नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या भागामध्ये What Is Shifting Cultivation|स्थलांतरित शेती म्हणजे काय याविषयी सखोल माहिती बघणार आहोत,
एखाद्या पर्वतीय भागात किंवा जंगल भागात जंगलाचा काही भाग तोडून त्या ठिकाणी 2 ते 3 वर्ष शेती करून नंतर तो भाग पडीक ठेवून त्याच प्रकारे दुसऱ्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या शेतीला स्थलांतरित शेती असे म्हणतात,
What Is Shifting Cultivation|स्थलांतरित शेती म्हणजे काय 2024
स्थलांतरित शेतीला स्लॅश आणि बर्न शेती म्हणूनही ओळखले जाते,ही एक कृषी प्रथा आहे ज्यामध्ये शेतकरी झाडे तोडून आणि जाळून जमिनीचा तुकडा साफ करतात. जमीन साफ केल्यानंतर,जमिनीची सुपीकता कमी होईपर्यंत काही वर्षे पिकांची लागवड केली जाते.माती कमी उत्पादक झाली की,शेतकरी ते प्लॉट सोडून नवीन जमिनीवर जातात, स्थलांतरित शेती ही मुख्यतः आदिवासी लोकांद्वारे केली जाते,
मोकळी केलेली जमीन सामान्यत: अनेक वर्षे पडीक ठेवली जाते जेणेकरून ती पुनर्प्राप्त होऊ शकेल आणि पुन्हा निर्माण होईल.या पडत्या काळात,नैसर्गिक वनस्पती आणि पोषक हळूहळू मातीत परत येतात.पारंपारिक कृषी पद्धतींसह स्थानिक समुदाय आणि दुर्गम भागात स्थलांतरित शेतीचा सराव केला जातो.
नैसर्गिक पुनरुत्पादन चक्राशी सुसंगतपणे आणि लहान प्रमाणात सराव केल्यावर स्थलांतरित शेती शाश्वत असू शकते,जेव्हा लोकसंख्येच्या दबावामुळे कमी पडणारा कालावधी येतो किंवा जेव्हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागात त्याचा सराव केला जातो तेव्हा ते समस्याप्रधान बनू शकते
मित्रांनो स्थलांतरित शेतीचे काही नुकसान देखील आहेत ते आपण इथे बघणार आहोत,
जंगल संपत्तीचा नाश : स्थलांतरित शेती करीत असताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते, आणि दोन-तीन वर्ष शेती केली जाते त्यानंतर परत ती जागा सोडून त्याच प्रमाणे दुसऱ्या ठिकाणी परत ते क्षेत्र सोडून दुसऱ्या ठिकाणी त्याचप्रमाणे वृक्षतोड करून शेती केली जाते, यामुळे मोठ्या प्रमाणात जंगल संपत्तीचा नाश होतो,
प्राणी जीवनाला धोका: स्थलांतरित शेती करत असताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येते त्यामुळे त्या भागात राहणारे जेवण प्राणी आहेत त्यांना सुद्धा तेथून स्थलांतर करावे लागते कारण वन्य प्राण्यांसाठी जंगल अधिवास महत्त्वाचा आहे परंतु जंगलाची तोड झाल्यामुळे वन्य प्राणी तिथून दुसऱ्या ठिकाणी निघून जातात , वृक्षतोडीमुळे वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात येते,
जास्त मानवी श्रम आणि कमी उत्पादन : ही जी स्थलांतरित शेती केली जाते ती पावसाच्या पाण्यावर केली जाते कारण ती स्थायिक शेती नसल्यामुळे तिथे पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध राहत नाही , त्यामुळे ही शेती पावसाच्या पाण्यावर केली जाते आणि मेहनत खूप जास्त करावे लागते आणि उत्पन्न त्या दृष्टीने खूप कमी प्रमाणात होते, या इत्यादी सर्व गोष्टींचा विचार केला असता या शेतीला हानिकारक शेती असे सुद्धा म्हणतात,
जलद लोकसंख्या वाढ आणि जंगलतोड यामुळे स्थलांतरित शेतीचा नकारात्मक पर्यावरणीय प्रभाव वाढू शकतो,मातीची धूप होण्यास हातभार लावणे,जैवविविधतेचे नुकसान,आणि इतर पर्यावरणीय समस्या.या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल कृषी पद्धती विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित शेती केली जाते. स्थान परतवे तिला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते,
झूम शेती : ईशान्य भारत
बोगमा : मेघालय
रीत : आसाम
टेकोंग्लु : मणिपूर
कुरवा : छोटा नागपूर पठार
पोट्टू : आंध्र प्रदेश
रेमो: उत्तर प्रदेश
गुडिया , बागडा ,पामा : उडीसा
बेवार , माशा , पेंडा : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
दहजा , दहिया : मध्य प्रदेश
पुनाम , ओनम : केरळ
जगातील स्थलांतरित शेतीचे प्रकार :
मील्पा : मध्य अमेरिका
कोणूको : व्हेनेझुयेला
मसोले : कांगो
चेना : श्रीलंका
रे : वियतनाम
लडांग: मलेशिया
तमराई: थायलंड
हे पण वाचा :
What Is Cattle Farming | पशुपालन म्हणजे काय 2024
Which Crop Need More Water | कोणत्या पिकाला जास्त पाणी लागते 2024
तर मित्रांनो या लेखांमध्ये आज आपण What Is Shifting Cultivation|स्थलांतरित शेती म्हणजे काय याविषयी माहिती बघितली,