what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय 2024

नमस्कार मित्रांनोआज लेखामध्ये आपण हायड्रोपोनिक्स म्हणजे काय याविषयी सखोल माहिती बघणार आहोत,

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय 2024

हायड्रोपोनिक्स ही मातीशिवाय वनस्पती वाढवण्याची पद्धत आहे.वनस्पतींच्या वाढीसाठी पारंपरिक मातीचा वापर करण्याऐवजी हायड्रोपोनिक्स प्रनाली मध्ये आवश्यक खनिजे आणि पोषक तत्त्वे थेट वनस्पतींच्या मुळांपर्यंत सोडली जातात,
यामध्ये माती ऐवजी कोकोपीट ,हायड्रो स्टोन, स्टोन, वापरतात हे फक्त सपोर्टसाठी असतात रोपाच्या वाढीसाठी न्यूट्रिशन वगैरे देतात मातीची गरज लागत नाही,

Hydroponics कसे काम करते : डीप वॉटर कल्चर (DWC): वनस्पतींची मुळे पाण्यात बुडवून पौष्टिक द्रावणात लटकली जातात,पोषक घटक आणि ऑक्सिजनचा सतत पुरवठा केला जातो व नियंत्रित ओलावा आणि पोषक पुरवठा वेळोवेळी केला जातो ,
एरोपोनिक्स: झाडे हवेत लटकलेली असतात, .

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?

hydroponics setup खर्च : हायड्रोपोनिक्स चा खर्च हा सेटअप नुसार असतो जसा तुम्ही सेटअप बनवाल त्यानुसार तुम्हाला खर्च येईल छोटा सेटअप बनवाल तर खर्च कमी येईल सेटअप मोठा बनवाल तर खर्च जास्त येईल,
हायड्रोपोनिक्स सेटअप एवढा महाग नाही आणि कोकोपिट सुद्धा महाग नाही
परंतु जे हायड्रोपोनिक्स विक्रेते आहे ते हायड्रोपोनिक्स महाग विक्री करतात ,कोकोपिट एकदा विकत घेतले की 3 ते 4 वेळेस त्याचा वापर केला जातो ,
hydroponics setup तुम्ही सामान आणून घरी स्वत: सुद्धा बनऊ शकता ,

 

hydroponics advantage हायड्रोपोनिक्स चे फायदे : हायड्रोपोनिक्स चे अनेक फायदे आहेत, जसे की मर्यादित पाण्यात चांगले उत्पन्न तसेच ,मातीवर अवलंबून राहायची गरज नाही आणि नियंत्रित वातावरणात पिके वाढवण्याची क्षमता.
हे सहसा अशा वातावरणात वापरले जाते जेथे पारंपारिक शेती आव्हानात्मक असू शकते,जसे की मर्यादित जागा असलेले शहरी भाग किंवा मातीची प्रतिकूल परिस्थिती असलेले प्रदेश.

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?

आपण ज्या वेळेस जमिनीमध्ये उत्पन्न घेतो आणि पिकाला खते आणि पाणी देतो त्यापैकी खूप सारे पाणी आणि खते वगैरे जमिनीमध्ये वेस्ट जातात परंतु जमिनीपेक्षा आपण हायड्रोपोनिक मध्ये जर पिके घेतली तर आपले जे जमिनीमध्ये जाणारे पाणी आणि खते आहे त्याची बचत होते आणि जमिनीचे स्वास्थ्य सुद्धा दूषित होत नाही खराब होत नाही,
कमी जागेमध्ये अधिक उत्पन्न तुमच्याकडे जमीन जर कमी असेल तर तुम्ही व्हर्टिकल फार्मिंग करून अधिक उत्पन्न घेऊ शकता,

