सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात 

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये सागवान लागवड याविषयी माहिती बघणार आहोत,

 यामध्ये जमीन  सागवानाच्या जाती, झाडांमधील अंतर ,  परिपक्व होण्यास लागणारा वेळयाविषयी सखोल माहिती बघणार आहोत,

सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात 

सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात :

जमीन: मित्रांनो सागवान लागवडीसाठी हलकी ती मध्यम स्वरूपाची जमीन चालते जास्त भारी जमीन चालत नाही पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असायला हवी पाणी जर  साचून राहिले तर झाडे मरू शकतात,

लागवड: सागवान लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी आणि आठ बाय आठ फुटावर एक बाई एक फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत, उन्हाळ्यामध्ये गड्डे चांगले तापू द्यावे जेणेकरून त्यामध्ये काही बुरशी किडे जे काय असतील ते नष्ट होतील त्यानंतर मृग  नक्षत्राच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर गड्डे शेणखत बुरशीनाशक थायमेट इत्यादी टाकून गड्डे भरून घ्यावेत आणि त्यानंतर त्यामध्ये रोपे लावून  घ्यावीत,

आणि त्यानंतर व्यवस्थित लागवड करून घ्यावी लागवड झाल्यानंतर बेड पाडून घ्यावे जेणेकरून पावसाचे पाणी वगैरे जास्त जरी पडले तरी बेड असल्याकारणाने झाडांच्या मुळाजवळ पाणी जमणार नाही आणि झाडांना नुकसान होणार नाही,

सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात 

लागवडीचा काळ: मित्रांनो जून जुलै ऑगस्ट हा सागवान लागवडीसाठी चा उत्तम काळ आहे कारण या वेळेस वातावरणामध्ये ओलावा असतो पाऊस पडत असतो ज्यामुळे लावलेल्या रोपांची मर होण्याची शक्यता कमी असते,

सागवानाच्या जाती:  कोन्नी  सागवान, पश्चिमी आफ्रिकन सागवान, गोदावरी सागवान,  दक्षिणी आणि मध्य आफ्रिकन सागवान,  नीलांबर सागवान

 इत्यादी सागवानाच्या काही जाती आहेत ज्या इतर सागवानापेक्षा लवकर तयार होतात,

सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात 

 रोपे:  मित्रांनो आज काल दोन प्रकारची रोपे मिळतात एक टिशू कल्चर आणि एक नॉर्मल रोपे सर नॉर्मल रोपे व्यवस्थित वाढत नाहीत किंवा सरळ उंच जात नाही

 परंतु टिशू कल्चर ची रोपे लावल्यानंतर ती एकदम एक रेषेत सरळ वाढतात आणि उंच वाढतात त्यांना इकडे तिकडे फाटे फुटत नाही, आणि लाकूड सरळ असल्यामुळे त्याला मागणीही जास्त असते, सरकार मान्य किंवा इतरही नर्सरी मध्ये तुम्हाला टिशू कल्चर ची रोपे आरामात मिळू शकतील,

 टिशू कल्चर रोपे इतर रोपांपेक्षा जलद गतीने वाढतात,

 सरकारी योजना:   मित्रांनो आजकाल राज्य सरकार तसेच केंद्र सरकार तर्फे मोहगणी ,सागवान इत्यादी लागवड करण्यासाठी सरकारतर्फे अनुदान सुद्धा मिळते त्यामध्ये तुम्हाला रोपे विकत घेण्यापासून ते लागवडी पर्यंत सर्व खर्च मिळतो,

 तुमच्याकडे जमीन कमी असेल तर तुम्ही शेताच्या बांधावरती चहू बाजूने सागवान लागवड करू शकता किंवा जमीन जास्त असेल तर शेताच्या मध्यभागी सुद्धा लागवड करू शकता ज्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक नफा मिळेल. 

एकरी झाडांची संख्या आणि अंतर:  शेतकरी  मित्रांनो अनेक शेतकरी अलग अलग अंतराचा वापर करतात परंतु लागवड करत असताना अंतर ही खूप महत्त्वाची बाजू आहे कारण झाडे जास्त जवळ झाली तर एकमेकांमध्ये गुंतू शकतात त्यामुळे व्यवस्थित एक ठराविक आंतर असणे गरजेचे आहे, तर आठ बाय आठ फूट हे एक चांगले अंतर आहे आठ बाय आठ फुटावरती सागवानाची लागवड केल्यानंतर एका एकर मध्ये जवळपास 520 सागवानाची झाडे लागतात,  दोन झाडांमधील अंतर आठ फूट आणि दोन ओळींमधील अंतर सुद्धा आठ फूट असणे आवश्यक आहे,

आंतरपीक:  मित्रांनो सागवानाचे रोपे जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत तुम्ही उंच वाढणारे पीक घेऊ शकता जसे की मक्का ,कपाशी इत्यादी

