नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत की रब्बी हंगामसाठी ज्वारीचे कोणते वाण वापरावे , या विषयी माहिती .
RABBI JOWAR : रब्बी हंगामासाठी निवडा ज्वारीचे हे 1 वाण
रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांकडे एक ते दोन संरक्षित पाण्याची सुविधा आहे असे शेतकरी हमखास रब्बी ज्वारीची पेरणी करतात. ज्वारीसोबतच कडबाही शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देतो.
पण रब्बी ज्वारीचे उत्पादन खरीप ज्वारीच्या तुलनेत कमी येत.
याच मुख्य कारण म्हणजे खरीप हंगामात अनेक संकरित व शुद्ध वाण उपलब्ध आहेत तर रब्बी हंगामासाठी मोजकेच वाण उपलब्ध आहेत. ही गरज लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राने विकसीत केलेले रब्बी ज्वारीचे पीकेव्ही क्रांती म्हणजेच एके एस व्ही १३ आर हे वाण फायदेशीर ठरले आहे. हे वाण फायदेशिर कस आहे याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
RABBI JOWAR : रब्बी हंगामासाठी निवडा ज्वारीचे हे वाण
रब्बी ज्वारीपासून मिळणारे चांगले प्रतीचे धान्य जनावरांसाठी चांगला प्रतिचा चारा व धान्याला मिळणारा चांगला बाजारभाव या सर्व बाबी लक्षात घेऊन रब्बी ज्वारीचे पीक फायदेशीर मानले जाते. रब्बी हंगामात जास्त उत्पादन देणारे मालदांडी – ३५ – १ या वाणाला पर्याय म्हणून पीकेव्ही क्रांती म्हणजेच एके एस व्ही १३ आर हे सरळ व शुद्ध वाण २००४ – २००५ या वर्षी राज्य पातळीवर प्रसारित झालेले आहे. हे वाण इतर गुणामध्येही मालदांडी-३५-१ या वाणा च्या तोडीस तोड आहे.
पीकेव्ही क्रांती वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत?
हे वाण मध्यम कालावधीत तयार होणारे आहे. या वाणाचे कणीस आकाराने मोठे, दाणे मोत्यासारखे चमकदार ठोकळ आहेत. हे वाण मध्यम ते भारी जमिनी करिता फायदेशिर मानले जाते. या वाणापासून धान्याचे उत्पादन हेक्टरी २५ ते ३० क्विंटल तर कडब्याचे उत्पादन हेक्टरी ७० ते ७५ क्विंटल मिळते. ज्वारीच्या इतर वाणांच्या तुलनेत भाकरीची प्रत अतिशय उत्तम असून इतर गुणधर्मांमध्ये सुद्धा हे वाण मालदांडी – ३५ – १ या वाणासारखेच आहे.
सध्या रब्बी ज्वारीचे उपलब्ध वाण आहेत त्या वाणांपैकी हे वाण जास्त उत्पादन क्षमता असणारे तसच चांगल्या प्रतीचे धान्य व कडब्याच्या उत्पादनासाठी झपाट्याने लोकप्रिय होत आहे. हे वाण मध्यम कालावधीत म्हणजेच १२० ते १२२ दिवसात तयार होत. ज्वारीच्या मालदांडी ३५ – १ या वाणापेक्षा धान्याचे उत्पादन २० टक्क्यांनी तर कडब्याचे उत्पादन २९ टक्क्यांनी जास्त आहे. हे वाण खोडकीड, खोडमाशी व कडा करपा या कीड, रोगासाठी बऱ्याच प्रमाणात प्रतिकारक आहे. याशिवाय उत्पादनासाठी सोपे आणि दरवर्षी या वाणाचे बियाणे वापरता येते आणि मळणीही जास्त सोप्या पद्धतीने करता येते. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामासाठी या वाणाचा विचार नक्की करा.
ज्वारी खाण्याचे फायदे ;
ज्वारी चे अन्न खायला पोंष्टीक चवदार आणि पचायला हलके असते , आणि ज्वारी खाण्याचे शरीराला खूप फायदे असतात त्यामुळे आजही खेड्या पाड्यांत लोक बीमार असताना जवारी खातात तसेच , ज्वारी चे अन्न पचण्यास हलके असते आणि वयस्कर व्यक्तींना गव्हाचे जड अन्न पचत नाही त्यामुळे ते गहू ना खाता ज्वारी खातात , पूर्वी लोक ज्वारी बाजरी जास्त खायचे किंवा एक वेळ ज्वारी आणि एक वेळ गहू किंवा बाजरी खायचे त्यामुळे ते बीमार कमी पडायचे ,
ज्वारी मध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते , त्यामुळे पचणा संबंधी अडचणीवर ते उपयोगी ठरते , ज्वारी पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात , लाहया बनवतात , ज्वारीचे कणीस भाजून लोक खूप आवडीने खातात , ज्वारी ग्लुटेन फ्री असल्याने ज्यांना गहू खायला चालत नाही त्यांच्यासाठी ज्वारी अत्यंत उपयोगी आहे , ज्वारीमुळे आतडयान्चे आरोग्य निरोगी व उत्तम राहते , ज्वारी मध्ये पोटॅशियम चे प्रमाण जास्त असल्याने ज्वारी उच्च रक्त दाबावर अतिशय उपयुक्त आहे ,
आहारात ज्वारीचा नियमित समावेश केल्याने कॉलेस्टेरोल चे प्रमाण नियंत्रणात राहते , त्यामुळे स्ट्रोक आणि हार्ट अटॅक पासून आपले संरक्षण होते ,
त्याचबरोबर हाडांचे विकार , मेंदूचे विकार , दातांचे विकार , डायबीटीज यासाठी ज्वारी अत्यंत लाभदायक आहे ,
ज्वारी मध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे ,
ज्वारीमध्ये थंडावा अधिक आहे , त्यामुळे ज्यांच्या शरीरात गरमी अधिक आहे किंवा ज्यांना उन्हाचा त्रास अधिक होतो त्यांनी आपल्या आहरत ज्वारीचा समावेश नियमित करावा ,
हे पण वाचा :
limbu : कागदी लिंबू लागवड शेतकऱ्या चे ATM एकरी 6 लाख रुपये उत्पन्न
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?
What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय 2024
आपण या लेखामध्ये RABBI JOWAR : रब्बी हंगामासाठी ज्वारीच्या कोणत्या वाणाची निवड करावी याविषयी माहिती बघितली .