नमस्कार मित्रांनो या लेखांमध्ये आज आपण Types of agriculture in India | भारतातील शेतीचे प्रकार विषयी माहिती बघणार आहोत,
Types of agriculture in India | भारतातील शेतीचे प्रकार 2024
भारतामध्ये विविध प्रकारचे कृषी क्षेत्र आहे ज्यामध्ये विविध प्रदेशांमध्ये विविध प्रकारची शेती केली जाते.भारतातील शेतीचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत ,
Subsistence Agriculture: निर्वाह शेती: शेतकरी व त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी केल्या जाणाऱ्या शेतीला निर्वाह शेती असे म्हणतात शेती करून व त्यातून मिळालेल्या मालाची विक्री करून पैसा मिळवणे हा त्याचा उद्देश नसतो या शेतातून एवढेच उत्पन्न होते ज्यातून कसाबसा परिवाराचा उदरनिर्वाह होईल,
निर्वाह शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही इथे जास्तीत जास्त हाताच्या साह्याने काम केले जाते किंवा मजुराच्या साह्याने काम केले जाते,
सधन निर्वाह शेती दाट लोकवस्तीच्या भागात प्रचलित आहे.
Extensive Subsistence Agriculture: विस्तीर्ण निर्वाह शेतीही जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून त्यावरती केली जाते जसे की डोंगराळ भाग जंगल भाग जिथे लोकसंख्या कमी असते अशा ठिकाणी विश्तीर्ण निर्वाह शेती केली जाते यामध्ये एकापेक्षा जास्त पिके घेतली जातात आणि मुख्य पीक हे भात असते, इथे सुद्धा खूप जास्त उत्पन्न होत नाही तर फक्त कुटुंबाच्या उदरनिर्वाह एवढे उत्पन्न होते आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊन जे उत्पन्न शिल्लक राहील ते विक्री करून प्रपंच चालवला जातो,
विस्तीर्ण निर्वाह शेती विरळ लोकसंख्या असलेल्या प्रदेशांमध्ये हे अधिक सामान्य आहे.
shifting agriculture: शेती बदलणे
shifting agriculture या प्रकारच्या शेतीमध्ये,सर्व प्रथम, झाडे तोडून आणि खोड आणि फांद्या जाळून जमीन साफ केली जाते , ती जाळलेल्या झाडांची राख जमिनीसोबत मिक्स केली जाते आणि त्यामध्ये शेती केली जाते या प्रकारची शेती मुख्यतः अमेरिकन जंगलात करतात आणि भारतात देखील जंगल प्रदेशात जसे की आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम नागालँड मणिपूर ओरिसा झारखंड छत्तीसगड या ठिकाणी केली जाते या प्रकारच्या शेतीला झूम शेती सुद्धा म्हटले जाते,या प्रकारामध्ये दरवर्षी नवनवीन ठिकाणी झाडे तोडून त्यावरती शेती केली जाते म्हणजेच शेतीची जागा जी आहे ती प्रत्येक वर्षी बदलली जाते.
Plantation farming : लागवड शेती
या प्रकारचे शेतीमध्ये एकाच पिकाची लागवड केली जाते आणि या शेतीचा मुख्य उद्देश हा पैसा कमावणे हा आहे,
उदाहरण बघायचे झाले तर चहा ,कॉफी ,रबर, केळी इत्यादी पिकांची लागवड यामध्ये केली जाते
Commercial Agriculture: व्यावसायिक शेती: व्यावसायिक शेती ही मुख्यत्वे शेतीमध्ये उत्पादन घेऊन ते बाजारात विक्री करून त्यामधून आर्थिक नफा कमवण्यासाठी केली जाते त्यामुळे व्यावसायिक शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तसेच चांगल्या प्रतीचे बियाणे वापरले जाते खत औषधांचा वापर केला जातो आणि या शेतीचा मुख्य उद्देश हा आर्थिक नफा कमवणे हा असतो ,व्यावसायिक शेती पूर्ण भारतभर केली जाते व्यावसायिक पिकांचे उदाहरण बघायचे झाले तर यामध्ये कापूस, जूट ,गहू ,तांदूळ,मसाले, उस . इत्यादी फिके आहेत.
Commercial Crops:व्यावसायिक पिके:
कापूस शेती: फायबर उत्पादनासाठी कापसाची लागवड.
ऊस शेती: साखर आणि इथेनॉलसाठी उसाचे उत्पादन.