तुम्ही बघितले असेल दूध उत्पादक शेतकरी हायड्रोपोनिक्स चा वापर करतात, त्यामध्ये खूप कमी मक्का दाण्यामध्ये खूप जास्त मका पीक तयार होते जे दूध देणाऱ्या जनावरांसाठी खूप फायदेशीर आणि पोषक असते,

hydroponics disadvantage हायड्रोपोनिक्स चे नुकसान : मित्रांनो हायड्रोपोनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी आपल्याला पॉलिहाऊस सुद्धा घ्यावे लागते, आणि पॉलिहाऊस ला खूप खर्च लागतो, पॉलिहाऊस ची किंमत बघितली तर लाखो रुपये आहेत, एखाद्या सरकारी योजनेमध्ये जर आपल्याला पॉलिहाऊस भेटले तर ठीक नाहीतर स्वतः जर पॉलिहाऊस खरेदी करायची असेल तर एका अल्पभूधारक शेतकऱ्याला किंवा आर्थिक परिस्थिती मध्यम असणाऱ्या शेतकऱ्याला ते शक्य नाही, जवळपास अर्धा एकरचे जरी पॉलिहाऊस करायचे ठरले तरी त्याला पंधरा-वीस लाख रुपये खर्च येतो आणि त्यानंतर हायड्रोपोनिक तंत्रज्ञान करण्यासाठी सुद्धा चार पाच लाख रुपये खर्च येतो, एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याला शक्य नाही,

हायड्रोपोनिक मध्ये ठराविक पिके घेतली जातात जसे की भाजीपाला वर्गीय छोटी छोटी पिके, उंच वाढणारी पिके तसेच इतर पिके त्यामध्ये घेतले जाऊ शकत नाही त्यामुळे हायड्रोपोनिक ला खूप साऱ्या मर्यादा येतात,

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?

Hydroponics मध्ये कोण कोणती पिके घेतली जातात : हायड्रोपोनिक्स मध्ये पान कोबी फुल कोबी , ब्रोकली, टोमॅटो,वेलवर्गीय वनस्पती, आलू इत्यादी भाजीपाला वर्गीय पिके घेतली जातात, थोडक्यात सांगायचे म्हटलं तर जे कमी उंचीची वाढणारी भाजीपाला पिके आहेत ती हायड्रोपोनिक्स मध्ये घेतली जातात,

Hydroponics चे प्रकार : हायड्रोपोनिक्स चे वेगवेगळे प्रकार आहेत ,
पीव्हीसी पाईप मध्ये कोकोपीट ,वर्मी कंपोस्ट इत्यादी टाकून त्यामध्ये सुद्धा हायड्रोपोनिक्स द्वारे लागवड केली जाते,
दुसऱ्या प्रकारामध्ये, कॅरेट मध्ये कोकोपीट ,वर्मी कंपोस्ट इत्यादी टाकून त्यामध्ये त्यामध्ये पिके घेतली जातात ,
तिसऱ्या प्रकारामध्ये पोषक अन्नद्रव्य असणाऱ्या पाण्यामध्ये पिकांची मुळे लटकवून ठेवली जातात,

हायड्रोपोनिक्स मध्ये सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा घटक आहे सूर्यप्रकाश असेल तर पिकांची वाढ चांगली होते, सूर्यप्रकाश नसेल तर कृत्रिम प्रकारे सूर्यप्रकाश उपलब्ध केला जातो जसे की लाईट बल्ब वगैरे लावले जातात,

Hydroponics सेटअपची लाईफ : हायड्रोपोनिक सेटअपची लाईफ आहे ती वेगवेगळी असू शकते किंवा जे तुम्ही पाईप वापराल त्याच्या कॉलिटी वरती त्याची लाईफ अवलंबून असू शकते परंतु तरीसुद्धा जो हायड्रोपोनिक चा सेटअप तुम्ही तयार कराल त्याची नॉर्मल लाईफ आठ ते दहा वर्षे आहे, व्यवस्थित काळजी जर घेतली आणि सेटअप जर चांगला वापरला तर त्याची लाईफ आणखी जास्त सुद्धा होऊ शकते,

 

हे पण वाचा : 

limbu : कागदी  लिंबू लागवड शेतकऱ्या चे ATM एकरी 6 लाख रुपये उत्पन्न

Ho to Dragon fruit farming: अशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड

 

Leave a Reply