नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये Solar Subsidy Scheme 2024 सोलर सिस्टम विषयी जाणून घेणार आहोत .
Solar Subsidy Scheme 2024
हे पण वाचा : PVC PIPE Subssidy : आता मिळवा पीव्हीसी पाईप व पंप सेट वर अनुदान 2024
केंद्र सरकार आणि राज्य सरकार जनतेसाठी रोज नवनवीन योजना राबवत असते त्यातीलच पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना आणि प्रधानमंत्री सूर्योदय योजना सरकार सध्या राबवत आहे,
Solar Subsidy Scheme:- केंद्र सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आली व या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी घरांवर रूफ टॉप सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत.आणि या कामाला सुरुवात झालेली आहे .
या योजनेचा लाभ घेतल्यामुळे ग्रीड जोडलेल्या विजेचा वापर कमी होईल आणि ग्राहकांच्या विजबिलात देखील मोठ्या प्रमाणात बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच मीटरच्या तरतुदीनुसार या सोलर प्लांटमधून तयार होणारी अतिरिक्त वीज ग्रीडला पाठवली जाऊ शकते. अतिरिक्त निर्यात केलेल्या विजेकरिता ग्राहकांना आर्थिक फायदा देखील या माध्यमातून मिळू शकतो हा सरकारचा उद्देश आहे ,
हे पण वाचा : INDIRA GANDHI VIDHWA PENSION YOJNA :इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना 2024
आपल्याला माहित आहे की पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले असून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 78 हजार रुपये पर्यंत अनुदान देखील मिळणार आहे.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा :
या योजनेच्या अधिक माहिती करिता तुम्ही https://pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळा देखील भेट देऊ शकतात किंवा तुमच्या परिसरातील ई सेवा केंद्रावर भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता .
या योजनेसाठी आवश्यक पात्रता :
- याकरिता एक मार्च 2024 रोजी जारी केलेल्या माहितीनुसार या योजनेसाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- तसेच संबंधित व्यक्तीच्या घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी योग्य छप्पर असणे गरजेचे आहे.
- महत्त्वाचे म्हणजे संबंधित कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- तसेच या अगोदर सोलर पॅनलसाठी इतर कोणत्याही अनुदान योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ घेतलेला नाही त्यांनाच ही जोडणी दिली जाणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे स्वतःच्या मालकीचे घर असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे वीज बिल थकलेले नसावे.
- मोबाईल नंबर आधार सोबत लिंक असणे आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीचे स्वतःचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावा.
योजनेसाठी अर्ज कसा करावा :
- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने अगोदर या योजनेची वेबसाईट pmsurygarh.gov.in वर स्वतःचे अकाउंट तयार करावे व यावरून रुफ टॉप सोलर सिस्टम इन्स्टॉल करण्याकरिता ग्राहकांना निर्माता आणि पुरवठादार निवडण्याचा या ठिकाणी पर्याय आहे.
- सगळ्यात अगोदर या पोर्टल वर नोंदणी करावी व नोंदणी केल्यानंतर तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करावी. ही निवड केल्यानंतर तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाकावा.
- ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगिन करावे आणि फॉर्म नुसार रूफ टॉप सोलर साठी अर्ज करावा.
- एकदा तुम्हाला मंजुरी मिळाल्यानंतर कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर प्लांट बसवून घ्यावा.
- सोलर प्लांट चे इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लांटचा तपशील सबमिट करावा आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा.
- नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून एक कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
- तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर पोर्टलच्या माध्यमातून बँक खात्याचे तपशील व कॅन्सल केलेला चेक सबमिट करावा. त्यानंतर तुमची अनुदानाची रक्कम बँक खात्यात तीस दिवसांच्या आत मिळते.
तुम्ही जर हे अर्ज करण्यास सक्षम असाल तर ठीक अन्यथा तुम्ही कोणत्याही जवळच्या अधिकृत सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकत.
अनुदान किती मिळेल ?
एक किलो वॅट रूफ टॉप सोलर सिस्टम करिता किमान अनुदान 30000 रुपये
दोन किलोवॅट रूफ टॉप सोलर सिस्टम करिता किमान अनुदान 60000 रुपये
तर तीन किलोवॅट रूफ टॉप सोलर सिस्टम करिता किमान 78 हजार रुपये अनुदान मिळेल.
या विषयी अधिक माहितीसाठी आपण कार्यालयीन संकेत स्थळावर भेट देऊ शकता .