 आणि सागवानाची झाडे मोठी झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही लहान वाढणारी कमी उंचीची पीक लागवड करू शकता जसे की भुईमूग ,मुग ,उडीद ,अद्रक ,कपाशी इत्यादी

सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात 
सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात :

त्याचबरोबर तुम्ही गावरान कोंबडी पालन सुद्धा करू शकता ज्यामधून तुम्हाला अंडी व मास मिळेल व चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न यामधून तुम्हाला मिळेल, यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही कारण एक नैसर्गिक वातावरण किती असेल आणि एक सावली वगैरे सर्व काही तिथे असेल फक्त तुम्हाला एक नॉर्मल शेड फक्त बनवावा लागेल,

मधमाशी पालन:  गावरान कोंबडी पालन सोबतच तुम्ही मधमाशी पालन सुद्धा यामध्ये करू शकतात कारण यामध्ये तुम्हाला मधमाशांसाठी एक नॅचरल नैसर्गिक वातावरण लाभेल ,

मधमाशी पालनातून देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे आर्थिक हातभार लागेल त्यामध्ये तुम्ही मधाच्या पेट्या  ठेवू शकता ,

अशा प्रकारे तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल कारण सागवान परिपक्व होण्यासाठी आणि विक्री होण्यासाठी तुम्हाला किमान दहा ते बारा वर्षाचा कालावधी लागेल तोपर्यंत तुम्हाला गावरान कोंबडी पालन आणि मधमाशी पालन यामधून दरवर्षी आर्थिक नफा होत राहील,

कंपनी  मार्फत लागवड: शेतकरी मित्रांनो आज-काल बऱ्याच कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांसोबत करार करतात आणि त्या करार पद्धतीनुसार ते शेतकऱ्यांना जे काही औषध पाणी खत वगैरे जे लागल ते देतात आणि जेव्हा आपले पीक परिपक्व होईल तेव्हा पीक विक्रीतून जो काही नफा मिळेल त्यामधून काही पर्सेंटेज ते घेऊन आपल्याला सुविधा देतात तेव्हा, आपण आपले पीक त्यांनाही विकू शकतो किंवा बाहेर खुल्या बाजारात सुद्धा विक्री करू शकतो,

कलमांसाठी खर्च:  मित्रांनो सरकारी योजनेअंतर्गत आपल्याला मोफत रोपे मिळतात परंतु आपण जर सरकारी योजनेचा फायदा न घेता लागवड करायचा विचार असेल तर जवळपास शंभर रुपयाला याप्रमाणे एक सागवाण्याचे रोप आपल्याला मिळते,

पाणी  व्यवस्थापन:  सागवानाच्या पिकाला जास्त पाणी लागत नाही तुमच्याकडे थोडे जरी पाणी उपलब्ध असेल तरी तुम्ही सागवान लागवड करू शकता आणि त्यामधून चांगला आर्थिक नफा कमवू शकता,

पाण्याची कमतरता असल्यास तुम्ही त्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करू शकता ज्यामुळे पन्नास ते साठ टक्के पाण्याची बचत होते,

खत व्यवस्थापन:  शेतकरी मित्रांनो सागवान या पिकाला कोणतेही खत देण्याची गरज पडत नाही तुमच्याकडे उपलब्ध असेल तर  शेणखत देऊ शकता नसल्यास  कोणतेही  खत देण्याची गरज नाही,

आणि यावर ते इतर कोणते रोगराई येत नाही त्यामुळे इतरही कोणताही खर्च करण्याची गरज नाही,

सागवानाचा वापर: शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की सहा घे एक मौल्यवान लाकूड आहे त्याचा वापर जहाज बांधणी बंदुकीचा काही भाग लाकडी खेळणी सजावटीच्या वस्तू तसेच घरातील फर्निचर घराच्या चौकटी इत्यादींसाठी वापर होतो त्यामुळे सागवानाच्या लाकडाला चांगली मागणी आहे, ज्यामधून शेतकऱ्यांना दहा ते बारा वर्षानंतर चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. 

एकरी उत्पन्न: शेतकरी मित्रांनो एका एकर मध्ये सागवानाची जवळपास आठ बाय आठ फूट या अंतरावर ती पाचशे वीस झाडे लागतात या झाडांपासून बारा ते पंधरा वर्षानंतर जवळपास एक कोटी रुपये उत्पन्न सहजपणे मिळू शकते असे काही बायोटेक कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांना करार पद्धतीने झाडे उपलब्ध करून देतात त्यांचे मत आहे,

हे पण वाचा :

limbu : कागदी  लिंबू लागवड शेतकऱ्या चे ATM एकरी 6 लाख रुपये उत्पन्न

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?

FAQ: 

  1. साग लागवड कशी करतात ,
  2. साग किती वर्षात पक्व होतात ,
  3. सागातून आर्थिक नफा किती होतो .

Leave a Reply