UNDER GROUND TECHNIQ चीभडी जमीन असल्यास काय करावे 2024

नमस्कार मित्रांनो आपण आज या लेखांमध्ये UNDER GROUND TECHNIQ चीभडी जमीन असल्यास काय करावे याविषयी माहिती बघणार आहोत,

UNDER GROUND TECHNIQ चीभडी जमीन असल्यास काय करावे 2024
UNDER GROUND TECHNIQ चीभडी जमीन असल्यास काय करावे 2024

UNDER GROUND TECHNIQ चीभडी जमीन असल्यास काय करावे 2024

तर मित्रांनो आपण नेहमी ऐकत आलो आहे की जल आहे तर जीवन आहे , प्रत्येक सजीवांसाठी पाणी हे आवश्यक आहे परंतु मित्रांनो हेच पाणी जर जास्त झाले तर तेही चालत नाही, दुष्काळ हे दोन प्रकारचे असतात कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ , पाऊस कमी पडला तरीही चालत नाही आणि जास्त पडला तरी जमत नाही सांगायचं तात्पर्य हे की समतोल हा महत्त्वाचा आहे, बऱ्याच ठिकाणी तलावाच्या कडेला किंवा नदीच्या कडेला जमीन ही चीभडत असते म्हणजेच पाणी धरून असते त्यामध्ये पाहिजे तसे पीक येत नाही,

ज्या मळ्याच्या जमिनी असतात त्या लगेच पाणी धरून ठेवतात आणि तिथे मग आपण जे पीक वगैरे पेरणी करतो ते मूळ सड वगैरे होऊन पिक वाळून जाते, अशा परिस्थितीत बरेच शेतकरी तिथे सोयाबीन किंवा इतर पिके जसे की भात वगैरे लावतात परंतु जास्त पाणी झाल्याने तेही जमत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा राहतो की अशा जमिनीमध्ये काय पेरावे किंवा या ? चिभड्या जमिनीवरती काय उपाय करावा,

तर मित्रांनो काही तज्ञांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेले आहे UNDER GROUND TECHNIQ यामध्ये जिथे पाणी जास्त साचून राहते तिथे किंवा शेताच्या मध्यभागी एक नाली खोदली जाते आणि ती नाली शेताच्या उताराच्या दिशेने काढली जाते म्हणजेच शेतातील जे पाणी आहे ते शेताच्या बाहेर जाण्यास मदत होईल आता आपण येथे बघणार आहोत किती नाली कशी केली जाते,

UNDER GROUND TECHNIQ काय आहे : या तंत्रज्ञानामध्ये जिथे पाणी साचून राहते तिथे 8 ते 10 फूट खोल असे नाली बनवतात आणि जमिनीच्या उताराच्या दिशेने तिला घेऊन जातात जेणेकरून शेतामध्ये जे थांबणारे पाणी आहे साचून राहणारे पाणी आहे ते शेताच्या बाहेर जाईल त्यासाठी 8 फूट किंवा त्यापेक्षा खोल अशी नाली करून त्यामध्ये दगड गोटे आणून टाकले जातात आणि जर आपण खोदलेली नाली आठ फूट असेल तर त्यामध्ये चार फुटापर्यंत दगड गोटे भरून घेतात आणि त्यावरून पॉलिथिन अंथरून घेतात,

जेणेकरून वरतून जी आपण माती टाकणार आहे ती माती त्या दगड गोट्यांमध्ये जाऊन बसणार नाही आणि जी नाली आपण खोदली आहे त्यामधून पाणी पाझरून जाणार आहे किंवा पाणी शेताच्या बाहेर जाणार आहे ते माती त्यामध्ये बसल्यामुळे जाणार नाही त्यामुळे दगड गोट्यांवरून पॉलिथिन टाकून घ्यावी लागते आणि मग त्यावरून ती नाली बुजून घेतली जाते माती टाकली जाते ,

काय खबरदारी घ्यावी : या गोष्टी करत असताना लक्षात ठेवण्यायोग्य गोष्टही आहे की आपली नाली ही किमान आठ दहा फूट खोल असावी आणि आपण नाली मध्ये जे दगड कुठे टाकणार आहोत त्यावरती आवर्जून पॉलिथिन टाकावी जेणेकरून त्यामध्ये माती बसून ते जाम होणार नाही, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दगड गोट्यांवरून कमीत कमी 4 फुटापर्यंत माती असावी,कारण दगड गोट्यांवरती माती जर कमी असेल तर शेतीची मशागत करताना ते दगड गोटे मधी अडथळा निर्माण करू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे दगड गोटे जर जास्त वरती असतील तर आपण शेतीला दिलेले पाणी लगेच दगड गोट्यांमध्ये वाहून जाईल आणि पिकाला वारंवार पाणी द्यावे लागेल या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे,

UNDER GROUND TECHNIQ चीभडी जमीन असल्यास काय करावे 2024
UNDER GROUND TECHNIQ चीभडी जमीन असल्यास काय करावे 2024

नाली कशा आकाराची घेतात : आपण आपल्या शेताच्या आकारानुसार नाली घेऊ शकतो,
काही शेतकरी इंग्रजी एल आकाराची तर काही शेतकरी इंग्रजी वाय आकाराची तर काही शेतकरी इंद्रदेवाच्या वजराच्या आकाराची नाली घेतात, जमिनीच्या मध्यभागी जर पाणी साचून राहत असेल तर एल किंवा वाय आकाराची नाली तुम्ही घेऊ शकता , परंतु पूर्ण शेतामध्ये जर पाणी साचून राहत असेल तर तुम्ही इंद्रदेवाच्या वज्राच्या आकाराप्रमाणे नाल्या करू शकता म्हणजेच एक मुख्य नाली बनवून बाकी इतर नाल्या तिला जोडू शकता जेणेकरून सर्व शेतामधील पाणी शेताच्या बाहेर जाईल,

हे तंत्रज्ञान खूप यशस्वी ठरलेले आहे खूप शेतकऱ्यांनी याचा वापर केला आहे आणि आजही खूप लोक याचा वापर करीत आहेत या तंत्रज्ञानामुळे जिथे उत्पन्न होत नव्हते तिथे आज मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत आहे,

यासाठी लागणारा खर्च: शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला फक्त जेसीबीचा खर्च लागतो कारण आपल्या विहिरीचे दगड गोटे जे असतात ते आपण यामध्ये वापरू शकतो आणि मल्चिंग ची जी फॉलिथिन आहे ती हजार ते बाराशे रुपये बंडल प्रमाणे सहज मिळते आणि तेही चांगल्या क्वालिटीचे मल्चिंग बंडल आपल्याला मिळते ते आपण त्यामध्ये वापरू शकतो, खर्चाच्या बाबतीत बोलायचे झाले तर एकरी जवळपास 20 ते 30 हजार रुपये खर्च येऊ शकतो,

 

हे पण वाचा :

GERANIUM FARMING: जिरेनियम शेती  कशी करतात 2024

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय 2024

Leave a Reply