंबर टाईप केल्यानंतर ओटीपी मिळवा असा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी तिथे टाईप करा त्यानंतर पुढील पर्याय तुम्हाला दाखवण्यात येतील,
त्यानंतर तुम्ही अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा,
त्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला योजनेचे नाव व त्यासमोर बाबी निवडा हा पर्याय दिसेल, त्यानुसार तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेसमोर बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचे आहे ,
त्यानंतर तुम्हाला त्या ठराविक योजनेवर क्लिक केल्यानंतर तिथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे ,

हे पण वाचा : How To Apply Farm Pond Online : शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा 2024

जसे की तालुका, गाव, शहर, गट क्रमांक, मुख्य बाबी, आणि तुम्हाला जो पाईप लागणार आहे त्याची लांबी किती पाहिजे म्हणजे एकूण तुम्हाला किती मीटर मध्ये पाईप पाहिजे ते मीटर मध्ये तुम्हाला टाईप करायचे आहे, आणि त्यानंतर खाली तुम्हाला एक चेक बॉक्स दाखवण्यात येईल मी पूर्व संमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही, याची मला जाणीव आहे असे त्यामध्ये लिहिले असेल तिथे ओके करायचे आहे, आणि खाली जतन करा वर क्लिक करायचे आहे.
याच प्रकारे तुम्ही इतरही योजनांसाठी अर्ज करू शकता आणि तरही योजनांचा लाभ देऊ शकता .

PVC PIPE Subssidy

त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जातो त्यानंतर त्या सर्व बाबी ते चेक करतात आणि सर्व माहिती योग्य असल्यास तुम्हाला पूर्व संमती मिळते पूर्व संमती मिळाल्यानंतर तुम्ही पाईप खरेदी करू शकता आणि त्याचे बिल, महाडीबीटी पोर्टल वरती अपलोड करून 30 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटला अनुदान जमा करण्यात येते.
. यामध्ये जे अनुदान आहे ते वेगवेगळे आहेत जसे की अल्पभूधारक शेतकरी यांना 45% असे आहे.
तुम्ही कोण कोणत्या योजनांसाठी अर्ज केला आहे त्याविषयी सर्व माहिती तुम्ही खाली बघू शकता,

तुम्ही जर ही प्रक्रिया करण्यास असमर्थ असाल किंवा तुम्हाला या योजनांसाठी अर्ज करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला हवे त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि ते योजनेचा लाभ घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टल वरती लॉगिन करून माहिती घेऊ शकता किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून देखील माहिती घेऊ शकता.

Leave a Reply