Horticulture: फलोत्पादन: फळबागांची लागवड,भाज्या,फुले, शोभेच्या वनस्पती. यांची व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड केली जाते आणि त्यामधून आर्थिक नफा कामाला जातो,
Dryland Agriculture: कोरडवाहू शेती: पृथ्वीच्या एकूण भूभागा पैकी 35 टक्के भूभागावर कोरडवाहू शेती केली जाते, सिंचनाच्या सुविधा नसणे, अवर्षण प्रवण क्षेत्र हलक्या जमिनी इत्यादी कोरडवाहू शेतीची कारणे आहेत,
कोरडवाहू शेती म्हणजे पावसाच्या पाण्यावर केली जाणारी शेती तसेच सिंचनाच्या उपलब्ध असणाऱ्या अत्यल्प सुविधा यावर केली जाणारी शेती म्हणजेच कोरडवाहू शेती.
पाण्यासाठी पावसावर अवलंबून असते.पिकांच्या वाढीसाठी पाऊस पुरेसा असलेल्या भागात सिंचनाशिवाय पिकांची लागवड केली जाते.
Wetland Agriculture: ओलसर शेती:
भातशेती : ओलसर शेती या प्रकारातील शेती मुख्यतः पूरग्रस्त प्रदेशात जसे की उत्तर भारत तसेच इतर
पूरग्रस्त प्रदेशात प्रामुख्याने भातशेती केली जाते.जास्त पाऊस किंवा सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता असलेल्या प्रदेशांमध्ये सामान्य सामान्यतः ही शेती होते.
Mixed Farming: मिश्र शेती
मिश्र शेती या प्रकारामध्ये शेती करत असताना शेती सोबतच जोडधंदा म्हणून किंवा शेतीला सोबत म्हणून आर्थिक नफ्या करिता पशुपालन देखील केले जाते आणि शेती बरोबरच पशुपालनातून सुद्धा आर्थिक नफा घेतला जातो यालाच मिश्र शेती असे म्हणतात,
Organic Farming: सेंद्रिय शेती:
सेंद्रिय शेती म्हणजे सिंथेटिक कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर न करता पिकांचे उरलेले औषध तसेच शेणखत इत्यादींचा वापर करून केली जाणारी शेती म्हणजे सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीचे फायदे बघता आणि रासायनिक शेतीचे तोटे बघता शेतकऱ्यांचा कल रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे वाढत आहे, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पिकाला इतर पिकाच्या तुलनेत बाजार मूल्य सुद्धा अधिक मिळते.
Specialized Farming: विशेष शेती
दुग्ध व्यवसाय: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे .
कुक्कुटपालन: मांस आणि अंडी उत्पादनासाठी कुक्कुटपालनाचा समावेश करणे .
सेरीकल्चर: रेशीम उत्पादनासाठी रेशीम-उत्पादक रेशीम किड्यांची लागवड करणे ,
इत्यादी प्रकारची शेती विशेष शेतीमध्ये केली जाते,
हवामानावर आधारित शेती:
आदिवासी शेती: डोंगराळ आणि जंगली प्रदेशांमध्ये आदिवासी समुदायांनी अनुसरण केलेल्या शेतीचा यामध्ये
समावेश होतो.
Cooperative Farming: सहकारी शेती:
याला गट शेती संघटित शेती असेही म्हणतात,
सहकार शेतीमध्ये छोटे छोटे शेतकरी किंवा मोठे शेतकरी अनेक शेतकरी एकत्र येतात आणि एकत्र येऊन शेती करतात ,यामध्ये काही अल्पभूधारक शेतकरी असतील तर त्यांच्याकडे आर्थिक अडचण असल्याकारणाने ते शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करू शकत नाही किंवा इतरही काही जे गोष्टी असतील ज्या महाग असतात त्याचा वापर ते करू शकत नाही त्यामुळे सहकार शेतीमार्फत ते सर्व काही शक्य होते कारण अनेक शेतकरी एकत्र येऊन पैसा उभा करतात आणि त्याचा वापर चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतात,
तसेच बघायचे झाले तर उदाहरणार्थ एखादा ट्रॅक्टर विकत घ्यायचा असल्यास एखाद्या शेतकऱ्याला तो शक्य होत नाही परंतु अनेक शेतकरी एकत्र येऊन तो ट्रॅक्टर ते सहजपणे घेऊ शकतात आणि त्याचा वापर आपल्या सर्वांचे वापरासाठी करून घेऊ शकतात यालाच सहकार शेती असे म्हणतात
शेतकरी त्यांची संसाधने एकत्र करतात आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात.
शेतकरी मित्रांनो या लेखांमध्ये आपण भारतातील शेतीचे प्रकार याविषयी माहिती बघितली.
हे पण वाचा :
chandan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती
how many coconut trees can be planted in 1 acre 1 एकरात नारळाची किती झाडे लावता येतील